Jump to content

मराठी भाषा विभाग (महाराष्ट्र शासन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)
मंत्रालय

मराठी भाषा विभाग हा महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत कार्यरत विभाग आहे. मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मराठी विषयक कार्यालये/संस्था/मंडळ इत्यादींचे प्रशासकीय नियंत्रण मराठी भाषा विभागाच्या मार्फत होते. भारतात तसेच परदेशात मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी या विभागावर आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी भाषिकांना मोफत मराठीचे वर्ग उपलब्ध करून देतो. या विभागाचे दीपक वसंत केसरकर हे विद्यमान मंत्री आहेत.

मराठी भाषा
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय मराठी भाषा विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ मराठी भाषा मंत्रालय
खाते

मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. दीपक वसंत केसरकर हे सध्या मराठी भाषा कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२]

कार्यालय

[संपादन]
महाराष्ट्रचे मराठी भाषा विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Marathi Language of Maharashtra
विद्यमान
दीपक वसंत केसरकर

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा मराठी भाषा विभाग मंत्री
सदस्यता
 • राज्य मंत्रिमंडल
 • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

[संपादन]

राज्यमंत्र्यांची यादी

[संपादन]

प्रधान सचिवांची यादी

[संपादन]

विभाग रचना

[संपादन]

मंत्री (मराठी भाषा) हे मराठी भाषा विभागाचे प्रभारी मंत्री असतात. विभागासाठी सचिव (मराठी भाषा) हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतात. या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वर्ग-१ चे ५ अधिकारी व वर्ग-२ चे८ अधिकारी असतात, एकूण ८ कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी असते.[३]

अंतर्गत विभाग

[संपादन]
 • मराठी भाषा विभाग
 • भाषा संचालनालय
 • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
 • राज्य मराठी विकास संस्था
 • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

पार्श्वभूमी

[संपादन]

मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि. २४ जून, २०१० च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विभागामध्ये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीमधील सामान्य प्रशासन‍ विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इ.कार्यालये/संस्था/मंडळ मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.[४]

कार्य

[संपादन]
 • मराठी भाषा विभागाशी (खुद्द) संबंधित तसेच मराठी भाषेच्या विकासासंबंधी शासनस्तरावरील सर्व कामे.
 • भाषा संचालनालय व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
 • राज्य मराठी विकास संस्था व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय. 
 • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
 • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय. 
 • पाठयपुस्तके सोडून मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी कला या सर्व विषयांशी संबंधित उत्तम पुस्तकांना उत्तेजन देण्याकरिता पुस्तक निवड करणेबाबत. (पुस्तक निवड समिती) व अनुषंगिक बाबी. 
 • मराठी भाषा विकासासाठी धोरण ठरविणे

शक्ती प्रदत्त समिती

[संपादन]

नवनिर्मित मराठी भाषा विभाग लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे.[५] सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

 1. नवीन मराठी भाषा विभागामध्ये इतर संबंधित विभागातील कर्मचारीवृंद वर्ग करणे व आवश्यकतेनुसार नवीन पदे निर्माण करणे.
 2. नवीन विभागासाठी जागा, साधन सामग्री व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. 
 3. सचिवांसाठी मंत्रालयात जागा उपलब्ध करून देणे व वाहन खरेदी करण्यास मंजूरी देणे.

 

पद मंजूरी

[संपादन]

मराठी भाषा विभागात अन्य विभागातील वर्ग होणारे विषय विचारात घेऊन विभागासाठी समितीने प्रथम 35 पदांना मंजूरी दिली. याबाबतचा शासन निर्णय सा.प्र.विभाग दि.३१ जानेवारी, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच दिनांक ६.९.२०११ रोजी सचिव कार्यालयासाठी ४ व विभागासाठी ६ अशा १० अतिरिक्त पदांना मंजूरी देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ ऑक्टोबर, २०११ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच वाढीव कामकाज विचारात घेऊन आणखी अतिरिक्त ८ पदांना मंजूरी देण्यात आली असून त्याबाबत शा. नि. दि. २७/४/२०१२ रोजी निर्गमित करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ५३ मंजूर पदांपैकी 40 पदे भरण्यात आलेली असून उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. मराठी भाषा विभागात वर्ग करण्यात आलेले विषय व मंजूर कर्मचारीवृंद विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक ६ मे, २०११ दि. १४/११/२०११ व दि. २/५/२०१२ अन्वये विभागातील कामकाजासाठी ८ कार्यासने निर्माण करण्यात आली व कर्मचारीवृंदाचे वाटप करण्यात आले आहे. विभागासाठी नवीन प्रशासन भवनाच्या ८ व्या मजल्यावरील २४०० चौ.फू.च्या जागेचे वाटप माहे जुलै, २०११ मध्ये करण्यात आले असून, विभागाचे कामकाज सुरू झाले आहे.

पुरस्कार

[संपादन]

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार

[संपादन]

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
अ) प्रौढ वाङमय विभागात २२ वाङ्मय पुरस्कार
ब) बालवाङ्मय विभागात ६ पुरस्कार
क) प्रथम प्रकाशन विभागात ६ पुरस्कार
ड) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र १ पुरस्कार
असे एकूण ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार लेखकांना प्रदान करते.

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार

[संपादन]
अ. क्र. वर्ष विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या साहित्यिकांची नांव
२०१० श्रीमती विजया राजाध्यक्ष
२०११ श्री.के.ज.पुरोहित
२०१२ श्री.ना.धो.महानोर
२०१३ श्री.वसंत आबाजी डहाके
२०१४ श्री.द.मा.मिरासदार
२०१५ प्रा.रा.ग.जाधव
२०१६ श्री.मारुती चितमपल्ली
२०१७ श्री. मधु मंगेश कर्णिक
२०१८ श्री. महेश एलकुंचवार
१० २०१९ श्रीमती अनुराधा पाटील
११ २०२० प्रा. रंगनाथ पठारे
१२ २०२१ श्री. भारत सासणे

श्री.पु.भागवत पुरस्कार

[संपादन]

मराठी भाषेतील उत्कृष्ट प्रकाशकास २००८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०१६चा श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट पुरस्कार भारतीय विचार साधना, पुणे यांना जाहीर.

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
 1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
 2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".
 3. ^ "संग्रहित प्रत". 2017-11-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-09 रोजी पाहिले.
 4. ^ सदर निर्णयास अनुलक्षून स्वतंत्र मराठी भाषा विभागाच्या स्थापनेबाबत आदेश शासन निर्णय, सा.प्र.विभाग क्र.मभावा-210/458/प्र.क्र.95(भाग-2)/20-ब, दि.22 जुलै, 2010 अन्वये निर्गमित करण्यात आले असून याबाबतची अधिसूचना दि.29 नोव्हेंबर, 2010 रोजी निर्गमित करण्यात आली आहे.
 5. ^ शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.शप्रस-2010/प्र.क्र.116/20-ब, दि.14 जुलै, 2010 व दि.10 ऑगस्ट, 2010 अन्वये