माझा प्रवास (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माझा प्रवास अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकीकत

लेखक विष्णूभट गोडसे वरसईकर
प्रथमावृत्ती १९०७

माझा प्रवास हे विष्णूपंत गोडसे भटजी ह्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. १८५७ च्या धामधुमीच्या काळातील केलेल्या प्रवासाचा अनुभव ह्या पुस्तकात ग्रथित झाला आहे. हे पुस्तक चिंतामण विनायक वैद्य ह्यांनी गोडसे भटजींच्या मृत्यूनंतर, म्हणजे १९०७ साली माझा प्रवास : सन १८५७ च्या बंडाची हकीकत ह्या नावाने प्रकाशित केले.[१]

गोडसे भटजी ह्यांनी उत्तर कोकणातील वरसई ह्या गावापासून ग्वाल्हेरला आपल्या काकांसोबत केलेल्या प्रवासाची हकीकत ह्या पुस्तकात आली आहे.

या मध्ये त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्यादेखील लिहिलेली आहे .

संदर्भनोंदी[संपादन]

  1. ^ देशपांडे २०१०, पान. १४९.

संदर्भसूची[संपादन]

  • देशपांडे, प्राची. इतिहासलेखनमीमांसा / निवडक समाज प्रबोधन पत्रिका : खंड १.

बाह्य दुवे[संपादन]

माझा प्रवास ह्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची पीडीएफ प्रत