मद्रास कॅफे (चित्रपट)
2013 film by Shoojit Sircar | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| मुख्य विषय | दहशतवाद, श्रीलंकन यादवी युद्ध, राजीव गांधींची हत्या | ||
| गट-प्रकार | |||
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| पटकथा | |||
| निर्माता | |||
| Performer | |||
| वितरण |
| ||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार |
| ||
| प्रकाशन तारीख |
| ||
| कालावधी |
| ||
| अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
मद्रास कॅफे हा २०१३ चा हिंदी भाषेतील राजकीय अॅक्शन थरार चित्रपट [१] आहे जो शूजित सरकार दिग्दर्शित आहे आणि जॉन अब्राहम आणि रॉनी लाहिरी यांनी जेए एंटरटेनमेंट आणि रायझिंग सन फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित केला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, नर्गिस फखरी आणि राशी खन्ना (तिचा पहिला चित्रपट) मुख्य भूमिकेत आहेत.[२][३] हा चित्रपट १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीलंकेतील गृहयुद्धात भारताच्या हस्तक्षेपाच्या आणि भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या काळात घडतो. ह्या चित्रपटाचे कथानक एका भारतीय सैनिकाभोवती फिरते ज्याला गुप्तचर संस्था संशोधन आणि विश्लेषण विभागाने नियुक्त केले आहे कारण जाफनामध्ये काही घडमोडींनी भारतीय शांती सेनेला माघार घेण्यास भाग पाडले आहे.[४][५]
२३ ऑगस्ट २०१३ रोजी मद्रास कॅफे प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरीपेक्षा जास्त कमाई करणारा ठरला.[६] ६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये निहार रंजन सामल आणि विश्वदीप चॅटर्जी यांना सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[७] कमलजीत नेगी यांना फिल्मफेर सर्वोत्तम छायाचित्रण पुरस्कार मिळाला.
संदर्भ
[संपादन]- ^ "John Abraham: MADRAS CAFE is a magnum opus political action thriller". Glamsham. 18 June 2013.
- ^ "Shoojit Sircar : The neutral order". Livemint. 27 July 2013. 27 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Nargis plays foreign journalist in John Abraham's film". द टाइम्स ऑफ इंडिया. 26 November 2012. 14 December 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 November 2012 रोजी पाहिले.
- ^ "Rajiv Gandhi lookalike from 'Madras Cafe' creates ripples". The Times of India. 21 May 1991. 18 August 2013 रोजी पाहिले.
- ^ Udita Jhunjhunwala (27 July 2013). "Shoojit Sircar : The neutral order". Livemint. 18 August 2013 रोजी पाहिले.
- ^ "Shudh Desi Romance Opens Well Zanjeer Dull". Box Office India. 7 September 2013. 10 Sep 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 November 2013 रोजी पाहिले.
- ^ "61st National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 16 April 2014. 16 April 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 29 April 2014 रोजी पाहिले.