Jump to content

महाराजगंज (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराजगंज लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या वायव्य भागातील नेपाळ देशाच्या सीमेजवळील महाराजगंज परिसरात स्थित असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघ महाराजगंज जिल्ह्यात आहेत. महाराजगंज ह्याच नावाचा मतदारसंघ बिहार राज्यात देखील आहे.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ महाराजगंजमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ फारेंद्र महाराजगंज
२ नौतनवा
३ सिसवा
४ महाराजगंज
५ पनियारा

खासदार

[संपादन]
पंकज चौधरी हे भाजपचे वरिष्ठ नेते येथून आजवर ७ वेळा निवडून आले आहेत
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९९१ दहावी पंकज चौधरी भारतीय जनता पक्ष
१९९६ अकरावी
१९९८ बारावी
१९९९ तेरावी कुंवर अखिलेश सिंह समाजवादी पक्ष
२००४ चौदावी पंकज चौधरी भारतीय जनता पक्ष
२००९ पंधरावी हर्षवर्धन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सोळावी पंकज चौधरी भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी

हे सुद्धा पहा

[संपादन]