Jump to content

मयुरी कांगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Mayuri Kango (es); Mayuri Kango (ast); Mayuri Kango (ca); Mayuri Kango (de); Mayuri Kango (ga); Mayuri Kango (da); مایوری کانگو (ur); Mayuri Kango (tet); Mayuri Kango (sv); Mayuri Kango (ace); मयूरी कांगो (hi); ᱢᱚᱭᱩᱨᱤ ᱠᱟᱝᱜᱳ (sat); Mayuri Kango (fi); Mayuri Kango (map-bms); মায়ুরি কঙ্গো (bn); Mayuri Kango (fr); Mayuri Kango (jv); मयुरी कांगो (mr); Mayuri Kango (pt); Mayuri Kango (bjn); Mayuri Kango (sl); Mayuri Kango (pt-br); Mayuri Kango (id); Mayuri Kango (nn); Mayuri Kango (nb); Mayuri Kango (nl); Mayuri Kango (min); Mayuri Kango (gor); Mayuri Kango (su); Маюри Канго (ru); Mayuri Kango (en); مايورى كانجو (arz); Mayuri Kango (bug); మయూరీ కాంగో (te) actriz india (es); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); индийская актриса (ru); actores a aned yn 1982 (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); Hintli kadın oyuncu (tr); インドの女優 (ja); indisk skådespelare (sv); שחקנית הודית (he); onye na-eme ihe nkiri si India (ig); भारतीय अभिनेत्री (hi); 인도 여배우 (ko); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); indijska glumica (hr); Indian actress (en); actriz indiana (pt); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); індійська акторка (uk); actriță indiană (ro); Indian actress (en); pemeran asal India (id); indyjska aktorka (pl); indisk skuespiller (nb); Indiaas actrice (nl); Indian actress (en-gb); actriu índia (ca); India näitleja (et); indische Schauspielerin (de); actriz india (gl); ممثلة هندية (ar); indisk skodespelar (nn); intialainen näyttelijä (fi)
मयुरी कांगो 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट १५, इ.स. १९८२
छत्रपती संभाजीनगर
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • झिकलिन स्कूल ऑफ बिझनेस
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मयुरी कांगो ही एक माजी भारतीय अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१९ मध्ये, चित्रपट सृष्टीला राम राम करून ती गुगल इंडियामध्ये इंडिया इंडस्ट्री हेड - एजन्सी बिझनेस म्हणून सामील झाली.[][]

अभिनय कारकीर्द

[संपादन]

कांगो ही मूळची छत्रपती संभाजीनगर येथील असून एकदा मुंबईत तिच्या आईला भेटायला जात असताना, दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्याशी तिचा संपर्कात आली. मिर्झा यांनी तिला बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेवर आधारित त्यांच्या नसीम (१९९५) या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका देऊ केली. बारावी शिकत असल्याने तिने प्रथम ही ऑफर नाकारली. पण नंतर, दिग्दर्शकाशी चर्चा करून तिने ही भूमिका स्वीकारली.[]

महेश भट्ट यांनी तिला त्यांच्या पुढच्या चित्रपट पापा कहते है (१९९६) मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका ऑफर केली. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी झाला नाही, परंतु तिच्या भूमिकेचे मात्र कौतुक झाले. नंतर ती बेताबी (१९९७), होगी प्यार की जीत (१९९९) आणि बादल (२०००) सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तिने डॉलर बहू (२००१) आणि करिश्मा - द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी (२००३) या मालिकांमध्ये काम केले जिथे तिने करिश्मा कपूरच्या मुलीची भूमिका केली.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

कांगोने तिचे शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील सेंट फ्रान्सिस डी सेल्स येथून आणि महाविद्यालयीन शिक्षण देवगिरी महाविद्यालय येथून पूर्ण केले. तिची आई एक प्रसिद्ध रंगभूमी अभिनेत्री असल्याने तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.

२८ डिसेंबर २००३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आदित्य ढिल्लन नावाच्या एका अनिवासी भारतीयाशी तिने लग्न केले.[][][] २०११ मध्ये त्यांना एक मुलगा झाला.

