Jump to content

मालतीबाई चिटणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. मालतीबाई चिटणीस ह्या ठाणे शहरातील एक स्त्री रोग तज्ञ आणि प्रसुती तज्ञ होत्या.ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलवरून तीन पेट्रोल पंपाकडे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग जातो. हा मार्ग जांभळी नाक्यावरून येणाऱ्या बहिरामजी भिकाजी मार्गाला छेद देतो आणि पुढे दगडी शाळेकडे जातो. तिथल्या चौकाला डॉ. मालतीबाई चिटणीस चौक हे नाव दिले आहे.

जीवन व कारकीर्द

[संपादन]

डॉ.मालतीबाई यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१८ साली झाला. त्यांचे मूळ गाव पुण्यातील आहे. त्यांच्या लग्नानंतर त्या ठाणे येथे आल्या. लग्नानंतर त्यांनी एलसीपीएस चे शिक्षण पूर्ण केले आणि ठाण्यातील चरई येथे दामले यांच्या वाड्यात इ.स.१९४८ मध्ये प्रसुतीगृह चालू केले. नंतर अधिक रुग्ण यायला लागल्यामुळे त्यांनी त्यांचे हॉस्पिटल तिथल्याच दिवेचा ब्लॉकमध्ये स्थलांतरित केले.त्या दिवसाला १०० पेक्षा जास्त रुग्ण तपासायच्या आणि महिन्याला ९० पेक्षा जास्त प्रसुती करायच्या.ही जागा अपुरी पडायला लागल्यानंतर त्यांनी १९५४ मध्ये पारसी हाऊस ही वास्तू विकत घेऊन तिथे डॉ.मालतीबाई रुग्णालय हलविले. याच इमारतीत हॉस्पिटल आणि निवासस्थान ही आहे. आजही ह्या वास्तूत त्यांचे पुत्र डॉ. किशोर आणि त्यांच्या पत्नी मेघना ह्यांनी डॉ. मालतीबाई यांचा रुग्ण सेवेचा वसा पुढे सुरू ठेवला आहे.डॉ. मालतीबाई यांची तिसऱ्या पिढीतील डॉ. निखिल आणि डॉ. तेजल यासुद्धा वैद्यकीय सेवा पुढे चालवत आहेत.

समाज कार्य

[संपादन]

डॉ. मालतीबाई यांनी आपल्या हॉस्पिटलशिवाय अन्य संस्थेच्या माध्यमातून रुग्ण सेवा केली. त्यांनी ठाणे, भिवंडी, कळवा, वसई, पालघर, मुरबाड येथील कुटुंब नियोजन शिबिरात भाग घेतला. आगाखान हेल्थ सेंटरवर त्यांनी दहा वर्षे ऑनररी डॉक्टर म्हणून काम केले. ठाणे शहर महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्या संस्थेतर्फे त्यांनी कुटुंब नियोजन व आरोग्य केंद्र चालवले. समाजातील मागासलेल्या महिलांना त्यांनी आधार दिला. इसवी सन १९७१ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने ऑनररी मजिस्ट्रेट पदावर नियुक्त केले होते.त्यांच्या समाजातील आरोग्य सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल ठाणे महानगरपालिकेने त्यांचे मालतीबाई चिटणीस हॉस्पिटल समोर असलेल्या चौकाला कै.डॉ. मालतीबाई चिटणीस चौक असे नाव देऊन त्यांची स्मृती जपून ठेवली आहे.त्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलमधील आई म्हणून ओळखल्या जात होत्या.

मृत्यू

[संपादन]

मालतीबाई चिटणीस यांचा मृत्यू १० नोव्हेंबर १९७६ रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी झाला. []

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार,११ डिसेंबर २०२५