Jump to content

मंजू मणिकुट्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
মঞ্জু মণিকুট্টন (bn); Manju Manikuttan (ha); മഞ്ജു മണിക്കുട്ടൻ (ml); Manju Manikuttan (ast); मंजू मणिकुट्टन (mr); మంజు మణికుట్టన్ (te); Manju Manikuttan (en); মঞ্জু মণিকুত্তন (as); Manju Manikuttan (nl); ᱢᱚᱧᱡᱩ ᱢᱟᱱᱤᱠᱩᱴᱴᱟᱱ (sat); மஞ்சு மணிக்குட்டன் (ta) Indian beautician and social worker (born 1976) (en); Indian beautician and social worker (born 1976) (en); Indiaas schoonheidsspecialiste (nl)
मंजू मणिकुट्टन 
Indian beautician and social worker (born 1976)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखc. इ.स. १९७६
एर्नाकुलम जिल्हा
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
  • cosmetologist
  • सामाजिक कार्यकर्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

मंजू मणिकुट्टन (जन्म: १९७६ ) या एक भारतीय सौंदर्यप्रसाधक (ब्युटीशियन) आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी सौदी अरेबियामध्ये कायदेशीर, आरोग्य आणि कामाशी संबंधित समस्यांना तोंड देणाऱ्या अनेक परदेशी कामगारांना वाचवले. २०१९ मध्ये मंजू यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जीवन

[संपादन]

मणिकुट्टनचा जन्म आणि संगोपन केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात[] झाले.[] त्यांचे लग्न पद्मनाभन मणिकुट्टनशी झाले. त्यांना दोन मुले (अभिनव आणि अभिरामी) झाल्यानंतर, २०११ मध्ये मंजू आपल्या पतीसह सौदी अरेबियातील अल-खोबर शहरात राहायला गेल्या आणि सौंदर्यप्रसाधक म्हणून एका सौंदर्य प्रसाधन केंद्र, अर्थात ब्युटी पार्लरमध्ये काम करू लागल्या.[]

सौदी अरेबियातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि नवयुगम सांस्कृतिक मंचाच्या उपाध्यक्षा सफिया अजित यांना भेटल्यानंतर त्यांचे जीवन बदलले. अजित यांनी त्यांना समाजसेवेत प्रवेश करण्यास प्रोत्साहित केले आणि निर्वासन केंद्रातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या अजितची सहाय्यक म्हणून काम करू लागल्या. एका वर्षानंतर, कर्करोगाने अजित यांचे निधन झाले. नवयुगम यांनी मणिकुट्टन यांना अजित यांनी सांभाळलेल्या जबाबदाऱ्या सोपवल्या. मणिकुट्टन यांनी महिला निर्वासन केंद्राची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि महिला कैद्यांच्या प्रकरणांचे निराकरण करण्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे पती पद्मनाभन मणिकुट्टन हे त्यांच्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना मदत करत आहेत.

सौदी अरेबियात घरकाम करणाऱ्या, रुग्णालयातील कामगार, ब्युटीशियन इत्यादी म्हणून काम करणाऱ्या आणि त्यांच्या प्रायोजकांशी, आरोग्य, कायदेशीर आणि कामगार समस्या आणि व्हिसा यासारख्या समस्यांना तोंड देणाऱ्या महिलांचे शेकडो प्रकरणे मणिकुट्टनने सोडवली. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेकडो महिलांना भारतात परत जाण्यास मदत केली. भारतीय दूतावासाने मंजू यांना एक समर्पित सामाजिक स्वयंसेवक म्हणून मान्यता दिली आणि भारतीय महिला कामगारांशी संबंधित कोणत्याही प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला. महिला निर्वासन अधिकारी आणि सौदी अधिकाऱ्यांचे त्यांच्याबद्दल खूप उच्च मत असून त्यांनी मंजू यांना अनेक गुंतागुंतीच्या कामगार आणि व्हिसा प्रकरणांमध्ये मदत केली.

२०१९ मध्ये त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.[] हा भारतीय "महिला सक्षमीकरणासाठीच्या अपवादात्मक कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार" आहे.[] त्यांनी मंत्री मेनका गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या वर्षी हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव प्रवासी महिला होत्या.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Mohammed, Irfan (2019-03-20). "India president confers Manju with Nari Shakti Puraskar award". Saudigazette (English भाषेत). 2021-01-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Ministry of Women and Child Development". www.facebook.com. 2021-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ "This beautician gives Khaddamas a ray of hope in desert kingdom". The New Indian Express. 2021-01-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Malayali volunteer gets Nari Shakti Puraskar | Kochi News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). Feb 25, 2019. 2021-01-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-09 रोजी पाहिले.