मल्लूर, कर्नाटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मल्लूर, कर्नाटक
दोड्ड मल्लूर
गाव
भारत भारत ध्वज India
राज्य कर्नाटक
जिल्हा रामनगर
 • घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Languages
 • Official {{{demographics1_info1}}}
वेळ क्षेत्र IST (यूटीसी+5:30)

दोड्ड मल्लूर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील रामनगर जिल्ह्यातील चन्नपटना तालुक्यातील एक गाव आहे. कण्व नदीच्या काठावर मल्लूर गाव वसलेले आहे. हे गाव त्यातील श्री रामप्रमेय स्वामी, अरविंदवल्ली आणि अंबेगालु नवनीत कृष्णा (रांगणारा आणि लोण्याचा गोळा हातात घेतलेला बाळकृष्ण) या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. बंगलोर-म्हैसूर राज्यमहामार्गावर हे बंगलोरपासून अंदाजे ६० किमी. अंतरावर आहे. चन्नपटनापासून ते साधारण ३ किमी अंतरावर आहे.

अंबेगालु नवनीत कृष्णाची (लोण्याचा गोळा हातात घेतलेला रांगणारा बाळकृष्ण) ही मूर्ती ही या स्थितीतली एकमेव मूर्ती आहे असे मानले जाते. द्वैत वेदांत संप्रदायाचे एक प्रमुख संत व्यासराज (उर्फ व्यासतीर्थ) यांनी या मूर्तीची स्थापना केली होती. या मूर्तीच्या सौंदर्याची प्रशंसा करणारी एक [./Https://en.wikipedia.org/wiki/Kriti कृती] (काव्यात्मक रचना किंवा पद) "जगदोद्धारण आडिसिदाळे यशोदे" कर्नाटक संगीतातील एक प्रमुख कवी पुरंदरदास यांनी रचले आहे..या मूर्तीच्या सौंदर्यासंदर्भात प्रशंसा म्हणून कर्नाटिक संगीत पुरंदरदास यांनी प्रसिद्ध केलेली कृती (वाद्य रचना किंवा गाणे) "जगदोधरणा आदिसिदले यशोदे" ही रचना केली होती.

दोडा मल्लूर बंगलोर आणि म्हैसूरच्या मध्ये वसलेले आहे. बंगलोरपासून ते ६० किमी तर म्हैसूरपासून ते ८० किमी अंतरावर आहे. तर चन्नपटनापासून ते ३ किमी अंतरावर आहे.

परिवहनः बस आणि रेल्वेने देखील चन्नपटनाला जात येते. चन्नपटनापासून स्थानिक ऑटोरिक्षा आणि खासगी वाहने इ. प्रवासी परिवहन सेवादेखील दोड्डमल्लूरला जाण्यासाठी उपलब्ध आहेत.

इतिहास[संपादन]

इतिहासामध्ये असे नमूद केले आहे की, अप्रमेय मंदिर चोल सम्राट राजेंद्र सिंह यांनी ११व्या शतकात बांधले. या मंदिराला चोलांचा पराक्रमी सेनापती अप्रमेय याचे नाव देण्यात आले.

अप्रमेय स्वामी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार

हे स्थान कण्व नदीच्या काठावर आहे आणि या गावाचा बहुतांश भाग नदीच्या पात्रापासून बनला आहे. त्यामुळेच या गावाला मरळूर किंवा वालुकानगरी असे नाव पडले आणि पुढे मल्लूर असे स्थानिक भाषेत प्रचलित झाले. अशी आख्यायिका आहे की, अप्रमेय स्वामी मंदिर जे या वालुकामय भूमीवर बांधले गेले आहे, त्याचा पाय मजबूत नाही.

भूगोल[संपादन]

दोड्डमल्लूर येथे 12°38′49″N 77°10′47″E / 12.647017°N 77.179844°E / 12.647017; 77.179844 [१] स्थित आहे. समुद्रसपाटीपासून त्याची सरासरी उंची ७३९ मीटर (२४२४ फूट) आहे.

कार्यक्रम[संपादन]

दरवर्षी एप्रिल/ मे महिन्यामध्ये श्री रामप्रमेय स्वामींचा ब्रम्होत्सव येथे आयोजित केला जातो. या मंदिराची वास्तुरचना असा प्रकारे करण्यात आली आहे की, दरवर्षी या काळात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट देवळाच्या गर्भागृहात पडतात.

संदर्भ[संपादन]