माणगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मनगंगा (माणगंगा) नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
माणगंगा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश सातारा जिल्हा, महाराष्ट्र


माणगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. दहिवडी नावाचे गाव याच नदीवर आहे. ही नदी माण तालुक्यातून तसेच मानदेशातून वाहते वाहते म्हणून हिला माणगंगा म्हणतात. ही भीमा नदीला मिळते. याच मानगंगेच्या तीरी गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले हे गाव वसलेले आहे. 2009 साली या नदीला पूर येऊन गेला त्यावर अजूनही ती कोरडीच आहे. पावसाळा वगळता इतरवेळी ही नदी कोरडी असते. हिला बारमाही वाहती करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना अंमलात येणार आहे.(२२-३-२०१५ची बातमी). ह्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाद्वारे, माणगंगावरील ३२ नवीन बंधाऱ्यांसह जुन्या बंधाऱ्याची भक्कम दुरुस्ती केली जाणार आहे. हे शक्य झाल्यास माणगंगा पाणलोटातील लाभक्षेत्र :

मध्यम प्रकल्प :  आंधळी मध्यम प्रकल्प (बोराटवाडी/बोडके), राजेवाडी (म्हसवड तलाव, तालुका माण), संख तलाव (तालुका जत), बुद्धिहाळ तलाव (तालुका सांगोला ).

लहान प्रकल्प : आटपाडी तालुका -जांभुळणी, घाणंद, अर्जुनवाडी, माळेवाडी, निंबवडे, दिघंची व आटपाडी - जत तालुका- भिवर्गी

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे- आटपाडी तालुका :  लिंगिवरे, दिघंची (२), लोणारवाडी, कौठुळी, बनपुरी, शेटफळे, देशमुखवाडी, पांढरेवाडी.

सांगोला तालुका- लोटेवाडी, खवासपूर, कमळापूर, वासुद- अकोले, वाढेगाव, बलवडी, नाझरे, आलेगाव, कडलास (२), चिनके, वाटंबरे , सावे, मेथवडे, जवळे (२), सोनंद (२), मांजरी (३).

जत तालुका : अंकलगी, बेळुंडगी, जालीहाळ बुद्रुक, मोरबगी, माणिकनाळ, सोन्याळ (२), निगडी कारंडेवाडी, बालगाव.

मंगळवेढा तालुका- गुंजेगाव येथे उभारण्यात येणारा प्रकल्प भविष्यात ३५ गावांना जीवनदान ठरणार आहे. या शिवाय उभारण्यात येणाऱ्या काही प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे. त्यांमध्ये लघु पाटबंधारे तलाव -अंकलगी व शेगाव (तालुका जत),

पंढरपूर तालुका - सरकोली येथे भीमा नदीस मिळते

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे- सिंगनहळ्ळी(तालुका जत), बामणी, उदनवाडी ,जवळे (तालुका सांगोला), बोंबेवाडी (तालुका आटपाडी) यांसह जत तालुक्यातील उमदीचे आणखी दोन आणि मोरबगीचा एक अशा तीन लहान प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे.

अधिक माहिती[संपादन]

माणगंगा नदीची एकूण लांबी : १५१ किलोमीटर
उगमस्थान : कुळकजाई (ता. माण)
भीमा नदीशी संगमाचे ठिकाण : सरकोळी