Jump to content

माचोई हिमनदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माचोई हिमनदी एक ९ किलोमीटर लांब[] हिमालय पर्वत श्रेणीच्या ईशान्यभागात वसलेली हिमनदी आहे. ही हिमनदी भारताच्या लडाख प्रदेशातील द्रास पासून ३० किमी पश्चिमेकडे, सॉनमार्ग पासून ८ किमी पूर्वेकडे आणि राष्ट्रीय महामार्ग १-Dच्या दक्षिणेस झोजी ला येथे सरासरी ४८०० मीटर उंचीवर आहे.

या हिमनदीच्या नावावर उंच शिखर म्हणजे माचोई पीक, हिमनदीच्या पूर्व टोकाला, ५४५८ मीटर उंचीवर आहे. या हिमनदीतून पश्चिमेस वाहणारी सिंद नदी आणि पूर्वेकडे वाहणारी द्रास नदी उगम पावतात. []

जागतिक तापमानवाढीमुळे माचोई, इतर हिमालयीन हिमनदांप्रमाणेच भीषण दराने वितळत आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Machoi glacier" (PDF). 2013-12-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2012-04-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Jammu Kashmir Geography Rivers". mapsofindia.com. 19 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-04-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Himalayan glaciers melting". rediff.com. 4 January 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-04-26 रोजी पाहिले.