मधु जैन
Indian textile designer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
मधु जैन ही एक भारतीय वस्त्रोद्योग कल्पक (टेक्सटाइल डिझायनर) आहे. तिचा बांबूच्या तंतू द्वारे वस्त्र निर्मितीकडे विशेष कल असून याकडे ती "भविष्यातील कापड" म्हणून पाहते. फॅशन क्षेत्रात ३० वर्ष घालवल्यावर २०१८ मध्ये तिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जीवन
[संपादन]जैनचा जन्म दिल्लीत झाला. तिने वेल्हम गर्ल्स स्कूल आणि वेव्हरली कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले.[१][२] तिने १९८७ मध्ये फॅशन क्षेत्रात आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली.[३]
२००३ मध्ये तिने मिलिंद सोमण सोबत जोडीने एकत्र काम केले, ज्यातून "प्रोजेक्ट एम" हा ब्रँड अस्तित्वात आला. हा ब्रँड २००३ मध्ये सादर करण्यात आले होते. आणि २०१० मध्ये भारतात पहिल्यांदाच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डिझायनरने उद्घाटन समारंभाच्या पूर्वसंध्येला पर्यावरणपूरक हस्तकला यंत्रणा (क्राफ्ट मेकॅनिझम) सादर केली.[२]
पारंपारिक आणि प्रामाणिक हाताने विणलेल्या कलाकृतींची मधु जैनला मोठी आवड आहे. राजा रवि वर्मा यांच्या चित्रांनी आणि कलमकारीच्या कलेपासून प्रेरित असलेल्या आकृतिबंधांची रचना मधु जैन यांच्या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. आंध्र प्रदेशातील 'इकत सुंदर' आणि कलात्मकपणे पश्चिम बंगालच्या 'कांथा भरतकामासह' एकत्रित केलेले आहेत.[२]
मधु जैन यांनी १९९६ मध्ये बांगलादेश स्थित, जगातील सर्वात मोठ्या गैर सरकारी संस्थांपैकी एक, BRAC सोबत काम केले आहे. नक्षिकांठाच्या जीर्णोद्धारासाठी जैन ने १९४७ च्या फाळणीनंतर देशातून पूर्णपणे गायब झालेले महाराणी नूरजहाँ यांचे लाडके हस्तनिर्मित कापड 'ढाका मलमल' भारतात परत आणले. १९९७ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत तिच्या नक्षिकांठाच्या कलाकृतीने लक्ष वेधून घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचे कौतुक झाले. २००३ मध्ये, तिने सिंगापूर फॅशन वीकमध्ये भाग घेतला ज्यामुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. सातव्या जागतिक बांबू संमेलनात बांबूवर आधारित कापड सादर केल्यानंतर तिचा हा प्रवास अधिक चर्चेत आला. २००९ च्या मिस इंडिया वर्ल्डवाइडसाठी, मधुची अधिकृत स्टाइल आणि डिझाइन पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात आली.[२]
तिच्या ग्राहकांच्या यादीत मेनका गांधी, नीलम प्रताप रुडी, सौदी अरेबियाच्या राजकुमारी महा अल सौदुरी, नीता अंबाणी, राणी मुखर्जी आणि जुही चावला, वंदना लुथ्रा, अमिता चव्हाण (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी) तसेच वहीदा रेहमान यांचा समावेश आहे.[२]
२०१७ मध्ये जैन यांनी फॅशनमध्ये तीस वर्षे साजरी केली ज्यात इकत आणि डबल इकत यांचा समावेश होता.[३]
२०१८ मध्ये जागतिक महिला दिनी जैन यांना कापड उद्योगातील त्यांच्या कामासाठी,[४][५] विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी नारी शक्ती पुरस्कार[६] देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आणि बालविकास मंत्री मनेका संजय गांधी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी सुमारे ३० लोक आणि नऊ संस्थांना सन्मानित करण्यात आले, त्यांना पुरस्कार आणि १००,०००₹ विभागून मिळाले.[७][६]
२०१९ च्या सुरुवातीला वस्त्रोद्योग मंत्रालयाने तिच्या नेतृत्वासाठी तिला मान्यता दिली. त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्यासाठी सात जणांना एक विशेष पुरस्कार दिला होता.[४] जैन यांच्या मते, भारत हा बांबूचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि त्यातील फायबर जैव-विघटनशील, पर्यावरणपूरक आणि विषारी नाही. यामुळे ती याकडे "भविष्यातील कापड" म्हणून पाहते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Bhardwaj, Karan (3 August 2013). "Roots of revival". The Pioneer. 5 April 2023 रोजी पाहिले.
- ^ a b c d e "Madhu Jain". Fashionfad (इंग्रजी भाषेत). 2011-11-02. 2021-01-16 रोजी पाहिले.
- ^ a b "Madhu Jain celebrates 30 years in fashion industry at AIFW 2017". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-03-16. 2021-01-16 रोजी पाहिले.
- ^ a b c "Madhu Jain Honoured by Ministry of Textiles' Award for Special Recognition in Textile Sector - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 6 January 2019. 2021-01-16 रोजी पाहिले.
- ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-16 रोजी पाहिले.
- ^ a b "Designer Madhu Jain honoured by President for empowering women". India New England News (इंग्रजी भाषेत). 2018-03-09. 2018-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-16 रोजी पाहिले.
- ^ "On International Women's Day, the President conferred the prestigious Nari Shakti Puraskars to 30 eminent women and 9 distinguished Institutions for the year 2017". pib.gov.in. 8 March 2018. 2021-01-14 रोजी पाहिले.