नंतर ती तिच्या पतीसोबत न्यू यॉर्कला गेली. तिथे तिने बरुच कॉलेज झिकलिन स्कूल ऑफ बिझनेस येथून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए पूर्ण केले. सुरुवातीला तिने फ्रेंच ग्रुप पब्लिसिसचा भाग असलेल्या परफॉर्मिक्स या आघाडीच्या डिजिटल मीडिया एजन्सीची व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. सध्या, ती गुगल इंडियासाठी इंडिया इंडस्ट्री हेड - एजन्सी बिझनेस म्हणून काम करत आहे.[]

अभिनय सूची

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका दिग्दर्शक नोंदी
१९९५ नसीम नसीम सईद अख्तर मिर्झा
१९९६ पापा कहते है स्वीटी आनंद महेश भट्ट []
१९९७ बेताबी रेश्मा राजेश कुमार सिंग []
१९९९ होगी प्यार की जीत प्रीती सिंग पी. वासू [१०]
मेरे अपने (प्रकाशित नाही) [११]
२००० बादल सोनी राज कंवर [१२]
पापा द ग्रेट के. भाग्यराज विशेष उपस्थिती (गाणे)
जंग संजय गुप्ता विशेष उपस्थिती (गाणे) [१३]
शिकारी एन. चंद्रा आयटम सॉन्ग
वामसी स्नेहा बी. गोपाळ [१४]
२००१ जीतेंगे हम
२००८ काश्मीर हमारा है [१५]

संगीत व्हिडिओ

[संपादन]
वर्ष शीर्षक कलाकार Ref.
१९९७ राम रतन धन पायो

मालिका

[संपादन]
  • क्या हदसा क्या हकीकत - कुटुंब (२००४) टीव्ही मालिका [१६]
  • क्या हदसा क्या हकीकत - कायमठ (२००४) टीव्ही मालिका
  • करिश्मा - द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी (२००३) टीव्ही मालिका [] मध्ये मानसीची भूमिका
  • कुसुम (२००३) टीव्ही मालिका साक्षी आर्यमन ओबेरॉय (नवीन) म्हणून
  • किटी पार्टी (२००२) टीव्ही मालिका []
  • रंगोली (२००१)[१७]
  • डॉलर बहू (२००१) टीव्ही मालिका
  • थोडा गम थोडी खुशी (२००१) टीव्ही मालिका नेहा म्हणून
  • कहें किस्सी रोज - स्नेहा म्हणून मोनिका बोस फेस सर्जरी[१८]
  • नर्गिस - डीडी१

रंगमंच

[संपादन]
  • कुछ तुम कहो कुछ हम कहें ... जरीना खन्ना [१९]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Singh, Simran. "Meet IIT dropout actress, became star with debut film, quit Bollywood at her peak, now heads Google's..." DNA India (इंग्रजी भाषेत). 2024-12-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  5. ^ a b c Lalwani, Vickey, "Nache Mayuri... to wedding bells" Archived 2011-03-12 at the वेबॅक मशीन., IndianTelevision, 27 December 2003
  6. ^ Singh, Simran. "Meet IIT dropout actress, became star with debut film, quit Bollywood at her peak, now heads Google's..." DNA India (इंग्रजी भाषेत). 2024-12-13 रोजी पाहिले.
  7. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  8. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  9. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  11. ^ Singh, Simran. "Meet IIT dropout actress, became star with debut film, quit Bollywood at her peak, now heads Google's..." DNA India (इंग्रजी भाषेत). 2024-12-13 रोजी पाहिले.
  12. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  13. ^ Abrol, Anjali, "Jung Film Review" Archived 2011-06-16 at the वेबॅक मशीन., Planet Bollywood
  14. ^ "Typical slam-bang action flick"[मृत दुवा], Screen Weekly, 20 October 2000
  15. ^ John, Ali Peter,"The Power of His Pen" Archived 2008-05-03 at the वेबॅक मशीन., Screen Weekly
  16. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  17. ^ "Rangoli, a musical programme on film songs airing on Doordarshan, will be donning a new look after the Dheeraj Kumar promoted Creative Eye struck a deal with the national broadcaster to produce and market the programme". 6 April 2001. 25 February 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 February 2019 रोजी पाहिले.
  18. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.
  19. ^ "Mayoori Kango is now Google India industry head – agency business". The Indian Express. 3 April 2019. 4 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2019 रोजी पाहिले.