Jump to content

महाभारतातील घराणी आणि व्यक्तिरेखा (यादी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्र. घराण्याचे नाव /

प्रमुखाचे नाव

प्रांत संबंधित व्यक्ती परस्परसंबंध
कुरु वंश (कौरव-पांडव यांच्या आधीचा) हस्तिनापूर राजा प्रतीप, शंतनू, गंगा, सत्यवती (योजनगंधा), व्यास (कृष्ण द्वैपायन), भीष्म (देवव्रत), चित्रांगद, विचित्रवीर्य, अंबा, अंबिका, अंबालिका, विदुर
  • राजा प्रतीप - शंतनू (द्वितीय पुत्र) यांचे पिता
  • महाभिष - शंतनू राजाचा पूर्वजन्म
  • राजा शंतनू यांच्या पत्नी - गंगा (पहिली पत्नी) आणि सत्यवती (दुसरी पत्नी)
  • राजा शंतनू यांचे तीन पुत्र - भीष्म (गंगापुत्र), चित्रांगद, विचित्रवीर्य (सत्यवती-पुत्र)
  • भीष्म - राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र
  • कृष्णद्वैपायन व्यास - सत्यवती आणि ऋषी पराशर यांचा पुत्र
  • चित्रांगद - राजा शंतनू व सत्यवती यांचा ज्येष्ठ पुत्र
  • विचित्रवीर्य - राजा शंतनू व सत्यवती यांचा धाकटा पुत्र
  • अंबिका व अंबालिका - विचित्रवीर्य राजाच्या पत्नी
  • अंबिका - धृतराष्ट्र राजाची माता
  • अंबालिका - पंडू राजाची माता
  • विदुर - (व्यास आणि दासीपुत्र) धृतराष्ट्राचा व पंडूचा सावत्रभाऊ
काशी राजा काशी अंबा, अंबिका, अंबालिका []
  • काशीच्या राजाच्या तीन कन्या - अंबा, अंबिका, अंबालिका
  • अंबा - पुढील जन्मात शिखंडीच्या रूपात जन्म
पांडव इंद्रप्रस्थ पंडू, कुंती, माद्री, युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी, उलूपी, सुभद्रा, चित्रांगदा,अभिमन्यू, हिडिंबा, घटोत्कच, बभ्रुवाहन परीक्षित, इरावान, अहिलावती, बारबरिका, जनमेजय, वज्र, प्रतिविंध्य तथा श्रुतविंध्य, श्रुतसोम, शतानिक तथा सुतसोम, श्रुतकर्मा, श्रुतसेन
  • कुंती - राजा पंडू याची पत्नी आणि युधिष्ठिर (यमपुत्र), भीमसेन (वायूपुत्र), अर्जुन (इंद्रपुत्र) यांची माता
  • माद्री - राजा पंडू याची द्वितीय पत्नी आणि नकुल, सहदेव (अश्विनीकुमारांचे पुत्र) यांची माता
  • द्रौपदी - द्रुपद राजाची कन्या व पांडवांची पत्नी
  • अर्जुनाच्या पत्नी - द्रौपदी, उलूपी (नागकन्या), चित्रांगदा, सुभद्रा
  • श्रुतकर्मा - अर्जुन व द्रौपदी यांचा पुत्र
  • बभ्रुवाहन - अर्जुन आणि चित्रांगदा यांचा पुत्र
  • इरावान - अर्जुन आणि उलूपी यांचा पुत्र
  • अभिमन्यू - अर्जुन आणि सुभद्रा यांचा पुत्र
  • हिडिंबा - भीमाची पत्नी
  • घटोत्कच - भीम व हिडिंबा यांचा पुत्र
  • अहिलावती - घटोत्कचाची पत्नी
  • बारबरिका - घटोत्कच आणि अहिलावती यांचा पुत्र
  • परीक्षित - अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र
  • जनमेजय - अर्जुनाचा नातू, परीक्षित राजाचा मुलगा
  • प्रतिविंध्य तथा श्रुतविंध्य - युधिष्ठिर व द्रौपदी यांचा पुत्र
  • श्रुतसोम - भीम व द्रौपदी यांचा पुत्र
  • शतानिक तथा सुतसोम - नकुल व द्रौपदी यांचा पुत्र
  • श्रुतसेन - सहदेव व द्रौपदी यांचा पुत्र
गोवसन राजा देवकी
  • देवकी - गोवसन राजाची कन्या आणि युधिष्ठिराची पत्नी
  • यौध्येय - युधिष्ठिर आणि देवकी यांचा पुत्र
काशी नरेश काशी वलंधरा
  • वलंधरा - काशी नारेशाची कन्या आणि भीमाची पत्नी
  • सर्वग - भीम व वलंधरा यांचा पुत्र
चेदी नरेश कारुण्यमती
  • कारुण्यमती - चेदी नरेशची कन्या आणि नकुलाची पत्नी
  • निर्मित - नकुल व कारुण्यमती यांचा पुत्र
द्युतिमत राजा मद्र देश विजया
  • विजया - द्युतिमत राजाची कन्या आणि सहदेवाची पत्नी
  • सुहोत्र - सहदेव व विजया यांचा पुत्र
पांडव-पक्ष श्रीकृष्ण, धृष्टद्युम्न, शिखंडी, सात्यकी, द्रुपद, विराट, चेकीतन,

