ममंग दई
| ममंग दई | |
|---|---|
|
ममंग दई साहित्य अकादमी, नवी दिल्ली येथे; मार्च २०२३ | |
| जन्म | २३ फेब्रुवारी, १९५७ |
| भाषा | |
| पुरस्कार |
|
ममंग दई (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७) ही अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील एक भारतीय कवी, आणि पत्रकार आहे. त्यांना २०१७ मध्ये त्यांच्या 'द ब्लॅक हिल' या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
जीवन प्रवास
[संपादन]ममंग दई यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९५७ रोजी पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट येथे मतीन दई आणि ओडी दई यांच्या पोटी झाला. त्यांचे कुटुंब आदी जमातीतले आहे. त्यांनी मेघालयातील शिलाँग येथील पाइन माउंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आसाममधील गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली.[१][२]
१९७९ मध्ये त्यांची आयएएससाठी निवड झाली होती. परंतु नंतर पत्रकारितेमध्ये करिअर करण्यासाठी तिने हे पद सोडले. आयएएससाठी निवड झालेल्या त्या त्यांच्या राज्यातील पहिल्या महिला आहेत.[३] पत्रकार म्हणून काम करताना, तिने द टेलिग्राफ, हिंदुस्तान टाईम्स आणि द सेंटिनेलमध्ये योगदान दिले.[४] तिने रेडिओ, तसेच टीव्ही-एआयआर आणि डीडीके, इटानगरमध्ये देखील काम केले आहे. या ठिकाणी तिने अँकर म्हणून काम केले आणि मुलाखती घेतल्या.[५][६]
तिला वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर, ज्याला डब्ल्यु.डब्ल्यु.एफ. म्हणून ओळखले जाते, येथे प्रोग्राम ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. जिथे तिने पूर्व हिमालय जैवविविधता हॉटस्पॉट्स कार्यक्रमात काम केले. ती इटानगर प्रेस क्लबची माजी सचिव होती. ती अरुणाचल प्रदेश युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स (ए पी यु डब्ल्यु) ची अध्यक्षा होती.[२] २०११ मध्ये, तिला अरुणाचल प्रदेश राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
साहित्यकृती
[संपादन]ममंग दई हिची अ-काल्पनिक कामे खालीलप्रमाणे आहेत:
- अरुणाचल प्रदेश: द हिडन लँड (२००३)
- माउंटन हार्वेस्ट: द फूड ऑफ अरुणाचल प्रदेश (२००४)
तिची चित्ररूपातील लोककथा पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:
- द स्काय क्वीन
- वन्स अपॉन अ मूनटाइम (२००३)
तिची कादंबरी मालिका खालीलप्रमाणे आहे:
- द लेजंड्स ऑफ पेन्सम (२००६)
- स्टुपिड क्यूपिड (२००८)
- द ब्लॅक हिल (२०१४)
- एस्केपिंग द लँड (२०२१)
तिची कविता संग्रह खालीलप्रमाणे आहेत:
- रिव्हर पोएम्स (२००४)
- द बाम ऑफ टाइम (२००८)
- हम्ब्रील्मैज लूम (२०१४)
- मिडसमर सर्व्हायव्हल लिरिक्स (२०१४)
याव्यतिरिक्त, द बाम ऑफ टाइम हे पुस्तक असमी भाषेत एल बाल्सामो डेल वाईटीएमपीओ म्हणून देखील प्रकाशित झाले आहे.[७]
जेव्हा तिने लिहायला सुरुवात केली, तेव्हा तिने रोमँटिक कविता आणि कथा लिहिल्या. त्यानंतर ती स्वतःच्या थीमपासून दूर जाऊन एका मोठ्या वास्तवावर लक्ष केंद्रित करते. ती दुर्गम शहरे आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्या एका जवळच्या समुदायाच्या भावनेवर प्रतिबिंबित करते.[८]
तिने अरुणाचल प्रदेश साहित्यिक संस्थेच्या सरचिटणीस, ईशान्य लेखक मंचाच्या सदस्या आणि साहित्य आणि संगीत नाटक अकादमीच्या जनरल कौन्सिल सदस्या अशा काही पदांवर काम केले आहे. [५]
पुरस्कार
[संपादन]त्यांना भारत सरकारच्या वतीने २००११ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. अरुणाचल प्रदेश सरकारने त्यांच्या 'अरुणाचल प्रदेश: द हिडन लँड' या पुस्तकासाठी २०१३ मध्ये त्यांना वार्षिक वेरियर इल्विन पुरस्कार प्रदान केला.[२][९] त्यांना त्यांच्या 'द ब्लॅक हिल' या उपन्यासासाठी २०२०१७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[१०]
संदर्भ
[संपादन]- ↑ Sarangi, Jaydeep; Dai, Mamang (2 August 2017). "In Conversation with Mamang Dai". Writers in Conversation. Flinders University. 4 (2). doi:10.22356/wic.v4i2.23.
- 1 2 3 Ramaṇika Gupta (2006). Indigenous Writers of India: North-East India. 1. New Delhi: Concept Publishing Company. pp. 23–24. ISBN 978-81-8069-300-7. 24 February 2018 रोजी पाहिले.Ramaṇika Gupta (2006). Indigenous Writers of India: North-East India. Vol. 1. New Delhi: Concept Publishing Company. pp. 23–24. ISBN 978-81-8069-300-7. Retrieved 24 February 2018.
- ↑ "Mamang Dai – Publishing Next". www.publishingnext.in (इंग्रजी भाषेत). 16 September 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-26 रोजी पाहिले.
- ↑ "Mamang Dai". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2014-01-02. ISSN 0971-751X. 2024-09-14 रोजी पाहिले.
- 1 2 "Mamang Dai (poet) - India - Poetry International". www.poetryinternationalweb.net (इंग्रजी भाषेत). 2018-05-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-26 रोजी पाहिले.. www.poetryinternationalweb.net. Archived from the original on 26 May 2018. Retrieved 26 May 2018.
- ↑ "RædLeafPoetry-India – The Phenomenal Woman- An interview of Mamang Dai by Ananya Guha". rlpoetry.org (इंग्रजी भाषेत). 27 May 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-26 रोजी पाहिले.
- ↑ Sarangi, Jaydeep; Dai, Mamang (2 August 2017). "In Conversation with Mamang Dai". Writers in Conversation. Flinders University. 4 (2). doi:10.22356/wic.v4i2.23. S2CID 134637086.
- ↑ "The Land as "Living Presence" (article) - India - Poetry International". www.poetryinternationalweb.net (इंग्रजी भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित26 May 2018. 2018-05-26 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ↑ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. October 15, 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. July 21, 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Arunachal author Mamang Dai among 24 winners of 2017 Sahitya Akademi awards". scroll.in. 21 December 2017. 10 February 2019 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]साचा:Padma Shri Award Recipients in Literature & Education साचा:Sahitya Akademi Award for English