मलिक अंबरची कबर
मलिक अंबरची कबर ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील खुलताबाद येथी अहमदनगर सल्तनतच्या पेशवा मलिक अंबरची कबर आहे. मलिकअंबरने ही कबर स्वतःसाठी बांधून घेतली. १६२६ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्याला तेथे दफन करण्यात आले. [१][२] हे भारतातील राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक आहे.[३]

मलिक अंबर गुलाम होता परंतु आपल्या कर्तृत्त्वाने १७ व्या शतकाच्या सुरुवातीला अहमदनगर सल्तनतचा पेशवा (पंतप्रधान) झाला. अंबरने औरंगाबादमधील नेहेर जलप्रणाली तसेच अनेक मशिदी आणि थडग्यांचे बांधकाम करून घेतले. त्याने आपली स्वतःची कबर स्वतःच बांधून घेतली होती.
याचे स्थापत्य शाही कबरींसारखे आहे. [४] [५]
मलिक अंबरच्या थडग्यापासून काही मीटर नैऋत्येस एक मोडकळीस आलेले लहान थडगे आहे. यावर काही शिलालेख नसल्यामुळे या थडग्यात कोणाला पुरले आहे हे माहित नाही, परंतु ते अंबरच्या नातवाचे असल्याचे मानले जाते. [६] [४]

संदर्भ
[संपादन]- ^ "ASI set for conservation of Malik Ambar's tomb". The Times of India. 2023-07-17. ISSN 0971-8257.
- ^ "Malik Ambar: The African slave who built Aurangabad and ruined the game for Mughals in the Deccan". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-05-09.
- ^ "List of Centrally Protected Monuments / Sites under the jurisdiction of Maharashtra (Aurangabad Circle, Mumbai Circle and Nagpur Circle)" (PDF). Archaeological Survey of India. August 2021.
- ^ a b Sohoni, Pushkar (2018-08-30). The Architecture of a Deccan Sultanate: Courtly Practice and Royal Authority in Late Medieval India (इंग्रजी भाषेत). Bloomsbury Publishing. pp. 195–198. ISBN 978-1-83860-928-3. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Sohoni, Pushkar (2019). "Memorials of Sovereignty: Funerary Architecture of the Siddis of Janjira at Khokri (Maharashtra)". Arts Asiatiques (फ्रेंच भाषेत). 74 (1): 149–156. doi:10.3406/arasi.2019.2051. ISSN 0004-3958.
- ^ Michell, George; Zebrowski, Mark. Architecture and Art of the Deccan Sultanates (PDF). The New Cambridge History of India I : 7. Cambridge University Press. pp. 84, 128.