कैकय, पांड्य, चोल, केरला आणि मगध

कौरव धृतराष्ट्र, युयुत्सु, गांधारी, दुर्योधन, दुःशासन, विकर्ण, सुवर्मा, दुःशला, मयुरी,श्रीमती, सुचिता, भानुमती, लक्ष्मण , लक्ष्मणा
  • गांधारी - धृतराष्ट्राची पत्नी, दुर्योधनादी १०० पुत्रांची माता
  • दुःशला - दुर्योधानादी भावांची भगिनी
  • युयुत्सु - धृतराष्ट्राचा पुत्र
  • दुर्योधनाच्या पत्नी - मयुरी,श्रीमती, सुचिता आणि भानुमती
  • दुर्योधनाचे बंधू - दुःशासन, विकर्ण, सुवर्मा
  • दुर्योधनाची मुले - लक्ष्मण (पुत्र) व लक्ष्मणा (कन्या)
१० कौरव-पक्ष संजय, जयद्रथ, कृपाचार्य, भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, शकुनी, भगदत्त, दुर्योधन, दुःशासन, कृतवर्मा, अश्वत्थामा, शल्य, भुरीसर्वास, सुदक्षिण, बहलीका, राजा सुशर्मा (त्रिगर्त), राजा इंद्रवर्मा, जरासंध, शिशुपाल, अलंबुश, जयत्सेन, चित्रसेन, श्रुतकर्मन
  • संजय - धृतराष्ट्र राजाचा सारथी
११ राजा शूरसेन मथुरा शूरसेन, उग्रसेन, पृथा (कुंती)
  • कुंती / पृथा - शूरसेन राजाची कन्या
  • वसुदेव - शूरसेनाचा मुलगा, कृष्णाचे पिता
  • वसुदेव - कुंतीचे थोरले बंधू
  • वसुदेवाच्या पत्नी - देवकी, रोहिणी
  • उग्रसेन - शूरसेनाचा भाऊ
  • कंस - उग्रसेनाचा पुत्र
  • देवकी - कंसाची बहीण
१२ राजा कुंतिभोज कुंती (आधीची पृथा)
  • कुंती - राजा कुंतिभोजची दत्तक कन्या व पांडवांची माता
१३ राजा सुबल गांधार (म्हणजे हल्लीचा अफगाणिस्तान) - राजधानी तक्षशिला गांधारी, शकुनी
  • गांधारी - सुबल राजाची कन्या, धृतराष्ट्राची पत्नी, दुर्योधनादी १०० पुत्रांची माता
  • शकुनी - गांधारीचा भाऊ, दुर्योधनादी कौरवांचा मामा
१४ राजा द्रुपद पांचाल

(सौराष्ट्र)

(पांडव-पक्ष) द्रुपद, द्रौपदी, धृष्टद्युम्न, शिखंडी
  • द्रौपदी - द्रुपद राजाची कन्या
  • धृष्टद्युम्न - द्रुपदाचा पुत्र आणि द्रौपदी व शिखंडीचा भाऊ.
  • द्रुपद व द्रोणाचार्य - एकेकाळचे मित्र व नंतर शत्रू
१५ राजा जयद्रथ सिंधु, शिबिसौवीर देश वृद्धक्षत्र, जयद्रथ, दुःशला, सुरथ,

