Jump to content

मायकेल कीटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायकेल जॉन डग्लस तथा मायकेल कीटन (५ सप्टेंबर, १९५१ - ) हा एक अमेरिकन अभिनेता आहे.

कीटनने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीस नाइट शिफ्ट (१९८२), मिस्टर मॉम (१९८३), जॉनी डेंजरसली (१९८४), बीटलज्यूस (१९८८) आणि द ड्रीम टीम (१९८९) अशा विनोदी भूमिका केल्या. बॅटमॅन (१९८९) आणि बॅटमॅन रिटर्न्स (१९९२) मधील भूमिकांद्वारे त्याला लोकप्रियता मिळाली. यांशिवाय त्याने पॅसिफिक हाइट्स (१९९०), मच अॅडो अबाउट नथिंग (१९९३), जॅकी ब्राउन (१९९७), जॅक फ्रॉस्ट (१९९८), रोबोकॉप (२०१४) आणि डंबो (२०१९) या चित्रपटांतूनही काम केले. कीटनने कार्स (२००६), टॉय स्टोरी ३ (२०१०) आणि मिनियन्स (२०१५) या अ‍ॅनिमेटेड चित्रपटांमध्ये आवाज दिला..

अलेहांद्रो गोंझालेझ इनारितुच्या बर्डमॅन (२०१४) मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका झाकोळलेल्या अभिनेत्याची भूमिका साकारल्यानंतर कीटनच्या कारकिर्दीचे पुनरुज्जीवन झाले. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्याने स्पॉटलाइट (२०१५), द फाउंडर (२०१६), द ट्रायल ऑफ द शिकागो ७ (२०२०) आणि वर्थ (२०२१) सारख्या चरित्रात्मक चित्रपटांतून भूमिका केल्या. त्याने स्पायडर-मॅन: होमकमिंग (२०१७) मध्ये व्हल्चरची भूमिका साकारली, तर द फ्लॅश (२०२३) मध्ये बॅटमॅन आणि बीटलज्यूस बीटलज्यूस (२०२४) मध्ये मुख्य भूमिका साकारल्या.

कीटनला एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार तसेच एक अकादमी पुरस्कार आणि बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन समाविष्ट आहे. २०१६ मध्ये त्याला फ्रांसचा ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचे अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. []

१९७९ मध्ये वर्किंग स्टिफ्समध्ये माइक ओ'रोर्कची भूमिका साकारताना कीटन
२००२ च्या कान्स चित्रपट महोत्सवात उपस्थित असलेले कीटन

कीटनचे १९८२ ते १९९० पर्यंत कॅरोलाइन मॅकविल्यम्सशी लग्न झाले होते. त्यांना शॉन नावाचा एक मुलगा आहे. [] त्याच्याद्वारेकीटन आणि मॅकविल्यम्स यांना दोन नातवंडे आहेत. [] कीटनचे १९९० ते १९९५ पर्यंत अभिनेत्री कोर्टनी कॉक्सशी संबंध होते [] तो २०१६ पासून मार्नी टर्नरशी संबंधात आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. "Michael Keaton Gets France's Order of Arts and Letters Honor". Variety. January 18, 2016. January 20, 2016 रोजी पाहिले.
  2. Lipshutz, Jason (January 13, 2015). "Sean Douglas, Michael Keaton's Son, on Writing for Madonna and Downplaying His Family Ties". The Hollywood Reporter.
  3. "All About Michael Keaton's Son Sean Douglas". March 17, 2024.
  4. Macke, Johnni (June 15, 2021). "Courteney Cox's Dating History: From Michael Keaton and David Arquette to Johnny McDaid". Us Magazine. April 7, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 9, 2022 रोजी पाहिले.
  5. Andersson, Eric (September 6, 2025). "Michael Keaton Met His Longtime Girlfriend in a Chance Encounter in L.A.: 'I Kind of Went, Woah' (Exclusive)". People (इंग्रजी भाषेत). May 2, 2025 रोजी पाहिले.