मारिया गॅब्रिएला बेअर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मारिया गॅब्रिएला बेअर्स

जन्म २० सप्टेंबर १८८३
अँटवर्प, बेल्जियम
मृत्यू ३० डिसेंबर १९५९
धर्म ख्रिश्चन

मारिया गॅब्रिएला बेअर्स (२० सप्टेंबर १८८३ - ३० डिसेंबर १९५९) ही एक बेल्जियन सिनेटर, स्त्रीवादी आणि ट्रेड युनियनिस्ट होती. मारिया बेअर्स नॅशनल व्हर्बंड डर क्रिस्टेलिजके व्रॉवेनगिल्डन (नॅशनल युनियन ऑफ ख्रिश्चन वुमेन्स गिल्ड्स)ची संस्थापिका होती. या संस्थेला सध्या फेमा या नावाने ओळखले जाते.[१] १९३६ मध्ये, बेअर्स आणि मार्सल या बेल्जियममधील पहिल्या महिला सिनेटर होत्या.[२] १९४५ मध्ये, त्या सिनेटच्या पहिल्या महिला सचिव आणि संसदीय आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या.[३]

चरित्र[संपादन]

मारिया बेअर्सचा जन्म २० सप्टेंबर १८८३ रोजी अँटवर्प येथे झाला. ती नोट्रे-डेमच्या सॉर्स येथील हायस्कूलमध्ये शिकली. त्यामुळे डच आणि फ्रेंच दोन्ही भाषा तिला अस्खलित येत होत्या.[४] तिने फ्रायबर्ग विद्यापीठात सामाजिक विज्ञानाचा अभ्यास केला.

१९४५ मध्ये, बेअर्स सिनेटच्या पहिल्या महिला सचिव बनल्या आणि आरोग्यावरील संसदीय आयोगाच्या अध्यक्षा झाल्या.[३]

३० डिसेंबर १९५९ मारिया बेअर्स यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी ब्रुसेल्स येथे निधन झाले. १९९८ मध्ये, फ्लेमिश समुदायाच्या सभागृहाला मारिया बेअर्सचे नाव देण्यात आले.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Vierde feministische golf". Rosa - Kenniscentrum voor gender en feminisme (डच भाषेत). 17 May 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Eerste feministische golf". Rosa - Kenniscentrum voor gender en feminisme (डच भाषेत). 17 May 2021 रोजी पाहिले.
  3. ^ a b Payne 2015.
  4. ^ Payne 2015, पान. 8.
  5. ^ Wivina Demeester-De Meyer (27 October 1998). "Vlaanderen herkenbaar aanwezig. Huisvesting van de diensten van de Vlaamse regering" (PDF). Parliament of the Flemish Community (डच भाषेत). pp. 4–5. 17 May 2021 रोजी पाहिले.

संदर्भग्रंथ[संपादन]