बलाहक, आनीक, विदारण आदि सहा भाऊ

  • वृद्धक्षत्र - जयद्रथ राजाचे पिता
  • दुःशला - गांधारीची कन्या आणि जयद्रथ राजाची पत्नी
  • सुरथ - जयद्रथ राजाचा पुत्र
  • बलाहक, आनीक, विदारण इत्यादी - जयद्रथ राजाचे बंधू
१६ यादव वंश / यदुकुळ द्वारका देवकी आणि वडील वसुदेव, नंदयशोदा, श्रीकृष्ण, बलराम, सुभद्रा, रुक्मिणी, सत्यभामा, कालिन्दी, जाम्बवती, भद्रा, मित्रविन्दा, लक्ष्मण, सत्या, शूरसेन, प्रद्युम्न, अनिरुद्ध, कृतवर्मा, सात्यकी, उग्रसेन, दारुक, राजा देवपा किंवा देवका, देवकी, रोहिणी, कंस, यदुउद्धव, देवश्रवा, शत्रुघ्न, देवभाग, कुंती (मुळातली यदुवंशातील)
  • शूरसेन आणि भोजराजकुमारी - वसुदेवाचे मातापिता
  • देवकी आणि वसुदेव - श्रीकृष्णाचे मातापिता
  • नंद व यशोदा - श्रीकृष्णाचे पालनकर्ते मातापिता, नंद हा वसुदेवाचा चुलत भाऊ
  • बलराम - श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू
  • श्रीकृष्णाच्या पत्नी - रुक्मिणी, सत्यभामा, कालिन्दी, जाम्बवती, भद्रा, मित्रविन्दा, लक्ष्मणा, सत्या
  • सुभद्रा - श्रीकृष्णाची भगिनी व अर्जुनाची पत्नी
  • कुंती - शूरसेनाची कन्या (कुंतिभोजाला दत्तक दिलेली)
  • प्रद्युम्न - श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा ज्येष्ठ पुत्र
  • अनिरुद्ध - श्रीकृष्णाचा नातू
  • सात्यकी - कृष्णमित्र व कृष्णभक्त
  • उग्रसेन - कंसाचे वडील
  • देवकी - राजा देवकाची कन्या, श्रीकृष्णाची माता
  • कंस - देवकीचा चुलत भाऊ
  • यदु - राजा ययाति व देवयानी यांचा थोरला पुत्र
  • उद्धव - देवभाग याचा पुत्र (श्रीकृष्णाचा चुलत भाऊ)
  • शत्रुघ्न - देवश्रवा याचा पुत्र (श्रीकृष्णाचा चुलत भाऊ)
१७ राजा कर्ण अंग देश (कौरव पक्ष) कर्ण, अधिरथ, राधा, वृषाली, वृषसेन
  • कर्ण - जन्मदाते माता-पिता म्हणजे कुंती व सूर्य
  • कर्ण - संगोपन करणारे माता-पिता म्हणजे राधा व अधिरथ
  • वृषाली - कर्णाची पत्नी
  • वृषसेन - कर्णाचा पुत्र
१८ राजा विराट (पांडव-पक्ष) राजा विराट, सुदेष्णा, उत्तर, उत्तरा, कीचक
  • सुदेष्णा - राजा विराटाची पत्नी
  • उत्तर - राजा विराटाचा पुत्र
  • उत्तरा - राजा विराटाची कन्या (व नंतर अभिमन्यूची पत्नी)
  • कीचक - राजा विराटाचा मेहुणा आणि सेनापती
१९ राजा अश्वपती मद्र देश अश्वपती, मालवी, सावित्री
  • मालवी - अश्वपतीची पत्नी व सावित्रीची माता
  • सावित्री - अश्वपतीची कन्या (व नंतर सत्यवानाची पत्नी)
२० राजा द्युमत्सेन शाल्व देश द्युमत्सेन, सुप्रसन्ना / शैब्या, सत्यवान, सावित्री
  • सुप्रसन्ना / शैब्या [] - राजा द्युमत्सेनची पत्नी
  • सत्यवान - द्युमत्सेन राजाचा पुत्र
  • सावित्री - सत्यवानाची पत्नी
२१ राजा शल्य मद्र देश शल्य, माद्री
  • माद्री - राजा शल्य यांची बहीण व राजा पंडू यांची पत्नी, नकुल आणि सहदेव यांची माता
