मणिशंकर अय्यर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मणीशंकर अय्यर (तमिळ: மணிசங்கர் அய்யர்) (एप्रिल १०, इ.स. १९४१- हयात) हे भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील मयिलादुतुराई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. तसेच त्यांनी इ.स. २००४ ते इ.स. २००९ दरम्यान मनमोहन सिंह सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री,पंचायती राज मंत्री आणि क्रिडामंत्री म्हणून काम बघितले.