Jump to content

मानसी पारेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Manasi Parekh Gohil (es); માનસી પારેખ ગોહિલ (gu); Manasi Parekh Gohil (ast); Manasi Parekh Gohil (ca); Manasi Parekh Gohil (de); Manasi Parekh Gohil (ga); Manasi Parekh Gohil (da); مانسی پاریکھ گوہیل (pnb); マナシ・パレク (ja); Manasi Parekh Gohil (tet); Manasi Parekh (ha); Manasi Parekh Gohil (sv); ಮಾನಸಿ ಪರೇಖ್ (ನಟಿ) (tcy); मानसी पारेख गोहिल (hi); మానసి పరేఖ్ (te); Manasi Parekh Gohil (fi); Manasi Parekh Gohil (map-bms); Manasi Parekh Gohil (it); মানসী পারেখ (bn); Manasi Parekh Gohil (fr); Manasi Parekh Gohil (jv); मानसी पारेख (mr); Manasi Parekh Gohil (pt); Manasi Parekh Gohil (bjn); Manasi Parekh Gohil (nl); Manasi Parekh Gohil (sl); Manasi Parekh Gohil (bug); Manasi Parekh Gohil (pt-br); Manasi Parekh Gohil (sq); Manasi Parekh Gohil (id); Manasi Parekh Gohil (nn); Manasi Parekh Gohil (nb); Manasi Parekh Gohil (su); Manasi Parekh Gohil (min); Manasi Parekh Gohil (gor); ಮಾನಸಿ ಪರೇಖ್ (kn); ماناسى پاريخ جوهيل (arz); Manasi Parekh Gohil (en); ਮਾਨਸੀ ਪਾਰੇਖ (pa); ماناسی پاریکھ (ur); Manasi Parekh Gohil (ace) actriz india (es); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); индийская актриса (ru); actores a aned yn 1986 (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر و خواننده هندی (fa); 印度女演員 (zh); indisk sanger og skuespiller (da); actriță indiană (ro); indisk sångare och skådespelare (sv); שחקנית הודית (he); ureueng meujangeun asai India (ace); भारतीय अभिनेत्री (hi); మహారాష్ట్ర రాష్ట్రానికి చెందిన టివి, సినిమా నటి, గాయని, నిర్మాత. (te); ਭਾਰਤੀ ਅਭਿਨੇਤਰੀ (pa); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); Indian actress (en); actriz indiana (pt); actriz india (gl); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); pemeran asal India (id); indisk songar og skodespelar (nn); indisk sanger og skuespiller (nb); Indiaas actrice (nl); panyanyi (mad); Indian actress (en-gb); індійська акторка (uk); baaŋa ŋun nyɛ paɣa (dag); Indian actress (en); ممثلة هندية (ar); actriu índia (ca); intialainen näyttelijä (fi)
मानसी पारेख 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै १०, इ.स. १९८६
अहमदाबाद
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००८
नागरिकत्व
व्यवसाय
वैवाहिक जोडीदार
  • Parthiv Gohil
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मानसी पारेख ही एक भारतीय अभिनेत्री, गायिका, निर्माती आणि कंटेंट क्रिएटर आहे. स्टार प्लसवरील जिंदगी का हर रंग... गुलाल या मालिकेत गुलाल या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. सोबत तिने सुमित संभाल लेग मध्ये मायाची भूमिका केली आहे. २०२४ मध्ये कच्छ एक्सप्रेस या चित्रपटातील मोंघीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[][]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

मानसी पारेख ही एक गुजराती आहे जी मुंबईत जन्मली आणि वाढली.[] मुंबईत जन्मलेली असूनही, तिचे गुजरातशी एक मजबूत सांस्कृतिक नाते आहे आणि ती वारंवार गुजरातला भेट देते. ती संगीताच्या आवडीने वाढली आणि पुरुषोत्तम उपाध्याय यांची चाहती आहे.[] तिचे लग्न संगीतकार व गायक पार्थिव गोहिलशी झाले आहे आणि त्यांना एक मुलगी निर्वी गोहिल आहे. पार्थिवने सावरिया चित्रपटातील "युं शबनमी" हे गाणे गायले आहे.[]

