Jump to content

मरिया साल्व्हिआती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मरिया साल्व्हिआती
मानव
लिंगमहिला संपादन
दिलेले नावमारिया संपादन
आडनावSalviati, मेदिची संपादन
नावMaria संपादन
जन्म तारीख१७ जुलै 1499 संपादन
जन्मस्थानफिरेंझे संपादन
मृत्यू तारीख१२ डिसेंबर 1543 संपादन
मृत्यूस्थानVilla di Castello संपादन
वडीलJacopo Salviati संपादन
आईलुक्रेझिया दे मेदिची संपादन
भावंडेBernardo Salviati, जियोव्हानी साल्व्हिआती, Francesca Salviati, Alamanno Salviati संपादन
वैवाहिक जोडीदारGiovanni delle Bande Nere संपादन
अपत्यपहिला कोसिमो दे मेदिची संपादन
कुटुंबHouse of Salviati, मेदिची घराणे संपादन
व्यवसायaristocrat संपादन
Depicted byPortrait of Maria Salviati संपादन

मरिया साल्व्हिआती (१७ जुलै, १४९९ - २९ डिसेंबर, १५४३) ही पंधराव्या शतकातील इटलीमधील मेदिची घराण्यातील स्त्री होती. ती लुक्रेझिया दि लॉरेंझो दे मेदिची आणि याकोपो साल्व्हिआती यांची मुलगी होती. तिने जियोव्हानी देल्ले बांदे नेरेशी लग्न केले. त्यांचा मुलगा पहिला कोसिमो दे मेदिची फिरेंझेचा ड्यूक आणि तोस्कानाचा ग्रँड ड्यूक झाला. ३० नोव्हेंबर, १५२६ रोजी तिच्या पतीचे निधन झाले आणि वयाच्या २७व्या वर्षी ती विधवा झाली. साल्व्हिआतीने कधीही पुनर्विवाह केला नाही व तिने स्वतःला देवास वाहून घेतले. मरिया ही मेदिची आणि साल्व्हिआती या फिरेंझेच्या दोन शक्तिशाली कुटुंबांची वारस होती. तिचे आजोबा लॉरेंझो दे मेदिची होते. १५३७मध्ये मरियाचा चुलतभाऊ अलेस्सांद्रो दे मेदिचीची हत्या झाल्यावर तिने आपला मुलगा कोसिमोला ड्यूक पदावर बसवले.

संदर्भ

[संपादन]