मराठी भाषा दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.[१] राजभाषा मराठीचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतलेल्या ५ जुलै १९६० च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले.[२] महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होते. मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "२७ फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला.[३] मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.[४]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "esakal | मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको |". www.esakal.com. 2021-11-01 रोजी पाहिले.
  2. ^ "मराठी राजभाषा अधिनियम 1964" (PDF). directorate.marathi.gov.in. १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "मराठी भाषा गौरव दिन शासन निर्णय" (PDF). maharashtra.gov.in/. १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "esakal | मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको |". www.esakal.com. 2021-11-01 रोजी पाहिले.