कारकीर्द

[संपादन]

मानसीला शालेय जीवनापासूनच संगीत आणि अभिनयाची आवड होती. तिने शालेय कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतला आणि २००३ मध्ये चॅनल व्ही च्या पॉप स्टार (सीझन २) चा भाग होती, जिथे ती आयुष्मान खुरानासोबत ८ शेवटच्या स्पर्धकांपैकी एक होती. तिने २००४ मध्ये कितनी मस्त है जिंदगी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, परंतु २००५ मध्ये स्टार वनच्या इंडिया कॉलिंग या मालिकेद्वारे तिला लोकप्रियता मिळाली. तिने झी टीव्हीवरील गायन रिॲलिटी शो स्टार या रॉकस्टार जिंकला. मानसी स्टार प्लसवरील प्राइम-टाइम शो गुलालमध्येही दिसली होती आणि ९एक्स च्या रिमोट कंट्रोल आणि स्टार वनच्या लाफ्टर के फटके सारख्या शोमध्येही दिसली होती. एप्रिल २०१२ मध्ये, ती अभिनेता शिव पंडित यांच्यासोबत तमिळ प्रणय चित्रपट लीलाई मध्ये दिसली.[] मानसीने ये कैसी लाईफ या चित्रपटातून हिंदीमध्ये पदार्पण केले, ज्याचा प्रीमियर गोव्यात झालेल्या इफ्फी महोत्सवात झाला.

२०१९ मध्ये, तिने डू नॉट डिस्टर्ब या गुजराती वेब सिरीजमधून निर्माती म्हणून पदार्पण केले.[] २०१९ मधील उरी: द सर्जिकल स्ट्राईक मध्ये ती मोहित रैनाच्या पत्नी व विक्की कौशलच्या बहिणीच्या भूमीकेत दिसली.[] २०२० मध्ये, तिने गोलकेरी या चित्रपटातून गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण केले जे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले.[] ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, २०२४ मध्ये कच्छ एक्सप्रेस चित्रपटातील मोंघीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, आणि हा सन्मान मिळवणारी ती पहिली गुजराती अभिनेत्री ठरली.[][][] तिचा पुढचा चित्रपट हा हॉरर कॉमेडी झमकुडी (२०२४) व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Manasi Parekh reacts to winning National Film Award for Best Actress: Big win for me as a working mother". Hindustan Times. 16 August 2024.
  2. ^ a b "National Awards 2024: Nithya Menen, Manasi Parekh Win Best Actress For Thiruchitrambalam, Kutch Express". News18 (इंग्रजी भाषेत). 16 August 2024.
  3. ^ a b Jambhekar, Shruti (10 April 2014). "Manasi Parekh Gohil's love for Gujarati culture". The Times of India. 23 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 May 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Manasi Parekh Gohil: With Nirvi's birth, many things became insignificant for me". The Times of India. 12 May 2018. 16 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  5. ^ "Hindi actors learn Tamil for good performance in 'Leelai'". 23 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 July 2015 रोजी पाहिले.
  6. ^ "Manasi Parekh Gohil turns producer; dons a dual role of actor and producer for 'Do Not Disturb'". The Times of India. 14 August 2019. 9 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  7. ^ "'Friends were jealous of me', says Manasi Parekh Gohil who plays Vicky Kaushal's sister in URI". Daily News Analysis. 25 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  8. ^ Jambhekar, Shruti (27 May 2020). "Malhar Thakar and Manasi Parekh starrer Golkeri all set for a digital release". The Times of India. 19 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 May 2020 रोजी पाहिले.
  9. ^ a b Hungama, Bollywood (19 August 2024). "Manasi Parekh on winning the National Award for Kutch Express, "It's a great sense of validation for my hard work" : Bollywood News - Bollywood Hungama". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 21 August 2024 रोजी पाहिले.