मंदेश्वरचा तह
Appearance
(मंदसोरचा तह या पानावरून पुनर्निर्देशित)
मंदेश्वरचा तह ६ जानेवारी, १८१८ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि इंदूरचे होळकर यांच्या दरम्यान झालेला तह होता. यानुसार होळकरांनी ब्रिटिशांचे सार्वभौमत्व मान्य केले व त्यांविरुद्धच्या सगळ्या कारवाया थांबवल्या.
तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धाच्या शेवटी झालेल्या या तहातील कलमे होळकरांना अपमानास्पद आणि त्यांचे राज्य प्रभावीपणे नामशेष करणारी होती. यांपैकी काही[१] --
- इंदूर ब्रिटिशांचे मांडलिक संस्थान झाले.
- होळकरांनी खानदेश सह नर्मदेच्या दक्षिणेकडील आपला सर्व प्रदेश ब्रिटिशांच्या आधीन केला.
- होळकरांच्या ताब्यात नसलेले परंतु होळकरांनी दावा सांगितलेल्या इतर प्रदेशांवरून होळकरांनी दावा मागे घेतला.
- इंदूरच्या राजगादीवर ११ वर्षांच्या दुसऱ्या मल्हाररावाला बसविले आणि पंतप्रधानांच्या वतीने राज्याचा कारभार चालवणे भाग पाडले.
- ब्रिटिशांचा रेसिडेंट कायमीस्वरुपात इंदूरच्या दरबारात पदस्थ झाला.
- भारतातील पेशव्यांसह इतर संस्थानांशी होळकरांनी संबंध तोडणे भाग पडले.
या तहाने इंदूरचा पाडाव झाल्यानंतर मराठ्यांची बाजू कमकुवत झाली व युद्ध संपण्याच्या मार्गी लागले.