मांडू (मध्य प्रदेश)
Appearance
uninhabited ancient city in the present-day Mandav area of the Dhar district, Madhya Pradesh, India | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | ancient city, पुरातत्व स्थळ | ||
|---|---|---|---|
| स्थान | धार जिल्हा, इंदूर विभाग, मध्य प्रदेश, भारत | ||
![]() | |||
| |||
मांडू किंवा मांडवगड हे धार जिल्ह्यातील सध्याच्या मांडव क्षेत्रातील एक प्राचीन शहर आहे. हे भारतातील पश्चिम मध्य प्रदेशातील मालवा आणि निमार प्रदेशात धार शहरापासून ३५ किमी अंतरावर आहे. ११ व्या शतकात, मांडू हे तरंगगड किंवा तरंग राज्याचा उपविभाग होता.[१] इंदूरपासून सुमारे १०० किमी (६२ मैल) अंतरावरील खडकाळ उतारावर वसलेले हे किल्लेदार शहर येथील वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.[२][३]
१९९८ मध्ये ह्या प्राचीन शहराला भारतच्या जागतिक वारसा स्थानांच्या तात्पुरती यादी जोडले गेले.[४] १९७७ च्या बॉलीवूड चित्रपट किनारा आणि त्यातील "नाम गुम जायेगा" या गाण्याचे चित्रीकरण मांडूमध्ये झाले होते.
-
रूपमतीचा मंडप
-
माडू किल्ल्यामध्ये असलेले कपूर तलाव
-
बाज बहादूरच्या राजवाड्याचे मुख्य अंगण.
-
रेवा कुंड - रूपमतीच्या मंडपाला पाणीपुरवठा करणारा जलाशय.
-
जामी मशिदीचे अंगण.
-
होशांग शाहची समाधी
-
जहाज महल
-
दाई की महाल
-
हिंदोळा महालाच्या कमानी
संदर्भ
[संपादन]- ^ "Report on Demonstration of Renewable Energy Systems at Royal Fortress, Mandu" (PDF). Mnre.gov.in. 3 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-01-22 रोजी पाहिले.
- ^ Ajai Pal Singh; Shiv Pal Singh (1994). Monuments of Mandu. Agam Kala Prakashan. p. 8. ISBN 978-81-7320-004-5.
- ^ Mandu: Travel Guide. Goodearth Publications. 2009. p. 7. ISBN 978-81-87780-94-6.
- ^ "Group of Monuments at Mandu, Madhya Pradesh". UNESCO World Heritage Centre. May 16, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2022 रोजी पाहिले.
