महर्षी कर्वे मार्ग (चर्चगेट)
Appearance
महर्षी कर्वे मार्ग हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई शहरातील चर्चगेट परिसरातील एक रस्ता आहे.
इतिहास
[संपादन]चर्नी रोड रेल्वे स्थानक ते कुपरेज फुटबॉल मैदान हा रस्ता ब्रिटिशकाळात सन १८५० मध्ये झाला तेव्हा त्याचे नाव क्वीन्स रोड असे ठेवले होते. भारतरत्न महर्षी धोंडोपंत कर्वे ह्यांनी स्थापन केलेले नाथीबाई दामोदर ठाकरसी हे पहिले महिला विद्यापीठ (स्थापना १९१६) क्वीन्स रोडवर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नंतरच्या काळात इसवी सन १९५८ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृती निमित्ताने क्वीन्स रोडचे नाव महर्षी कर्वे मार्ग असे केले.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स,वसई विरार पुरवणी, गुरुवार,१७ एप्रिल २०२५