मराठी साहित्य वार्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
मराठी साहित्य वार्ता.jpg

मराठी साहित्याचे डिजिटलायझेशन व्हावे या हेतूने पत्रकारितेचे अभ्यासक अमरदीप शामराव वानखडे यांनी मराठी साहित्य वार्ता या नावाने सुरूवातीला फेसबुक पेज निर्मिती दि. 1 मे 2020 रोजी केली. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांशी लाईव्ह संवाद फेसबुकच्या माध्यमातुन साधण्यात आला. त्यानंतर मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपमत्र मराठी साहित्य वार्ता या डिजिटल वेब पोर्टलची स्थापना 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत ज. वि. पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डाॅ. पंडित विद्यासागर, मराठी साहित्य वार्ताचे मुख्य संपादक अमरदीप वानखडे यांच्या उपस्थितीत दि. 19 जुलै, 2020 रोजी झाली.

मराठी साहित्य वार्ता या डिजिटल मीडियाद्वारे आपली माणसं, आपली चर्चा, कविता आणि इतर गप्पा, साहित्यावर बोलू काही बोली परिचय आणि लोकवाड्मय, आरोग्यावर बोलू काही, गझल आणि बरंच काही, शाहीरी जलसा, गप्पा छोट्या दोस्तांशी इत्यादी बॅनरखाली त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांबरोबर लाईव्ह संवाद साधला आहे. मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टलच्या माध्यमातुन अनेक साहित्यिक, कवी, लेखक, कथाकार या उपक्रमाशी जुळले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक देशांमधून या उपक्रमाची नोंद घेतल्या गेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने न्यूझीलंड, नायझेरीया, आदी देशांमधील साहित्यिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टल मार्फत विविध साप्ताहिक सदरांमधून ख्यातनाम साहित्यिक लेखन करतात. जागर लोकसंस्कृतीचा या साप्ताहिक सदराद्वारे लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक प्रा. डाॅ. सुनीता धर्मराव, आंबेडकरी गझलेतील सृजनसौदर्य या सदराद्वारे ज्येष्ठ गझलकार प्रमोद वाळके प्रा. डाॅ. प्रकाश राठोड, मैत्री बॅंकिंगशी या सदराद्वारे वंदना धर्माधिकारी, ओळख वृत्तबद्ध कवितेची या सदराद्वारे वर्षा बेंडीगेरी-कुलकर्णी, गरूडमंत्र आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा वेध या सदराद्वारे प्रा. डाॅ. शैलेश कुलकर्णी कविता पर्यावरणाच्या या सदराद्वारे सुनंदा भावसार, चला शेअर बाजार समजुन घेवू या सदराद्वारे विशाल कुलकर्णी, कथास्पंदन या सदराद्वारे रंजना कराळे, ओळख अलकशी या सदराद्वारे अरूणा गर्जे, भारतीय स्वातंत्र लढ्यात मुस्लिम क्रांतीनायकांचे योगदान या सदराद्वारे अताउल्लाखाँ रफिकखाँ पठाण,, आंबेडकरवाद: समकालीन प्रश्न या सदराद्वारे प्रा. डाॅ. मनोहर नाईक, सर्जनादीत्य मनोहर आदी सातत्याने लिहित आहेत. यासह विविध प्रासंगीक घडामोडींवर विविध मान्यवरांचे लेखन प्रसिद्ध करण्यात येते.

मराठी साहित्य वार्ता युट्युब वाहिनीवर विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने माध्यमातुन 74 व्या स्वातंत्रदिनानिमित्त 74 आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम कवी/कवयित्रींचे लाईव्ह कवीसंमेलन करण्याचा विक्रम मराठी साहित्य वार्ताने केला. यासह काव्यसंवाद हा कार्यक्रम मान्यवर कवी/कवयित्रींच्या कवितांवर चर्चेचा कार्यक्रम, राष्ट्रीय पातळीवर साहित्यामध्ये होणारे बदल समजून घेण्यासाठी युवा साहित्यिकांबरोबर ‘‘राष्ट्रीय युवा संवाद’’ हा कार्यक्रम तद्ववच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 100 कवींचे राष्ट्रीय कवीसंमेलनही मराठी साहित्य वार्ता युट्युब वाहिनीवर संपन्न झाले आहे. यासह ग्रंथ प्रकाशनाचेही कार्यक्रम मोफत घेतल्या जातात. विविध मान्यवरांना चर्चा करण्यासाठी निमंत्रित केल्या जाते.

[१]

  1. ^ मराठी साहित्य वार्ताच्या वेब पोर्टल, युट्युब चॅनल आणि फेसबुक पेज वरून साभार