Jump to content

मनोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनोर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.

  ?मनोर

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०३
• +०२५२५
• एमएच४८

भौगोलिक स्थान[संपादन]

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे जाणाऱ्या माहीम-मनोर राज्य महामार्गावर हे वसलेले आहे. पालघरहून २२ किमीवर हे स्थित आहे. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो तर उन्हाळ्यात भरपूर उकाडा असतो. हिवाळ्यात वातावरण अगदी शांत,सुखद थंडगार असते. येथे २.४८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता असलेला लघु पाटबंधारा आहे.[१]

लोकजीवन[संपादन]

मुख्यतः मुस्लिम, वंजारी, कुणबी, मराठा, सुतार,आदिवासी समाजातील लोकांची पूर्वीपासून येथे वस्ती आहे. लोक शेती बागायती बरोबरच फळभाज्या, फुलभाज्या, तसेच शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही करतात.येथे आठवडा बाजार भरतो व आजूबाजूच्या गावातून माल खरेदी व विक्री साठी भरपूर प्रमाणात लोक येतात.येथे तेल गाळणाच्या घाणी आहेत.

नागरी सुविधा[संपादन]

सार्वजनिक स्वच्छता, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य ग्रामपंचायततर्फे पाहिले जाते.खाजगी विहिरी, बोरिंग,व झरे ह्यातून सुद्धा पाणीपुरवठा होतो.मनोर गावाच्या पूर्वेकडून मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. येथे येण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकातून नियमित एसटी बससेवा उपलब्ध आहे. तसेच खाजगी जीप,डमडम सुद्धा नियमित येतात. मनोरवरून मुंबईस राष्ट्रीय महामार्गाने तसेच पालघर रेल्वे स्थानकातून जाता येते.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक ६ जुलै २०२४