मरिया कोरिना माचादो
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | व्हेनेझुएला |
| स्थानिक भाषेतील नाव | María Corina Machado |
| दिलेले नाव | María, Corina |
| आडनाव | Machado |
| Second family name in Spanish name | Parisca |
| जन्म तारीख | ७ ऑक्टोबर 1967 |
| जन्मस्थान | केरकस |
| आई | Corina Parisca |
| वैवाहिक जोडीदार | Ricardo Sosa Branger |
| मातृभाषा | स्पॅनिश भाषा |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | स्पॅनिश भाषा, इंग्लिश भाषा |
| व्यवसाय | राजकारणी, human rights defender, industrial engineer |
| नियोक्ता | Andrés Bello Catholic University, Radio Caracas Radio |
| पद | member of the National Assembly of Venezuela |
| शिक्षण घेतलेली संस्था | Andrés Bello Catholic University, Institute of Advanced Studies in Administration |
| कर्मस्थळ | केरकस |
| संलग्नता | Coordinadora Democrática |
| राजकीय पक्षाचा सभासद | Vente Venezuela |
| धर्म | कॅथलिक धर्म |
| केसांचा रंग | brown hair |
| डोळ्यांचा रंग | brown |
| Participant in | La Salida |
| चळवळ | Venezuelan opposition |
| सदस्यता | Súmate |
| Owner of | Nobel Peace Prize medal of María Corina Machado |
| पुरस्कार | BBC 100 Women, सखारोव्ह पुरस्कार, Václav Havel Human Rights Prize, नोबेल शांतता पारितोषिक, टाइम १०० |
| Described at URL | https://www.bbc.co.uk/news/live/c1l80g1qe4gt |
मरिया कोरिना माचादो पारिस्का (७ ऑक्टोबर, १९६७:काराकास, वेनेझुएला.[१] - ) या व्हेनेझुएलाच्या राजकारणी आहेत. या उगो चावेझ आणि निकोलस मादुरो यांच्या सत्ताकालतील विरोधी नेत्या आहेत. या २०११ ते २०१४ पर्यंत राष्ट्रीय सभेच्या सदस्या होत्या.[२] मादुरो राजवटीच्या दडपशाहीचा सामना करीत त्यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मादुरो विरुद्ध त्या उभ्या राहिल्या. माचादो स्वतःला मध्यमार्गी आणि उदारमतवादी म्हणवून घेतात. [३]
माचादो औद्योगिक अभियंता असून त्यांनी वित्त विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. २०१२ च्या विरोधी पक्षनेता पदासाठीच्या प्राथमिक निवडणुकीत त्या हेन्रिक कॅप्रिलेस यांच्याकडून पराभूत झाल्या. २०१४ च्या व्हेनेझुएलातील निदर्शनांमध्ये, त्यांनी मादुरो सरकारविरुद्ध निदर्शने आयोजित करण्यात प्रमुख भूमिका बजावली. [४]
२०२३ मध्ये माचादो यांनी पक्षनेत्या झाल्या आणि २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षांतर्फे उमेदवार झाल्या. [५] व्हेनेझुएलाच्या सरकारने त्यांना निवडणुकीत उतरण्यास बंदी घातली. [६] [७] [८] त्यावेळी माचादोने कोरिना योरिस यांना आपल्या ऐवजी उभे केले. त्यांच्याजागी नंतर एदमुंदो गोंझालेझ यांची निवड झाली. निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी मतदानाचे आकडे सादर करीत दावा की गोंझालेझ यांनी मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकली. तर मादुरो सरकारने कोणताही पुरावा न देता आपण जिंकल्याचे जाहीर केले. २८ जुलै, २०२४ च्या या निवडणुकीनंतर माचादो मादुरो राजवटीत त्यांच्या जीवाला आणि स्वातंत्र्याला भीती असल्याचे कळल्यावर काही काळासाठी अज्ञातवासात गेल्या. [९]
माचादो यांना त्यांच्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. २०२५ मध्ये, व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [१०] याआधीही त्यांना अनेक सन्मान मिळालेले आहेत.[११] [१२]
५ जुलै २०११ रोजी व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या द्विशताब्दी समारंभात सहभाग घेताना माचादो यांनी पूर्वी व्हेनेझुएलाच्या क्युबावरील परावलंबनावरील वक्तव्यांवरून संतापलेल्या सरकारी हस्तकांनी माचादोवर हल्ला केला. [१३] [१४] [१५] सुमारे ५० जणांच्या गटाने त्यांच्यावर दगड आणि बाटल्या फेकल्या; [१३] [१४] पोलिसांनी त्यांचा बचाव करीत मोटरसायकलवरून त्यांना पसार केले. यात एक पोलिस अधिकारी जखमी झाला होता.[१३] [१४] [१४]
माचादो यांना लोखंडी व्यक्तिमत्व असलेली स्त्री असे म्हणले जाते [३] [१६] द न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, समर्थक तिला "इतर अनेक राजकारणी पळून गेले असताना व्हेनेझुएलामध्ये राहून सरकारविरुद्ध धाडसाने काम करणारी स्त्री" असे त्यांचे वर्णन केले आहे. [१७]
माचादो घटस्फोटित असून त्यांची तीन मुले आहेत परदेशात राहतात. त्यांना घरी राहिल्यास मारण्याच्या धमक्या असल्याने त्यांनी मुलांना दूर ठेवणे स्वीकारले आहे.[१८] माचादो कॅथोलिक धर्माचे पालन करतात. [१९]
संदर्भ
[संपादन]- ↑ Machado, María Corina. "Mi experiencia" [My experience] (स्पॅनिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित22 March 2010. 25 April 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ↑ Moleiro, Alonso (28 February 2023). "What is in store for María Corina Machado, the 'iron lady' of the Venezuelan opposition?". El País (इंग्रजी भाषेत). 30 June 2023 रोजी पाहिले.
