मदुराई मेट्रो
मदुराई मेट्रो மதுரை மெட்ரோ | |
---|---|
स्थान | मदुराई, तमिळनाडू, भारत |
वाहतूक प्रकार | मेट्रो |
मार्ग | ३ |
मार्ग लांबी | ७४ किमी कि.मी. |
एकुण स्थानके | ५५ |
मदुराई मेट्रो तमिळनाडू राज्यातील मदुराई शहरात प्रस्तावित जलद परिवहन प्रणाली आहे. हा प्रकल्प शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या मोठ्या विस्ताराचा भाग आहे, जो तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी संकल्पित केला होता.
मार्च २०२३ मध्ये या प्रकल्पाच्या आवाहालाची रचना करायचा कंत्राट आरवी अससोसिएट्स या कंपनीला देण्यात आला.[१] हा वहाळ जुलै २०२३ पर्यंत तयार करण्यात आला आणि बांधकामाची सुरुवात २०२४ च्या उत्तरार्धात सुरू करायचे नियोजन करण्यात आले होते.[२][३][४]
इतिहास
[संपादन]पार्श्वभूमी
[संपादन]भारतात मोनोरेलची बाजारपेठ ₹७२,००० कोटी ($१० अब्ज) असल्याचा अंदाज असल्याने, तामिळनाडूचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी विधानसभेत घोषणा केली की तामिळनाडू सरकारने मोनोरेल प्रणाली सुरू करण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. मदुराई[५][६][७][८] सेलम, तिरुचिरापल्ली,[९][१०][११] आणि तिरुनेलवेली या शहरांमध्ये मोनोरेल प्रकल्प बांधण्याची संकल्पना केली गेली.
२०२० मध्ये, सरकारने तामिळनाडूमधील मेट्रो आणि मोनोरेल प्रकल्पांसाठी सुमारे ₹६०,००० कोटी ($८.४ अब्ज) राखून ठेवले आहेत.[१२] त्यावेळी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) साधनांचा वापर करून मदुराई शहरासाठी उपनगरीय रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
मदुराईचे मोनोरेलसाठी प्रस्तावित मार्ग खालील प्रमाणे होते :
- तिरुमंगलम ते मट्टूतावणी – कप्पलूर, तिरुनगर, तिरुप्परनकुंड्रम, पलंगनाथम, टीएन पॉलिटेक्निक, मदुराई रेल्वे स्थानक, सिम्मक्कल, गोरीपालयम, तल्लाकुलम, मदुराई जिल्हा न्यायालय मार्गे.
- तिरुप्परनकुंड्रम ते पार्क टाउन - तिरुप्परनकुंड्रम देऊळ, विमानतळ, एसएन कॉलेज, अवनियापुरम, विल्लपुरं, साउथ गेट, कीलावसल, नेलपेट्टाई, गोरीपालयम, नरीमेडू, इनकम टॅक्स ऑफिस, कृष्णपुरम कॉलनी, विश्वनाथपुरम, पी आणि टी नगर मार्गे.
- कोचदाई ते विरागणूर – कलावसल, अरप्पलयम, एलिस नगर, मदुराई रेल्वे स्थानक, विलाकुतून, कीलावसल, मुनिचलाई, टेप्पाकुलम मार्गे.
- वंदियुर ते अय्यर बंगला – अण्णा नगर, सुगुणा स्टोअर्स, अरविंद आय हॉस्पिटल, केके नगर, अण्णा बस स्टँड, जीएच, गोरीपालयम, रिझर्व्ह लाइन, के. पुदूर मार्गे
- अनुप्पनदी - कूडल नगर - तेप्पकुलम, अण्णा नगर, अपोलो हॉस्पिटल्स, मट्टूतावणी, सर्वेयर कॉलनी, महात्मा गांधी नगर, अनैयुर मार्गे
- तिरुमंगलम ते मेलूर - तिरुमंगलम, कप्पलूर, थोपपूर, तिरुनगर, वडापालंजी, मदुराई कामराज विद्यापीठ, नागमलाई, नागरी, समयानाल्लूर, विलांगुडी, कूडल नगर, अरापलायम बस टर्मिनस, सिम्माकल, मदुराई रेल्वे जंक्शन, पेरियार बस टर्मिनस, जयहिंदपुराम, विल्लापूरम, महाल, टेप्पकुलम, अण्णा नगर, वंडीयूर, पाँडी कोइल, मट्टूतावणी, उच्च न्यायालय, टीव्हीएस श्रीचक्र, मेलूर.
- अळगरकोविल ते अवनियापुरम - अळगरकोविल, मूंद्रू मावडी, के. पुदूर, केके नगर, जीएच, गोरीपलायम, सेल्लूर, कूडल नगर, अरापलायम बीएस, पीपी चावडी (तेनी मुख्य भागात), बाय पास आरास्ता (पोनमेनी), वसंत नगर फेरी, टीव्हीएस नगर, पायकारा, तिरुप्परनकुंड्रम, निलैयूर, विमानतळ, मंडेला नगर, ट्रान्सपोर्ट नगर (रिंग रोडच्या बाजूने), अवनियापुरम.
अवनियापुरम, गोरीपालयम, मदुराई रेल्वे स्टेशन, पेरियार बस स्टँड, कीलावसल, अण्णा नगर, टेप्पकुलम, मत्तुथवानी, तिरुपरंकुंड्रम हे अदलाबदल स्थानक होते.[१३][१४]
तामिळनाडू सरकारने तमिळनाडू राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर मदुराई येथे मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव ठेवला.[१५][१६] सी.एम. आर एल. ने मार्च, २०२२ मध्ये प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी निविदा सूचना प्रसिद्ध केली आणि BARSYL ने मे, २०२२ च्या अंतिम मुदतीसह व्यवहार्यता अभ्यास तयार करण्यासाठी निविदा पाठवली.[१७][१८]
प्रकल्प टाइमलाइन
[संपादन]- २०१२ : जे. जयललिता यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने मदुराई, तिरुचिरापल्ली, तिरुनेलवेली आणि सेलम सारख्या स्तर -२ शहरांसाठी मोनोरेल प्रकल्पाची घोषणा केली.[१९]
- २०२१ : ए.मके. स्टॅलिनच्या नेतृत्वात तामिळनाडू सरकारने मदुराई सारख्या स्तर -२ शहरांसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पांची घोषणा केली
- २०२२ : BARSYL ने मदुराई मधील मोठ्या जलद वाहतूक व्यवस्थेसाठी व्यवहार्यता अभ्यास तयार करण्यासाठी निविदा मिळवली.[२०]
- २०२२ नोव्हेंबर: बालाजी रेल रोड सिस्टीम्स (BARSYL) आणि चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड (CMRL) यांनी तयार केलेल्या आवाहाला द्वारे नमूद केले कि मदुराई मेट्रो रेल्वेचे पहिल्या टप्प्यात १७ स्टेशनांसह २२ किमी लांबीचे जाळे असेल.[२१]
- २०२३ मार्च: आरवी असोसिएट्सने १.३५ कोटींचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी निविदा स्वीकारली.[२२]
प्रस्तावित मार्गिका
[संपादन]पहिला टप्पा
[संपादन]मदुराईमधील पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित मेट्रो रेल्वे मार्ग[२३]
मदुराई मेट्रो | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|
क्र. | ओळ | पहिले स्थाहनक | शेवटचे स्थानक | रस्ते | मार्ग | लांबी (किमी) | स्थानकांची संख्या |
१ | मार्गिका १ | तिरुमंगलम | ओत्ताक्कडै | तिरुपरंकुंद्रम रोड, मट्टूतावणी हाय रोड | एम्स, तिरुप्परनकुंड्रम, पेरियार बस टर्मिनस, एमजीआर बस टर्मिनस, मीनाक्षी मंदिर, मद्रास उच्च न्यायालय- मदुराई खंडपीठ | ३१ | २२ |
दुसरा टप्पा
[संपादन]मदुराईमधील दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित मेट्रो रेल्वे मार्ग[२४][२५]
मदुराई मेट्रो | ||||||
---|---|---|---|---|---|---|
क्र. | मार्गिका | पहिले स्थानक | शेवटचे स्थानक | मार्ग | लांबी (किमी) | स्थानकांची संख्या |
२ | मार्गिका २ | कट्टापुली नगर | मदुराई आंतरराष्ट्रीय विमानतळ | समयनाल्लूर, परवाई, फातिमा कॉलेज, मदुराई जंक्शन, एमजीआर बस टर्मिनस, मीनाक्षी मंदिर, पेरुंगुडी | २० | १४ |
३ | मार्गिका ३ | मनलूर | चेकनुरानी | वेलम्मळ कॉलेज, कीलवसल, मदुराई जंक्शन, एमजीआर बस टर्मिनस, मीनाक्षी मंदिर, कलावसल, नागमलै पुदुक्कोट्टै | २३ | १९ |
हे देखील पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Firm picked to prepare Madurai metro DPR". The Times of India. 27 March 2023. 8 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Madurai Metro Rail: 27 Stations Planned for the Project, DPR to be Submitted by 15 July". Metro Rail News. 29 June 2023. 8 May 2024 रोजी पाहिले.
- ^ Sampath, Nirupa (2024-11-25). "CMRL puts Madurai and Coimbatore Metro plans on fast track". www.dtnext.in (इंग्रजी भाषेत). 2024-11-27 रोजी पाहिले.
- ^ "Chennai Metro Focuses on Coimbatore and Madurai, Delays Salem and Tiruchy Projects". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-27 रोजी पाहिले.
- ^ Shrikumar, A. (2020-01-22). "Waiting for metro: stakeholders pitch points". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ "Will push for metro rail, bus port in Madurai: Revenue min | Madurai News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 5 Jan 2020. 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ Mallady, Shastry V. (2020-02-14). "Why no Metro Rail for our Madurai? asks TN Chamber". Lotus Times | Madurai | Tamilnadu | Lotus Times (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ "மதுரையில் மெட்ரோ ரயில் திட்டம்..? மத்திய அமைச்சரின் அதிரடி பதில்..!". Asianet News Network Pvt Ltd (तामिळ भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ "Archive News". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ Narasimhan, T. E. (2010-01-25). "Scomi eyes partners for monorail projects". Business Standard India. 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ "மதுரையில் போக்குவரத்து நெரிசலை தவிர்க்க மெட்ரோ ரயில் திட்டம்". www.dinakaran.com (इंग्रजी भाषेत). 2020-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ Dc; Chennai. "Jayalalithaa plans perfect future for Tamil Nadu". The Asian Age (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ "Archive News". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ Dc; Chennai. "Jayalalithaa plans perfect future for Tamil Nadu". The Asian Age (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ "Metro rail plan for Madurai, a great move".
- ^ "CMRL to do a feasibility study for building mass rapid transit in three cities".
- ^ "BARSYL bags the tender to prepare feasibility study for MRTS in Madurai".
- ^ "Metro feasibility report to be ready by May".
- ^ Dc; Chennai. "Jayalalithaa plans perfect future for Tamil Nadu". The Asian Age (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
- ^ "Feasibility study for Madurai MRTS to start soon".
- ^ Sampath, Nirupa. "Madurai metro rail will cover 29km with 17 stations in phase 1". DT next (इंग्रजी भाषेत). 2022-11-13 रोजी पाहिले.
- ^ "Firm picked to prepare Madurai metro DPR". The Times of India. 2023-03-27. ISSN 0971-8257. 2023-03-27 रोजी पाहिले.
- ^ "Tender floated to prepare detailed project report for Madurai metro". 2023-04-15 रोजी पाहिले.
- ^ "Madurai metro to link airport in phase II; 5 km to be underground". 2023-04-07 रोजी पाहिले.
- ^ Staff, T. N. M. (2023-02-20). "Madurai metro: CMRL submits feasibility report, three things to know". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2024-03-29 रोजी पाहिले.