महाराष्ट्रातील सैनिकी शाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात ३९ सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी औरंगाबादची सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्था (Services Preparatory Institute,SPI) साताऱ्यातील सैनिक स्कूल आणि पुण्याची श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (SSPMS) या अधिक प्रसिद्ध आहेत. ३९ शाळांपैकी तीन कायम विनाअनुदित असून, पुण्यातली एक शाळा खासगी आहे. मुलींसाठी एकूण तीन सैनिकी शाळा आहेत. ३२ मुलांच्या शाळांना आणि तीन मुलींच्या शाळांना प्रत्येकी १ कोटी ८० लाख रुपये सरकारी अनुदान मिळते. १९९८पासून ते २०१९ सालर्यंत २०० कोटी रुपये अनुदान दिले गेले आहे.

महाराष्ट्रातील जिल्हावार शाळांची नावे[संपादन]

जिल्ह्याचे नाव नाशिक शाळेचे नाव
अहमदनगर १. विखे पाटील शाळा, प्रवरानगर. २. संजीवनी विद्यालय, कोपरगाव
अकोला नॅशनल मिलिटरी स्कूल, गायगाव
अमरावती दीपशिखा गुरुकुल शाळा, चिखलदरा
उस्मानाबाद तुळजाभवानी शाळा, तुळजापूर
औरंगाबाद १. सर्व्हिसेस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट(SPI). २.इंदिरा गांधी स्कूल, जावडा. ३. राजे संभाजी स्कूल, कांचनवाडी
कोल्हापूर तात्यासहेब कोरे शाळा, विजयनगर (हातकणंगले तालुका)
गडचिरोली सैनिकी स्कूल, गडचिरोली
गोंदिया मनोहरभाई पटेल स्कूल, गोंदिया
चंद्रपूर सन्मित्र विद्यालय, विसापूर
जळगाव विजय नाना पाटील स्कूल, जळगाव
जालना मत्स्योदरी सैनिकी स्कूल, जालना
ठाणे भारतीय विद्यालय, घोडबंदर
धुळे श्री छत्रपती शिवाजी सैनिकी शाळा, मोराणे
नंदुरबार गावित सैनिक शाळा, पथराई
नागपूर भोसला मिलिटरी स्कूल, नागपूर
नांदेड शाहू सैनिकी विद्यालय, बिलोली
परभणी १.नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, परभणी २.पृथ्विराज देशमुख मुलींची सैनीकी शाळा, धर्मापुरी, परभणी
पुणे १. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा. २. श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
बीड सैनिकी विद्यालय, पिंपळगव्हाण
बुलढाणा राजीव गांधी स्कूल, कोलवड
भंडारा वाघाये शाळा, लाखनी
यवतमाळ ईश्वर देशमुख शाळा, दिग्रस
रत्‍नागिरी संभाजीराजे स्कूल, जामगे
रायगड कीर्ती विजय आर्मी स्कूल, अलिबाग ?
लातूर शाहू महाराज शाळा, उदगीर
वर्धा इंडियन मिलिटरी स्कूल, पुलगाव
वाशीम यशवंतराव चव्हाण शाळा, सुपखेला
सांगली दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा, तासगाव
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सैनिकी शाळा, अंबोली
सोलापूर जय जवान जय किसान सैनिकी शाळा, सोलापूर
हिंगोली सैनिकी विद्यालय, कळमनुरी