- 1 2 Pinero, Jesus (19 November 2018). "María Corina Machado, la dama de acero" [María Corina Machado, the lady of steel]. El Estímulo (स्पॅनिश भाषेत). 16 July 2023 रोजी पाहिले.
- ↑ Kurmanaev, Anatoly (23 December 2014). "Venezuela Protests Drive Poor to Maduro as Death Toll Mounts". Business Week. 13 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 December 2014 रोजी पाहिले.
- ↑ Garcia Cano, Regina (26 October 2023). "María Corina Machado is winner of Venezuela opposition primary that the government has denounced". Associated Press. 27 October 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Venezuela's Highest Court Bars Opposition Leader From Running for President" (इंग्रजी भाषेत). 26 January 2024.
- ↑ Armas, Mayela; Sequera, Vivian (30 June 2023). "Venezuela opposition candidate Machado barred from holding office-gov't". Reuters (इंग्रजी भाषेत). 30 June 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Venezuela's Supreme Court disqualifies opposition leader from running for president". Le Monde.fr (इंग्रजी भाषेत). 27 January 2024. 8 March 2024 रोजी पाहिले.
- ↑ Vipers, Gareth (10 October 2025). "Nobel Peace Prize Awarded to Venezuelan Opposition Leader María Corina Machado". The Wall Street Journal. 10 October 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Announcement, Nobel Peace Prize 2025" (Press release). Nobel Foundation. 10 October 2025. 10 October 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Venezuelan opposition figure Machado wins European rights award". France24. 30 September 2024. 1 October 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Venezuelan opposition leaders awarded Europe's Sakharov Prize for democratic campaign". Reuters. 24 October 2024 रोजी पाहिले.
- 1 2 3 Ernesto Escarri; Alicia de la Rosa (5 July 2011). "Agreden a diputada María Corina Machado al salir del desfile" [Deputy María Corina Machado is attacked when leaving the parade]. El Universal. 23 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 December 2014 रोजी पाहिले.
- 1 2 3 4 "MCM tras ser agredida: 'la violencia es la faz tenebrosa de quienes se sienten derrotados'" [MCM after being attacked: 'violence is the dark face of those who feel defeated']. Noticias24.com. 5 July 2011. 23 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 December 2014 रोजी पाहिले.
- ↑ Palacios, José Angel (5 July 2011). "Chavistas agredieron a diputada María Corina Machado" [Chavistas attacked deputy María Corina Machado]. El Carabobeno. 12 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 December 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Así es María Corina Machado, la líder opositora venezolana que ha ganado el Premio Nobel de la Paz 2025" [María Corina Machado, the Venezuelan opposition leader who has won the 2025 Nobel Peace Prize]. El Confidencial. 10 October 2025.
- ↑ Herrera, Isayen; Glatsky, Genevieve (23 October 2023). "Maduro Antagonist on Track to Win Venezuela Primary". The New York Times. 27 October 2023 रोजी पाहिले.
- ↑ "María Corina" (स्पॅनिश भाषेत). Vente Venezuela. 14 September 2016. 3 May 2017 रोजी पाहिले.
- ↑ Henríquez, Andrés. "Venezuela's Catholic voters face crucial decision for president". Catholic News Agency (इंग्रजी भाषेत). 10 October 2025 रोजी पाहिले.