भौगोलिक माहिती प्रणाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय भौगोलिक माहिती प्रणाली ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे.

भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) एक अशी प्रणाली आहे जी स्थानिक किंवा भौगोलिक माहिती संकलन, साठवणूक, विश्लेषण, व्यवस्थापन, आदान-प्रदान आणि प्रदर्शित करते. भौगोलिक माहिती प्रणाली कधीकधी भौगोलिक माहिती विज्ञान या नावाने संबोधली जाते.

भौगोलिक माहिती प्रणाली वापरकर्त्यांना परस्पर संवादी प्रश्न निर्माण करण्यासाठी परवानगी देते (वापरकर्ता-निर्मित शोध), स्थानिक माहितीचे विश्लेषण करते.

भौगोलिक माहिती प्रणाली विविध तंत्रज्ञानाची, प्रक्रियेची आणि पध्दतींचा संदर्भ घेऊ शकते. अभियांत्रिकी, नियोजन, व्यवस्थापन, वाहतूक / पुरवठा, विमा, दूरसंचार आणि अनेक उपयोजन आहेत.

प्रणालीचे महत्त्वाचे घटक[संपादन]

 1. हार्डवेअर
 2. आज्ञावली (सॉफ्टवेअर)
 3. तज्ञ वापरकर्ता
 4. माहिती (भौगोलिक माहिती)

आज्ञावली (सॉफ्टवेअर)[संपादन]

भौगोलिक माहिती प्रणाली ही संगणकावर आज्ञावलीद्वारे वापरावयाची एक प्रणाली आहे. आज भौगोलिक माहिती प्रणाली वापरण्यासाठी अनेक आज्ञावली उपलब्ध आहेत.

त्यातील बहुतांश आज्ञावली या मोफत उपलब्ध नाहीत.

उदा. आर्कजीआयएस, ग्लोबल मॅपर

परंतु काही मोफत आज्ञावलीदेखील उपलब्ध आहेत.

उदा. क्यूजीआयएस

प्रणालीचे उपयोजन[संपादन]

भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन अनेकविध क्षेत्रात होते जसे की

 1. वनसंपदा व्यवस्थापन
 2. जलसंपदा व्यवस्थापन
 3. भूसंपदा व्यवस्थापन
 4. मृद्संपदा व्यवस्थापन
 5. आपत्ती व्यवस्थापन
 6. वाहतूक व्यवस्थापन
 7. कृषी व्यवस्थापन
 8. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन
 9. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन
 10. युद्ध व्यवस्थापन
 11. नगररचना
 12. भूरूपशास्त्रीय अभ्यास
 13. हवामानशास्त्रीय अभ्यास
 14. सागरशास्त्रीय अभ्यास
 15. लोकसंख्या अभ्यास

भौगोलिक माहिती प्रणालीशी संबंधित महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था[संपादन]

१. राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (एनाआरएससी), बालानगर, हैद्राबाद, तेलंगण, भारत

२. भारतीय सुदूर संवेदन संस्था, डेहराडून, उत्तराखंड, भारत

३. साधनसंपदा अभियांत्रिकी अभ्यास केंद्र, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, पवई, महाराष्ट्र, भारत

नावात गल्लत[संपादन]

भौगोलिक माहिती प्रणाली यास इंग्रजीमध्ये जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टिम असे नाव आहे ज्याचे संक्षिप्त रुप जीआयएस असे होते. परंतु कित्येकदा जीआयएस या नावात गल्लत होउन जीएसआय असे लिहिले / बोलले जाते.[१][२][३][४][५][६][७][८][९][१०][११][१२][१३]

संदर्भ[संपादन]

जीएसआय हे 'भारतीय भुशास्त्रीय सर्वेक्षण' विभाग (जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) याचे संक्षिप्त रुप आहे.

 1. ^ "'जीएसआय' योजना बारगळली". 
 2. ^ "जीएसआय मॅपिंग अद्याप अपूर्णच". www.esakal.com (mr मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले. 
 3. ^ "मिळकतीच्या जीएसआय मॅपिंगचे काम अर्धवट - Hindusthan Samachar Marathi". Dailyhunt (en मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले. 
 4. ^ Lonkar, Sharad (2017-03-05). "जीएसआय मॅपिंग; वापरात बदल, नोंद नसलेल्या एक लाख मिळकती सापडल्या". My Marathi (en-GB मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले. 
 5. ^ "जीएसआय प्रणाली- Latest News on जीएसआय प्रणाली | Read Breaking News on Zee News Marathi". zeenews.india.com (en मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले. 
 6. ^ "पाणीपट्टीत दुप्पट वाढीची शिफारस". Loksatta (mr-IN मजकूर). 2015-02-19. 2019-03-02 रोजी पाहिले. 
 7. ^ "मिळकतींच्या जीएसआय मॅपिंग कंत्राटाची चौकशी व्हावी- सजग नागरिक मंच". Janshakti (en-US मजकूर). 2018-12-10. 2019-03-02 रोजी पाहिले. 
 8. ^ author/admin (2017-03-05). "जीआयएसच्या कक्षेत हजारो अनधिकृत मिळकती". Lokmat. 2019-03-02 रोजी पाहिले. 
 9. ^ "मिळकतींचे जीएसआय मॅपिंग काम पूर्ण". 
 10. ^ "Agrowon - Mitra Global Shivaracha". www.facebook.com (mr मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले. 
 11. ^ "शहरातील मिळकतींना आता डिजिटल". 
 12. ^ "देशातील जीआयएस प्रणाली अकलूज ग्रामपंचायतीची" (en मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले. 
 13. ^ News, Chaupher. "उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाकडून होणार तेरा वर्षानंतर वृक्षगणना | Chaupher News" (en-US मजकूर). 2019-03-02 रोजी पाहिले.