Jump to content

महेश लांडगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महेश किसन लांडगे
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
भोसरी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

महेश किसन लांडगे मराठी राजकारणी आहेत. हे भोसरी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

राजकीय प्रवास[संपादन]

विद्यार्थीदशेत असताना महेश लांडगे यांनी एन.एस.यु.आय. या काँग्रेस पक्षाच्या विध्यार्थी आघाडीतून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. २००२ साली महेश लांडगे यांनी प्रथम पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढविली त्यात त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर २००४ साली एका पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक झाले. तेव्हापासून सलग तीनदा ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले.[१] २०१४ साली त्यांनी प्रथमच भोसरी विधासभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. त्यानंतर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि २०१९ साली दुसऱ्यांदा भोसरी विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला.[२]


सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत महेश लांडगे यांनी चिखली येथे भरविली होती.[३] बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठावी यासाठी महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "महेश लांडगे : क्रीडाप्रेमी आमदार | mahesh landge sports enthusiast person | Loksatta". web.archive.org. 2023-01-27. Archived from the original on 2023-01-27. 2023-09-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ ब्यूरो, सरकारनामा (2023-01-18). "Mahesh Landge News : भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या राजकीय जीवनात 'हा' ठरला 'टर्निंग पॉईंट'". Sarkarnama. 2023-09-28 रोजी पाहिले.
  3. ^ सरकारनामा, उत्तम कुटे: (2022-05-14). "आमदार महेश लांडगे घेणार देशांतील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत; दीड कोटींची बक्षिसेही". Sarkarnama. 2023-09-28 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
  4. ^ "'बैलगाडा शर्यत' माझ्यासाठी राजकीय विषय नाही, तर माझ्या अस्मितेचा प्रश्न; काय म्हणाले आमदार लांडगे? Satara". eSakal - Marathi Newspaper. 2023-09-28 रोजी पाहिले.