मनोहर राईलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

प्रा. मनोहर राईलकर (जन्म : ९ ऑगस्ट १९२९) हे एक मराठी लेखक आहेत. ते पुभ्याच्या भावे स्कूलचे विद्यार्थी आहेत. १९४५मध्ये ते मॅट्रिक झाले. पुढे गणित आणि संख्याशास्त्र या दोन विषयांत एम.एस्‌सी. केल्यावर त्यांनी पुण्याच्या एस.पी. काॅलेजात ३४ वर्षे गणिताचे अध्यापन केले.पैकी २९ वर्षे ते गणितशाखा प्रमुख होते. त्यानंतर शेवटची ८ वर्षे ते विज्ञानशाखा प्रमुख आणि काॅलेजचे उपप्राचार्य होते. याशिवाय ते

  • नूतन मराठी हायस्कूलच्या शिशुशाळेचे व मराठी शाळेचे ९ वर्षे प्रमुख.
  • शिक्षण प्रसारक मंडळीच्या मुलींच्या शिशुशाळेचे व प्राथमिक शाळेचे प्रमुख
  • अडीच वर्षे वि.रा. रुईया मूकबधिर विद्यालयाचे प्रमुख
  • बालभारती गणित समितीचे १० वर्षे मानद सभासद
  • १० वर्षे महाराष्ट्र माध्यमिक शालान्त परीक्षेा मंडळाच्या गणित अभ्यास मंडळाचे मानद सभासद होते.

मनोहर राईलकरांनी गणित विषयावर अनेक पुस्तके-लेख लिहिली आहेत; भाषणे दिली आहेत. त्यांच्या कथा-कादंबऱ्या-विज्ञानकथाही आहेत. बालवाडी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संबंध असलेले ते महाराष्ट्रातील बहुधा एकमेव शिक्षक असावेत.

मनोहर राईलकरांची पुस्तके[संपादन]

  • कल्पान्त (अनुवादित, मूळ इंग्रजी ‘ऑन द बीच’, लेखक - नेव्हिल शूट)
  • मानसकन्या (वैज्ञानिक कादंबरी)
  • श्री रमणमहर्षी : शंका व समाधान
  • संस्कृतमधील पाच एकांकिका

मनोहर राईलकरांना मिळलेले पुरस्कार[संपादन]

  • मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार