Jump to content

मार्क नॉप्फलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्क नॉप्फलर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
स्थानिक भाषेतील नावMark Knopfler संपादन
जन्म-नावMark Freuder Knopfler संपादन
दिलेले नावMark, Freuder संपादन
आडनावKnopfler संपादन
जन्म तारीख१२ ऑगस्ट 1949 संपादन
जन्मस्थानग्लासगो संपादन
भावंडेDavid Knopfler संपादन
वैवाहिक जोडीदारKitty Aldridge संपादन
अपत्यKatya Ruby Rose Knopfler संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाBritish English संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Leeds, Gosforth Academy, Harlow College संपादन
निवासस्थानग्लासगो, न्यूकॅसल अपॉन टाईन संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1965 संपादन
Handednessडाव्या हाताने संपादन
Voice typebaritone संपादन
वाद्यFender Stratocaster, Fender Telecaster, Gibson Les Paul, voice, गिटार संपादन
DiscographyMark Knopfler discography संपादन
उल्लेखनीय कार्यCalling Elvis, Tunnel of Love संपादन
सदस्यताडायर स्ट्रेट्स संपादन
Owner ofMidnight Sun Brewing Company संपादन
Record labelWarner Bros. Records, Reprise Records, Mercury Records, Vertigo Records संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.markknopfler.com/ संपादन

मार्क फ्रॉयडर नॉप्फ्लर (१२ ऑगस्ट, १९४९:ग्लासगो, स्कॉटलंड - ) हा एक ब्रिटिश संगीतकार आहे. हा १९७७ ते १९९५ या काळात डायर स्ट्रेट्स या रॉक संगीतसमहाचा (बँड) प्रमुख गिटारवादक, गायक आणि गीतकार होता. नॉप्फलर आणि बेस वादक जॉन इल्सली हे दोघे डायर स्ट्रेट्सच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा भाग होते. डायर स्ट्रेट्स बँड बरखास्त झाल्यानंतर नॉप्फलरने स्वतंत्रपणे संगीत तयार केले. आता तो एक स्वतंत्र कलाकार आहे.

नॉप्फ्लरचा जन्म ग्लासगो येथे झाला आणि त्यांचे संगोपन न्यूकॅसल येथे झाले.[] लीड्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने तीन वर्षे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. नॉप्फ्लरने त्याचा धाकटा भाऊ डेव्हिड नॉप्फ्लर याच्यासोबत डायर स्ट्रेट्सची स्थापना केली. या बँडने ब्रदर्स इन आर्म्स (१९८५) सह सहा संगीतसंच प्रकाशित केले. ब्रदर्स इन आर्म्स हा इतिहासातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या अल्बमपैकी एक आहे. १९९५ मध्ये डायर स्ट्रेट्स बरखास्त झाल्यानंतर नॉप्फ्लरने आतापर्यंत दहा वैयक्तिक संगीतसंच प्रकाशित केले आहेत.[] याशिवाय त्याने लोकल हिरो (१९८३), कॅल (१९८४), द प्रिन्सेस ब्राइड (१९८७), वॅग द डॉग (१९९७) आणि अल्तामिरा (२०१६) यासह नऊ चित्रपटांसाठी चित्रपट संगीताची रचना आणि निर्मिती केली आहे.[] त्यांनी टिना टर्नर, बॉब डिलन, आणि रँडी न्यूमन यांच्यासाठी संगीतनिर्मिती केली आहे.

क्लासिक रॉक मासिकाने नॉप्फलरला संगीतपंडित म्हणले आहे,[] त्याने नॉप्फ्लर फिंगरस्टाइल गिटारवादनाची पद्धत सुरू केली. नॉप्फलरला रोलिंग स्टोनच्या सर्वकालीन १०० महान गिटारवादकांच्या" यादीत २७वे स्थान आहे.[] डायर स्ट्रेट्ससह नॉप्फ्लरने यांनी १० ते १२ कोटी रेकॉर्डची विक्री केली.[][] नॉप्फलरला चार वेळा ग्रॅमी पुरस्कार, एडिसन पुरस्कार, स्टायगर पुरस्कार आणि आयव्हर नोव्हेलो पुरस्कार मिळाले आहेत. युनायटेड किंग्डममधील विद्यापीठांनी त्याला संगीतातील तीन मानद डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत.[][] २०१८ मध्ये डायर स्ट्रेट्सचे सदस्य म्हणून नॉप्फलरला रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम मध्ये स्थान दिले गेले.[१०]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "About". MarkKnopfler.com. 2007-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. He was around seven years old when the Knopfler family moved to Newcastle-Upon-Tyne in the North-East of England. Mark attended Gosforth Grammar School.
  2. Knopfler, Mark (2005–2013). "Mark Knopfler: Discography of studio albums". Markknopfler.com. 18 April 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2013 रोजी पाहिले.
  3. "Mark Knopfler Biography". The Biography Channel. 4 February 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 March 2008 रोजी पाहिले.
  4. "Album of the Week Club Review: Dire Straits – Brothers in Arms". Louder. 21 May 2018. 26 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 October 2019 रोजी पाहिले.
  5. "The 100 Greatest Guitarists of All Time:Mark Knopfler". Rolling Stone. 18 September 2003. 21 June 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 April 2013 रोजी पाहिले.
  6. Alexander, Michael (20 October 2017). "Dire Straits reunion 'not on the horizon', says band founder John Illsley ahead of Tayside gigs". The Courier of Dundee. 13 March 2018 रोजी पाहिले.
  7. "Dire Straits given plaque honour". BBC. 4 December 2009. 16 October 2011 रोजी पाहिले.
  8. "Sunderland honours Sultan of Swing". University of Sunderland. 19 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 November 2013 रोजी पाहिले.
  9. "Third Honorary Degree". MarkKnopfler.com. 5 July 2007. 14 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2010 रोजी पाहिले.
  10. Greene, Andy (13 December 2017). "Nina Simone, Bon Jovi, Dire Straits Lead Rock and Roll Hall of Fame 2018 Class". Rolling Stone. 28 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 January 2018 रोजी पाहिले.