महाबळेश्वर सैल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


महाबळेश्वर सैल
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी, कोकणी
साहित्य प्रकार कथा
कादंबरी

महाबळेश्वर सैल (जन्म - ४ ऑगस्ट, इ.स. १९४३ माजळी, कारवार) हे गोव्यात स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी कथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत. त्यांचे कोकणीत अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत.त्यांनी कोकणीत 'निसर्ग साहित्य' हा नवा प्रवाह सुरु केला.१९६५च्या भारत-पाक युद्धात त्यांचा सहभाग होता. १९६३-६४ मध्ये इस्रायल-इजिप्त सीमेवर युनोतर्फे शांतिसैनिक म्हणूनही ते गेले होते.

महाबळेश्वर सैल यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

  • उन्हातली माणसं (कादंबरी)
  • काळी गंगा (लेखकाची ही पहिली कादंबरी)
  • खोल खोल मुळा (कादंबरी)
  • तांडव (कादंबरी- मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांतून लिहिलेली कादंबरी) राजहंस प्रकाशन, पुणे[१]
  • नको जाळूं माझं घरटं
  • निमाणो अश्वत्थामा (शेवटचा अश्वत्थामा) (कथासंग्रह)
  • हावठण (कादंबरी)

महाबळेश्वर सैल यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार[संपादन]

  • सरस्वती सन्मान

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ डॉ. सोमनाथ कोमरपंत (रविवार १२ ऑगस्ट, २०१२). "लेखकाचा कट्टा : माती आणि माणसांत घट्ट मूळं रुजलेला लेखक" (मराठी मजकूर). लोकसत्ता. १४ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले.