महागौरी
Appearance
महागौरी
| मूळ लेबल | Mahagauri |
|---|---|
| लिपी | लॅटिन वर्णमाला |
| Soundex | M260 |
| Cologne phonetics | 647 |
| Caverphone | MKR111 |
हिंदू धर्मातील महादेवीच्या नऊ रूपांच्या नवदुर्गा मध्ये महागौरी हे आठवे रूप आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी तिची पूजा केली जाते. महागौरी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते.
महागौरी या नावाचा अर्थ अत्यंत तेजस्वी, स्वच्छ-शुभ्र, चंद्रासारखी चमक असलेली असा होतो. (महा = महान; गौरी = तेजस्वी, स्वच्छ).[१]
महागौरी ही पांढऱ्या बैलावर स्वार पांढऱ्या वस्त्रांमध्ये दाखवली जाणारी पवित्रतेची प्रतीक आहे.[२] तिला चार हातांनी चित्रित केले आहे: तिच्या उजव्या वरच्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात डमरू आहे. अभयमुद्रेमध्ये तिचा उजवा हात आहे.[३]
प्रार्थना
[संपादन]महागौरी देवीचा मंत्र:
- ॐ देवी महागौर्यै नमः॥ ॥
महागौरी देवीची प्रार्थना:
- श्वेते वृषेसमारूढा श्वेताम्बरधरा शुचिः ।
- महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा ॥ [४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Navratri 2022: Maha Ashtami today, devotees worship Goddess Mahagauri". The Economic Times.
- ↑ Dasgupta, Sayantani (2016). "GODDESSES: Durga in Perspective". India International Centre Quarterly. 43 (2): 104.
- ↑ "Chaitra Navratri 2019: 8th Day Puja And Mantra of Maa Mahagauri Devi". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ↑ "Goddess Mahagauri". DrikPanchang. १ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.