चिमणाबाई द्वितीय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराणी चिमणाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराणी चिमणाबाई - सोबत कन्या इंदिरादेवी

महाराणी चिमणाबाई (जन्म १८७२ - मृत्यू २३ ऑगस्ट १९५८), यांना चिमणाबाई (द्वितीय) म्हणूनही ओळखले जाते. त्या बडोदा, गुजरात, ब्रिटिश भारतातील संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या द्वितीय पत्नी होत्या.

चरित्र[संपादन]

१८८५ मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्याशी विवाह केल्यावर श्रीमंत लक्ष्मीबाई मोहिते या चिमणाबाई [१] झाल्या.

मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या चिमणाबाई यांनी, पर्दा पद्धत आणि बालविवाह पद्धत रद्द करण्यासाठीही काम केले. एक प्रगतिशील महिला म्हणून त्या ओळखल्या जातात.[२]

आणि १९२७ मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या [३] [४] द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ (१९११) या ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत. [५]

अन्य माहिती[संपादन]

  • त्यांची मुलगी इंदिरा देवी कूचबिहारचे महाराज जितेंद्र नारायण यांची पत्नी झाली. [६][७]
  • १९३० साली चिमणाबाई यांना योगी श्रीअरविंद यांनी योगसाधनेसंबंधी मार्गदर्शन केले होते. ते पत्र उपलब्ध आहे. [८]
  • चित्रकार राजा रविवर्मा यांनी १८८९ मध्ये त्यांचे पोर्ट्रेट पेंटिंग केले होते.[९]

ग्रंथ[संपादन]

  • चिमणाबाई द्वितीय आणि सिद्ध मोहना मित्रा, द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ (१९११), न्यू यॉर्क, लाँगमन, ग्रीन आणि कंपनी

अधिक वाचन[संपादन]

  • मूर, लुसी (२००४) महाराणीज: द लाइव्हस अँड टाइम्स ऑफ थ्री जनरेशन्स ऑफ इंडियन प्रिन्सेसेस (महाराणी: भारतीय राजकन्यांच्या तीन पिढ्यांचे जीवन आणि काळ). लंडन: वायकिंग आयएसबीएन 0-670-91287-5
  • कलेक्टेड वर्क्स ऑफ श्रीअरबिंदो, खंड ३६

संदर्भ[संपादन]

  1. ^ Taylor, Miles (2018). "9. Mother of India". Empress: Queen Victoria and India (इंग्रजी भाषेत). New Haven: Yale University Press. p. 202. ISBN 978-0-300-11809-4.
  2. ^ "Personalia / Chimnabai II, Maharani of Baroda". sri-aurobindo.co.in. 2023-03-29 रोजी पाहिले.
  3. ^ "Past Presidents". AIWC: All India Women's Conference. Archived from the original on 19 March 2014. 2014-03-19 रोजी पाहिले.
  4. ^ Geraldine Forbes; Geraldine Hancock Forbes (28 April 1999). Women in Modern India. Cambridge University Press. pp. 79–. ISBN 978-0-521-65377-0.
  5. ^ Jhala, Angma Dey (2014). "8. Memoirs of Maharanis: the politics of marriage, companionship, and love in late-colonial princely India". In Towheed, Shafquat (ed.). New Readings in the Literature of British India, c. 1780-1947 (इंग्रजी भाषेत). Columbia University Press. pp. 193–209. ISBN 978-3-8382-5673-3.
  6. ^ Poddar, Abhishek; Gaskell, Nathaniel; Pramod Kumar, K. G; Museum of Art & Photography (Bangalore, India) (2015). "Catalogue". Maharanis: women of royal India (English भाषेत). Ahmedabad: Mapin Publishing. pp. 75–105. ISBN 978-93-85360-06-0. OCLC 932267190.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ Sujata Nahar (1997). Mother's chronicles - Book 05. INSTITUT DE RECHERCHES EVOLUTIVES, Paris and Mira Aditi, Mysore. ISBN 81-85137-28-5.
  8. ^ श्रीअरविंद. "महाराणी चिमणाबाई यांना लिहिलेले पत्र". अभीप्सा (मराठी मासिक). ऑगस्ट २०१८.
  9. ^ "Maharani Chimnabai II - Raja Ravi Varma". Google Arts & Culture (इंग्रजी भाषेत). 2023-03-29 रोजी पाहिले.