मदुराई डेहराडून एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मदुराई डेहराडून एक्सप्रेसचा फलक

मदुराई डेहराडून एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. दक्षिण रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी तमिळनाडूच्या मदुराईउत्तराखंडच्या डेहराडून ह्या शहरांदरम्यान धावते. चेन्नई सेंट्रल पर्यन्त धावणाऱ्या ह्या गाडीचा मार्ग मदुराईपर्यंत वाढवण्यात आला. हिचा अप क्रं.12687 आणि परतीचा डाऊन क्रं.12688 आहे.


बोगी[संपादन]

सध्या या रेल्वे ला 1 वातानुकूलित 2 टायर, 3 वातानुकूलित 3 टायर, 8 श्ययन वर्ग, 4 सामान्य बिना आरक्षित, 2 बैठक कम प्रवाशी समान, 1 खान पान व्यवस्था, 4 उछ क्षमतेच्या पार्सल व्हॅन, अस्या एकूण 23 बोगी आहेत.

भारतीय रेल्वे स्वत:च्या अधिकारात प्रवाश्यांच्या मागणी नुसार रेल्वे सेवेत विविध प्रकारचे बादल करते.


सेवा[संपादन]

मदुराई डेहराडून एक्सप्रेस रेल्वे प्रस्थान ते आगमन पर्यंतचा अप मार्गावर 3095 की.मी.प्रवास तासी सरासरी 57.94 की.मी. प्रमाणे 53 तास आणि 25 मिनिटात पार करते आणि परतीचा डावून 3087 की.मी. प्रवास तासी सरासरी 57.17 की.मी वेगाने 54 तासात पार करते.

भारतीय रेल्वे नियमांनुसार हिचा वेग तासी 55 की.मी. पेक्षा जादा असल्याने प्रवाशी भाड्यावर अधिभार लावलेला आहे.

ही रेल्वे चालविण्यासाठी तिच्या मार्गावर 4 रेल्वे इंजिनाची व्यवस्था ठेवलेली आहे. कांही मार्गाचे विध्युतीकरण झालेले असल्याने मदुराई जंक्शन ते इरोड जंक्शन पर्यन्त WDM 3 A इंजिन वापरले जाते पुढे WAP 4 चेन्नई सेंट्रल पर्यन्त, पुढे हजरत निजामूद्दीन पर्यन्त WAP 4 इंजिन आणि WDM 3A पुढील डेहराडून पर्यन्त चे प्रवासासाठी वापरले जाते.


वेळ[संपादन]

ट्रेन

क्रं.

प्रस्थान वेळ[१] आगमन वेळ आठवड्यात
12687 मदुराई जंक्शन 23.35 hrs (भाप्रवे) डेहराडून 5.00 hrs (भाप्रवे) (बुधवार

आणि रविवार)

12688 डेहराडून 06.45 hrs (भाप्रवे) मदुराई जंक्शन 12.45 hrs(भाप्रवे) (सोमवार

आणि शुक्रवार)

मार्ग[संपादन]

मदुराई डेहराडून एक्सप्रेस रेल्वे इरोड मार्गे चेन्नई सेंट्रल, विजयवाडा जंक्शन, नागपुर, भोपाळ जंक्शन, ग्वालियर, हजरत निजामूद्दीन, मीरठ सिटी जंक्शन, सहारनपुर जंक्शन, ते डेहराडून या मार्गावर धावते.[२]

मदुराई चंडीगढ एक्सप्रेसच्या श्ययन बोगी या रेल्वेला साहरणपूर जंक्शनवर जोडल्या जातात तसेच काढल्या जातात. इरोड जंक्शन, चेन्नई सेंट्रल आणि साहरणपूर जंक्शन स्टेशनवर या रेल्वे गाडीचे डबे तीन दिशेच्या रेल्वे मार्गावर विभागले जातात[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "मदुराई डेहराडून एक्सप्रेस वेळापत्रक" (इंग्लिश मजकूर). इ ट्रैन्स.इन. ०३-०९-१५ रोजी पाहिले. 
  2. ^ "मदुराई डेहराडून एक्सप्रेस मार्ग" (इंग्लिश मजकूर). क्लेअरट्रिप.कॉम. ०३-०९-१५ रोजी पाहिले. 
  3. ^ "रेल न्यूज सेंटर : एक्सटेन्शन ऑफ देहरादून" (इंग्लिश मजकूर). रेलन्यूजसेंटर.कॉम.