मायबोली व्हावी न्यायबोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


'यात काय काय आहे'
Wikipedia-logo-mr.pngArrowrotation.gif Wikibooks-logo.svg

एखादी गोष्ट कशी करावी हे मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पाच्या परिघात मोडते, म्हणून या लेख/विभागाच्या काही किंवा सर्व मजकुर मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात स्थानांतरीत करण्याची गरज प्रतिपादीत केली गेली आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. एखादी गोष्ट कशी असते ते ज्ञानकोशाच्या परिघात येऊ शकते पण एखादी गोष्ट कशी करावी हे विकिपीडिया परिघात बसत नाही.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा/करा.


“ मायबोली व्हावी न्यायबोली “

             भाषा ही सृष्टीतील प्राणिमात्रांच्या वैचारिक व भावनिक देवाण-घेवाणीचे एक माध्यम आहे. सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांपैकी केवळ मानवानेच आपल्या सांस्कृतिक व सामाजिक उत्क्रांतीच्या प्रवासात भाषा लिपीबद्ध करण्याचा प्रयत्न केला व आज त्याचे प्रगत स्वरूप आपणासमोर आहे. मानव प्राण्याने जेव्हा टोळी ते समाज व समाज ते संस्कृती हा उत्क्रांतीचा दिर्घ पल्ला पूर्ण केला होता तेव्हा तो भाषिक दृष्ट्या प्रगतीच्या टोकावर पोहचला होता. म्हणूनच कदाचीत ती भाषा त्या सुसंस्कृत प्रगत समाजाची ओळख म्हणून ‘ संस्कृत ’ या नावाने ओळखली जाऊ लागली असावी. संस्कारक्षम मूल्य बाळगणारी ही वृद्ध व अनुभवी भाषा अनेक भारतीय भाषांची जननी म्हणून ओळखली जाते. माझी मराठी ही त्या माऊलीची एक लाडकी लेक. बाराव्या शतकात आद्य कवी मुकुन्दराय याने या भाषेचे बाळंतपण केले अशी इतिहासात नोंद आहे. संस्कृत भाषेच्या क्लीष्टतेपासून व ठराविक समाज गटाच्या मक्तेदारीपासून या भाषेला मुक्त करून सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत परिवर्तीत करण्याचे आद्य कर्तव्य करणारा हा आद्य कवी. त्या नंतर ज्ञानोबा माऊलीने तत्वज्ञानाचा महामेरू असलेल्या संस्कृत भाषेतील गीतेचे तत्वज्ञान समाजाच्या तळापर्यंत पोहोचविण्यासाठी हा क्लिष्टपणा सामन्यांच्या बोलीभाषेमध्ये परावर्तीत केला. यावरून असे दिसून येते की, क्लिष्टतेच्या आवरणातून समाजोपयोगी बाबींना मुक्त करण्यासाठी विद्वान व मान्यवरांनी नेहमीच सामन्यांचा बोलीभाषेची मदत घेतली आहे.

           न्यायालये ही समाजाला त्यांच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात जीव व मालमत्ता एवढेच नव्हे तर व्यक्तीचा आत्मसन्मान यांच्या सुरक्षिततेची हमी देणारे एक श्रद्धास्थान आहे. न्याय मंदिरातून होणारी न्यायचर्चा व न्यायदान प्रक्रिया ही क्लिष्टतेपासून मुक्त करून सर्व सामान्यांना समजण्याजोगी बनविण्याची आवश्यकता; यासाठी असते की  ज्यां लोकांसाठी ही प्रक्रिया राबविली जाते त्यांना न्याय झाला आहे व न्याय होतो आहे असा विश्वास दृढ करणे गरजेचे असते. ही वस्तुस्थिती विचारात घेतली असता व्यक्तिगतरित्या मला जे वाटत ते व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे.

           देवनागरी सारख्या समृद्ध लिपीत लिपीबद्ध स्वरुपात उपलब्ध असणारी माझी मराठी आज स्वगृहीच दीनवाणे आयुष्य जगत आहे. गौराव दिनाच्या निमित्ताने केवळ एक दिवस ही जाणीव व खंत आम्ही वर्षनुवर्षे व्यक्त करीत आलो आहोत. मात्र त्यादृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची व्याप्ती बरीच नगण्य आहे. यालाही सामाजिक उदासीनताच कारणीभूत असावी. न्यायालयात काम करतांना न्यायदानाची प्रक्रीया मायबोलीतून केली जावी यासाठी मा. उच्च न्यायालयाकडून देखिल वारंवार प्रोत्साहन दिले जात असते. परंतू बहुतांशी इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या कायद्यांच्या पुस्तकांच्या आधारे मराठी भाषेतून न्यायदान करण्याची प्रक्रिया बहुतेक जणांना क्लिष्ट वाटते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पर्यायी सोप्या मराठी शब्दाची उपलब्धता व भाषा प्रभुत्व दाखविण्याच्या व सौंदर्य जपण्याचा नादात क्लिष्ट मराठीचा आग्रही अट्टाहास अनेकांकडून केला जातो. यामुळे असे  न्यायनिर्णय सर्वसामान्यांच्या आकालानापासून पून्हा दूर जातात.

            हि प्रक्रिया सर्वसामान्यांच्या जवळ पोहचवणारी करावयाची झाल्यास सामान्य माणसांना कळण्यासाठी भाषेचा क्लिष्टपणा टाळून त्या-त्या भागातील बोलीभाषेतील शब्दांचा जास्तीत जास्त उपयोग करून न्यायनिर्णयांची व आदेशांची मांडणी केली गेल्यास तिची विश्वासाहर्ता निश्चितपणे वाढू शकते. अपरिहार्य परिस्थितीत इंग्रजी शब्दांचा वापर करून निकालपत्राच्या शेवटी तळटिप म्हणून त्या इंग्रजी शब्दाचे सोपे पर्यायी मराठी अर्थ देणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. काही इंग्रजी शब्दांनी उदा. व्हरांडा, स्टेशन, स्टोव्ह, जंगल, रेडिओ वगैरे यांनी आता मराठी भाषेत स्वत;ला पूर्णपणे सामावून घेतले आहे. स्वत;चे परभाषिकपण  विसरून ते आता स्वभाषिक शब्द बनले आहेत. अशा शब्दाच्या वापरामुळे भाषा समृध बनण्यास मदत होते. ही वस्तुस्थिती देखील विचारात घेऊन निकालपत्राची मांडणी केली गेल्यास क्लिष्टपणाचे आवरण आपोआप दूर सारले जाईल.

            शेवटी प्रयत्नांती परमेश्वराची प्राप्ती होते या भावनेतून भाषा गौरवदिन मायबोली ही न्यायबोली बनावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

दिनांक :- २७ फेब्रुवारी २०१७                         लेखक - प्रशांत कुलकर्णी , पीठासीन अधिकारी,  शाळा न्यायाधिकरण अमरावती