२२ कृपाचार्य (कौरव पक्ष)
  • कृपाचार्य - कौरव-पांडव यांचे आचार्य
२३ द्रोणाचार्य (कौरव पक्ष) द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कृपी
  • द्रोणाचार्य - भारद्वाज ऋषी आणि अप्सरा घृताची यांचा पुत्र
  • परशुराम - द्रोणाचार्य यांचे गुरूद्रोणाचार्य व कृपी - पती-पत्नी
  • अश्वत्थामा - द्रोणाचार्य व कृपी यांचा पुत्र
  • द्रोणाचार्य - कौरव-पांडव यांचे आचार्य
२४ चित्रवाहन मणिपूर चित्रवाहन, चित्रांगदा
  • चित्रांगदा - चित्रवाहन राजाची कन्या व अर्जुनाची पत्नी
२५ राजा सुशर्मा (त्रिगर्त) (कौरव पक्ष)
२६ एकलव्य शृंगावेर राज्य (प्रयाग) हिरण्यधनु, एकलव्य
  • हिरण्यधनु - एकलव्याचे पिता
२७ राजा इंद्रवर्मा मालव देश (कौरव पक्ष)
  • राजा इंद्रवर्मा याच्याकडे अश्वत्थामा नावाचा हत्ती होता.
२८ राजा जरासंध मगध (कौरव पक्ष)
  • जरासंध - कंसाचा सासरा
२९ राजा कंस मथुरा
  • कंस - श्रीकृष्णाचा मामा
३० भीष्मक
  • भीष्मक - श्रीकृष्णाचा सासरा
३१ शिशुपाल चेदी (कौरव पक्ष),
  • शिशुपाल - श्रीकृष्णाचा आत्येभाऊ
३२ शाल्व राजा (श्रीकृष्ण-विरोधी पक्ष)
  • श्रीकृष्णाचे विरोधक
३३ दंतवक्र राजा (श्रीकृष्ण-विरोधी पक्ष)
  • श्रीकृष्णाचे विरोधक
३४ निषाद राजा शृंगवेरपूरचा राजा हिरण्यधनु आणि सुलेखा, यदुकुळातील शत्रुघ्न (एकलव्य), सुनीता
  • शत्रुघ्न - हिरण्यधनु आणि सुलेखा हे त्याचे पालनकर्ते मातापिता
  • सुनीता - शत्रुघ्नची पत्नी (निषाद-कन्या)
  • हिरण्यधनु - जरासंधाचा सेनापती
३५ रुरू आणि प्रियंवदा
३६ कल्माषपाद राजा
३७ विविध राक्षस, असूर तृणावर्त, चक्रासूर, मयासूर, जरा राक्षसीण,
३८ विविध गंधर्व अंगारपर्ण
३९ ऋषी-मुनी व आचार्य परशुराम, गौतम, द्रोणाचार्य, भारद्वाज, शरद्वान (कृप व कृपी यांचे पिता), वसिष्ठ मुनी, शक्ती मुनी, महर्षी पराशर, धौम्य ऋषी, याज आणि अपयाज ऋषी, विश्वामित्र
  • परशुराम - भीष्मांचे गुरू
  • कृपाचार्य - कौरवपांडवांचे गुरू
  • कृपाचार्य व कृपी - बहीण-भाऊ (राजा शंतनू यांनी पालनपोषण केले.)
  • शरद्वान - कृप व कृपी यांचे पिता
  • शक्ती - वसिष्ठ मुनींचा पुत्र
  • अदृश्यन्ति - शक्तीमुनींची पत्नी
  • महर्षी पराशर - शक्ती आणि अदृश्यन्ति यांचा पुत्र - पुढे महर्षी व्यास हे पराशर यांचे पुत्र
४० राजा मुचकुंद
४१ रेवत राजा रेवती
  • रेवती - रेवत राजाची कन्या व बलरामाची पत्नी
४२ राजा रुक्मी विदर्भ रुक्मी, रुख्मिणी
  • रुख्मिणी - श्रीकृष्णाची पत्नी
४३ दुष्यंत राजा हस्तिनापूर दुष्यंत, शकुंतला, भरत (सर्वदमन) शकुंतला - विश्वामित्र व मेनका यांची कन्या, दुष्यंत राजाची पत्नी व भरताची आई

संदर्भ

[संपादन]
  1. "महाभारत". YouTube. 2026-02-01 रोजी पाहिले.
  2. (मराठी) डॉ.ग.ना.जोशी, महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान, मॅजेस्टिक प्रकाशन, पा.क्र. ४४०