मसारु इमोतो
मसारु इमोतो (जन्म: २२ जुलै १९४३ - मृत्यु: १७ ऑक्टोबर २०१४) हा एक जपानी लेखक, संशोधक, छायाचित्रकार व उद्योजक होता. त्याचा असा दावा होता कि मानवी जाणीवेचा पाण्याच्या रेण्वीय बांधणीवर परिणाम होतो.त्याचा अदमास हा अलीकडील वर्षांत उत्क्रांत झाला व त्याचे पूर्वीचे कामाने व त्याचे विश्वासाने हे शोधले कि,पाणी हे सकारात्मक विचारांना व शब्दांना प्रतिसाद देते. तसेच, दुषित पाणी हे प्रार्थनेने व सकारात्मक दृष्टीने स्वच्छ करता येऊ शकते.
सन १९९९ पासून इमोतोने पुस्तकांचे अनेक खंड प्रकाशित केले, ज्याचे शीर्षक 'पाण्यापासूनचे संदेश' (मेसेजेस् फ्रॉम वॉटर) असे होते. त्या पुस्तकांत बर्फाच्या स्फटिकांची चित्रे होती व त्याने त्यांच्यावर केलेले प्रयोग. त्याच्या या कल्पना 'What the Bleep Do We Know!?' या चित्रपटात साकार झाल्यात.
कल्पना
[संपादन]इमोतोचा असा विश्वास होता कि, 'पाणी ही आपल्या सत्यतेची छवी आहे' व भावनात्मक ऊर्जा आणि स्पंदने ही पाण्याची भौतिक-बांधणी बदलू शकतात.इमोतोच्या पाणी-स्फटिक प्रयोगात,पेल्यातील पाण्यावर विविध शब्द, चित्रे किंवा संगीत याद्वारे प्रक्रिया केल्या जायच्या. नंतर त्यास गोठविल्या जायचे.त्या गोठविलेल्या स्फटिकांचे मग सूक्ष्म-छायाचित्रणाद्वारे सद्भिरुचीदर्शक गुणधर्म ज्ञात केल्या जायचे. त्याने असा दावा केला होता कि, ज्या पाण्यावर सकारात्मक बोल व विचारांद्वारे प्रभाव टाकण्यात आला होता, त्या पाण्याचे स्फटिक , गोठविल्या गेल्यावर, दर्शनीयरित्या 'आल्हाददायक' दिसत होते, त्या विपरीत, नकारात्मक प्रभाव पाडलेल्या पाण्याचे स्फटिक हे 'घाणेरडे' तयार होत असत.
त्याने पुढे असाही दावा केला कि,गोठविल्या गेल्यावर, वेगवेगळ्या स्रोतांमधील पाण्याची स्फटिकमय बांधणी ही वेगवेगळी होती.डोंगरावरील पाण्याची स्फटिकमय बांधणी ही सुंदर आकार असलेली भौमितीय आकृती करत होती तर, दूषित स्रोतातून घेतलेल्या पाण्याची स्फटिकमय बांधणी ही विस्कळीत व घाणेरडी रहात होती.त्याचा असाही विश्वास होता कि, ही विस्कळीत बांधणी अतिनील किरणांच्या माऱ्याने व काही प्रकारच्या विद्युतचुंबकिय तरंगांनी नीट करता येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |