महानगर (वृत्तपत्र)
| आपलं महानगर | |
|---|---|
| प्रकार | दैनिक वृत्तपत्र |
| आकारमान | टॅब्लॉइड (२० पाने) |
| प्रकाशक | संजय भास्कर सावंत |
| संपादक | संजय भास्कर सावंत |
| स्थापना | जानेवारी १९९० |
| भाषा | मराठी |
| मुख्यालय | मुंबई, भारत |
| | |
| संकेतस्थळ: http://www.mymahanagar.com/ | |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
महानगर हे भारतातील मुंबई येथून प्रकाशित होणारे मराठी आणि हिंदी भाषेतील वृत्तपत्र आहे. मराठी आवृत्ती आपलं महानगर ची स्थापना जानेवारी 1990 मध्ये निखिल वागळे यांनी केली, तर हिंदी आवृत्ती हमारा महानगर ही 1982 मध्ये सुरू झाली.[१][२] सध्या आपलं महानगर आणि mymahanagar.com चे संपादक व प्रकाशक संजय भास्कर सावंत आहेत.
शिवसेना आणि तिच्या नेत्यांविरोधात केलेल्या टीकात्मक विधानांमुळे निखिल वागळे यांच्यावर शिवसेनेच्या समर्थकांनी अनेक वेळा शारीरिक हल्ले केले.[३][१][४]
1994 मध्ये, गुन्हेगारी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका दिवंगत आमदारावर अतिशय स्तुतिसुमने उधळल्याबद्दल महाराष्ट्रातील आमदारांवर टीका केल्यानंतर निखिल वागळे यांना एका आठवड्यासाठी कारावासाची शिक्षा झाली होती.[५]
19 जून 2018 रोजी mymahanagar.com नावाचे डिजिटल वेब प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले, जे समूहाच्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे दिसते.
संदर्भ
[संपादन]- 1 2 Robin Jeffrey (2010). India'S Newspaper Revolution (3Rd Edn.). Oxford University Press. p. 198. ISBN 978-0-19-806546-3.
- ↑ Press in India. Office of the Registrar of Newspapers. 1999. p. 107.
- ↑ Marie Cruz Gabriel (1 January 1996). A Silence in the City and Other Stories. Orient Blackswan. ISBN 978-81-250-0828-6.
- ↑ Katakam, Anupama. "Targeting journalists". Frontline (Volume 21 - Issue 19, Sept. 11 - 24, 2004). The Hindu. 19 March 2013 रोजी पाहिले.
- ↑ Asha Kasbekar (2006). Pop Culture India!: Media, Arts, And Lifestyle. ABC-CLIO. p. 124. ISBN 978-1-85109-636-7. 20 March 2013 रोजी पाहिले.