Jump to content

मालविका अय्यर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Malvika Iyer (es); মালবিকা আইয়ার (bn); Malvika Iyer (nl); مالفيكا ايير (arz); Malvika Iyer (sq); മാളവിക അയ്യർ (ml); Malvika Iyer (ig); Мальвика Айер (ru); मालविका अय्यर (mr); మాళవిక అయ్యర్ (te); ਮਾਲਵਿਕਾ ਅਇਅਰ (pa); Malvika Iyer (en); Malvika Iyer (ast); मालविका अय्यर (hi); மாளவிகா ஐயர் (ta) Indian motivational speaker, social activist and disability rights activist (en); Indian motivational speaker, social activist and disability rights activist (en); ഒരു മോട്ടിവേഷണൽ സ്പീക്കരും, സാമൂഹികപ്രവർത്തകയും, മോഡലും ആണ് മാളവിക (ml); Onye na-ekwu okwu mkpali India, onye na-akwado ọha mmadụ na onye na-akwado ikike nkwarụ (ig)
मालविका अय्यर 
Indian motivational speaker, social activist and disability rights activist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखफेब्रुवारी १८, इ.स. १९८९
कुंभकोणम
नागरिकत्व
व्यवसाय
  • शैक्षणिक व्यक्ती
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मालविका अय्यर (जन्म: १८ फेब्रुवारी, १९८९) ह्या एक समाजसेविका आणि अपंगत्व हक्क कार्यकर्त्या आहेत.[] लहानपणी अनवधानाने अय्यर यांनी ग्रेनेड उचलला होता, ज्यामुळे त्यांना आपले दोन्ही हात कायम स्वरुपी गमवावे लागले.[][][][][] अय्यर ह्या सुलभ फॅशनची एक मॉडेल देखील आहे.[][][] अय्यर यांनी २०१७ मध्ये मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क मधून सामाजिक कार्य विषयात मानद पदवी मिळवली.[१०][११] त्यांचा हा प्रबंध अपंग लोकांच्या प्रति हीन दृष्टिकोन ठेवण्याविषयीचा आहे.[१२][१३][१४]

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

अय्यर यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९८९ रोजी कुंभकोणम, तमिळनाडू येथे झाला.[१५] त्यांच्या वडिलांचे नाव बी. कृष्णन आणि आईचे नाव हेमा कृष्णन असे आहे.[१६][१७] राजस्थान मधील बिकानेर येथे बी. कृष्णन हे जलविद्युत विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. सबब अय्यर यांचे बालपण आणि पुढील आयुष्य बिकानेर येथे गेले.[१७] २६ मे २००२ रोजी, वयाच्या १३ व्या वर्षी, बिकानेर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी चुकून एक ग्रेनेड उचलला. काही वेळात हा ग्रेनेड लहान अय्यरया हातात फुटला आणि त्यांचे दोन्ही हात कायम स्वरुपी पंगू झाले.[][१८][१९] याशिवाय पायांना देखील अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले. शिवाय त्यांना मज्जातंतूंचा पक्षाघात आणि अतिसंवेदनशीलता (हायपोस्थेसिया) सह गंभीर आजार भोगावे लागले. अतिसंवेदनशीलता, अर्थात शरीराचा विशिष्ट भाग सुन्न होणे, ज्यामुळे स्पर्श, तापमान किंवा वेदना यांसारख्या संवेदना कमी जाणवतात असा आजार होय.[२०]

शिक्षण

[संपादन]

पुढे २००४ साली अय्यर यांनी चेन्नई येथे माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षेत (दहावीत) बाह्य परीक्षार्थी बनून परीक्षा दिली.[१७] या परीक्षेत त्यांना एक लेखक पुरवण्यात आला होता. या परीक्षेत अय्यर यांना ५०० पैकी ४८३ गुण; अर्थात ९७ टक्के मिळाले होते. गणित आणि विज्ञान विषयात त्यांना १०० पैकी १०० गुण, तर हिंदीत ९७ गुण मिळाले होते. त्या वर्षी अय्यर यांना हिंदी विषयात तामिळनाडूतून प्रथम क्रमांक मिळाला होता.[२१][१७] त्या बाह्य परिक्षार्थी विद्यार्थ्यांत राज्यातून प्रथम आल्या होत्या.[१५][१२] तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अय्यर यांना राष्ट्रपती भवनात विशेष आमंत्रित केले होते.[२१][१५]

तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम सोबत मालविका अय्यर

पुढे अय्यर नवी दिल्ली येथे स्थानांतरित झाल्या. दिल्लीत त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र (ऑनर्स) चा अभ्यास केला. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्कमधून सामाजिक कार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.[२०] पुढे मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क येथून त्यांनी सामाजिक कार्यात एम.फिल आणि पीएच.डी.[] केले. येथे २०१२ मध्ये त्यांनी डिस्टिंक्शन सह प्रथम श्रेणी मिळवली आणि सर्वोत्तम एम.फिलसाठी रोलिंग कप जिंकला.[२२]

सक्रियता

[संपादन]

२०१३ साली अय्यर यांनी भारत समावेशन शिखर परिषदेचे आयोजन केले होते.[२३] सुलभ फॅशनच्या समर्थक असलेल्या अय्यर यांनी चेन्नईतील राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी) आणि ॲबिलिटी फाउंडेशनसाठी शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला जिथे त्यांनी अपंग लोकांसाठी कार्यक्षमता आणि शैली असलेले कपडे डिझाइन करण्याची गरज यावर भर दिला.[२४] २०१४ मध्ये, अय्यर यांना जागतिक आर्थिक मंचाच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या चेन्नई हबमध्ये ग्लोबल शेपर म्हणून निवडण्यात आले.[][२५] त्या युनायटेड नेशन्स इंटर-एजन्सी नेटवर्क ऑन युथ डेव्हलपमेंटच्या वर्किंग ग्रुप ऑन युथ अँड जेंडर इक्वॅलिटीमध्ये सहभागी झाल्या होत्या. तर मार्च २०१७ मध्ये त्यांना न्यू यॉर्कमधील युनायटेड नेशन्समध्ये भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.[][१२][२६][२७] ऑक्टोबर २०१७ मध्ये, त्यांना नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या भारत आर्थिक शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.[२८]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

८ मार्च २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अय्यर यांना महिला सक्षमीकरणात योगदान दिल्याबद्दल महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[२९][३०] ८ मार्च २०२० रोजी, भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची सोशल मीडिया खाती सांभाळण्यासाठी तिची निवड केली.[३१][३२][३३] २०१६ मध्ये न्यू यॉर्कमध्ये झालेल्या पहिल्या महिला उदयोन्मुख नेते पुरस्काराच्या मानकरी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.[][३४] २०१५ मध्ये डेक्कन क्रॉनिकलने अय्यर यांना दशकातील १०० चेंज एजंट्स आणि न्यूजमेकर्सपैकी एक म्हणून दखल घेतली होती.[१२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Blast Survivor Got Her "Only Finger" After Surgery. Her Story". NDTV. 19 February 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Krupa, Lakshmi (2014-04-15). "How birds of a feather found followers". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2017-03-27 रोजी पाहिले.
  3. ^ a b c "From where I stand: "Being a person with disability is challenging. Being a woman with disability adds extra challenges"". UN Women (इंग्रजी भाषेत). 2017-06-09. 2017-06-22 रोजी पाहिले.
  4. ^ a b Thomas, Mini P (2016-11-06). "Able to inspire". The WEEK. 2017-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-28 रोजी पाहिले.
  5. ^ Kanal, Nishtha (2018-04-18). "Spreading inclusive love". Deccan Chronicle.com/ (इंग्रजी भाषेत). 2018-06-06 रोजी पाहिले.
  6. ^ Menon, Priya (2018-04-15). "Sketching a fighter's tale". The Times of India. 2018-06-06 रोजी पाहिले.
  7. ^ a b c Bijur, Anupama (2016-05-06). "Looking beyond limitations". Femina. 2017-03-27 रोजी पाहिले.
  8. ^ Harish, Ritu Goyal (2015-10-23). "Life Took This Fashionista's Hands So She Grew Wings". Fashion101. 2017-04-04 रोजी पाहिले.
  9. ^ Joseph, Raveena (2015-08-03). "The pursuit of happiness". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2017-04-10 रोजी पाहिले.
  10. ^ Thomas, Mini P (2017-12-20). "'I was horrified by the way people looked at me'". THE WEEK. 2018-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-04 रोजी पाहिले.
  11. ^ "Meet Malvika Iyer, the PhD scholar and Disability Rights Activist whose photo everyone's sharing". InUth. 2017-12-16. 2018-04-04 रोजी पाहिले.
  12. ^ a b c d Shetty, Sudhanva (2017-03-17). "From Bomb Blast Survivor To UN Speaker: The Story Of Malvika Iyer". The Logical Indian (इंग्रजी भाषेत). 2017-03-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-14 रोजी पाहिले.
  13. ^ Menon, Priya (2016-04-16). "She makes a difference with her grit". The Times of India. 2017-03-27 रोजी पाहिले.
  14. ^ Kapoor, Aekta (2017-10-03). "She Lost Her Arms So She Armed Herself With Courage Instead". eShe (इंग्रजी भाषेत). 2017-11-11 रोजी पाहिले.
  15. ^ a b c Saraswathi, S (2014-09-17). "Malvika Iyer's amazing story of grit!". Rediff. 2017-04-04 रोजी पाहिले.
  16. ^ Koshy, Tessy (2015-07-27). "'I'm glad both my hands were blown off'". Friday. 2017-04-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-03 रोजी पाहिले.
  17. ^ a b c d Bhattacharya, Saptarshi (2004-05-28). "Where there is a will there is a way". द हिंदू. 2017-04-03 रोजी पाहिले.
  18. ^ Raghuraman, N (2009-07-30). "Never say die". DNA (इंग्रजी भाषेत). 2017-04-07 रोजी पाहिले.
  19. ^ "This 28-Year-Old Global Icon's Story Proves the Power of a Mother's Love and Determination". The Better India. 2017-04-01. 2017-04-05 रोजी पाहिले.
  20. ^ a b "An IYER for the differently-able". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2014-03-09. 2017-03-28 रोजी पाहिले.
  21. ^ a b दिव्या नायर. "What hurts most is when people pity me". Rediff.com. २३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
  22. ^ Menon, Sudha; Ferose, V.R. (2014). Gifted : Inspiring Stories of People with Disabilities. India: Random House India. p. 156. ISBN 9788184005455.
  23. ^ Ray, Aparajita; Prasher, Garima (2013-11-30). "Summit helps disabled persons help themselves - Times of India". The Times of India. 2017-04-04 रोजी पाहिले.
  24. ^ "Include, in style". The Hindu. 2014-05-29. 2017-04-20 रोजी पाहिले.
  25. ^ Vasudevan, Shilpa Kappur (2015-03-09). "Making lemonade out of the lemons life threw at her". The New Indian Express. 2017-04-05 रोजी पाहिले.
  26. ^ "Closing session Launch of CEDAW for Youth, Youth Forum (CSW 61)". UN Web TV. 2017-03-11. 2017-04-04 रोजी पाहिले.
  27. ^ Luo, Christina (2017-04-07). "Take Up Space With Your Voice". The Huffington Post (इंग्रजी भाषेत). 2017-04-10 रोजी पाहिले.
  28. ^ Benu, Parvathi (2017-09-11). "Your daily dose of inspiration: After losing her hands at the age of 13, Malvika Iyer is now a world famous motivational speaker". The New Indian Express. 2017-11-11 रोजी पाहिले.
  29. ^ "Women achievers honoured". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2018-03-17. ISSN 0971-751X. 2018-04-04 रोजी पाहिले.
  30. ^ "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. 2018-03-09. 2018-04-04 रोजी पाहिले.
  31. ^ "Bomb-blast survivor Malvika Iyer tweets message of courage on Narendra Modi's Twitter handle". The New Indian Express. 8 March 2020. 2020-07-29 रोजी पाहिले.
  32. ^ "Who is Malvika Iyer, one of the women handling PM Modi's Twitter handle?". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2020-03-08. 2020-07-29 रोजी पाहिले.
  33. ^ "#SheInspiresUs | The seven women handling PM Narendra Modi's social media accounts". The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2020-03-08. ISSN 0971-751X. 2020-07-29 रोजी पाहिले.
  34. ^ "Meet Women in the World's Emerging Leaders". Women in the World in Association with The New York Times - WITW (इंग्रजी भाषेत). 2015-11-20. 2017-04-07 रोजी पाहिले.