मानवेंद्रनाथ रॉय
Appearance
मानवेंद्रनाथ रॉय | |
---|---|
जन्म: | २१ मार्च, इ.स. १८८७ |
मृत्यू: | २५ डिसेंबर, इ.स. १९५४ देहरादून, भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळ |
प्रभाव: | जतीन मुखर्जी लेनीन |
पत्नी: | ईव्हलीन ट्रेंट-रॉय, एलन गॉटशॉक-रॉय |
मानवेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य[१], (२१ मार्च, इ.स. १८८७ - २५ डिसेंबर, इ.स. १९५४) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली-भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते. 1934ला सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना त्यांनी मांडली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या सशस्त्र क्रांतिकार्यात सामील झालेल्या रॉय यांना उत्तरायुष्यात मेक्सिको, रशिया, अफगाणिस्तान, चीन इत्यादी देशांत केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामवंत साम्यवादी विचारवंत म्हणून मान्यता लाभली. यांनी स्थापन केलेला मेक्सिकन साम्यवादी पक्ष हा सोव्हिएत संघाबाहेरील पहिला साम्यवादी पक्ष होता. यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस साम्यवादाचा त्याग करून जहाल मानवतावाद [२] पुरस्कारला.
संदर्भ व नोंदी
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |