मळगाव धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मळगाव धबधबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आहे. हा सावंतवाडीजवळ आहे. सातार्ड्यातून मळेगावच्या दिशेने जाणाऱ्या सावंतवाडी-गोवा रस्त्यावर मळगाव वसले आहे. झाराप-पत्रादेवी हायवेपासून हा धबधबा हाकेच्या अंतरावर आहे. झाराप हे कोकण रेल्वेवरील कुडाळ स्ठेशन व सावंतवाडी स्टेशन यांच्या मधले रेल्वे स्टेशन आहे. झाराप-पत्रादेवी हा चौपदरी महामार्ग आहे.