भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथील संस्था आहे.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार[संपादन]

या संस्थेकडून दरवर्षी साहित्य व साहित्यसेवा पुरस्कार दिले जातात. इ.स. २०१७ सालचे पुरस्कार दि. २० मे २०१७ रोजी जाहीर झाले आहेत. इसबावी ता. पंढरपूर येथील डॉ. द.ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात येणार्‍या साहित्य व साहित्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. सदानंद देशमुख, गणेश मरकड,, सुभाष विभुते, कल्पना दुधाळ हे मानकरी ठरले.असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष कल्याण शिंदे यांनी दिली. डॉ. द.ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था यांच्या वतीने दरवर्षी साहित्य व साहित्य सेवा पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीचा[ संदर्भ हवा ]

साहित्य व साहित्य सेवा पुरस्कार डॉ. सदानंद देशमुख यांच्या चारीमेरा या कादंबरीस जाहीर झाला आहे. डॉ. सदानंद देशमुख हे शेतकरी आणि शेतकर्‍यांचे जागतिकीकरणात होणाऱ्या परिणामांवर आधारित लेखन करत असतात. जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलढाणा) येथील शेतकरी कुटुंबातील देशमुख यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.[ संदर्भ हवा ]

दुसरा पुरस्कार गणेश मरकड यांच्या गावाला सोबत घेऊन जाताना या कविता संग्रहास जाहीर झाला आहे. गणेश मरकड हे जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.[ संदर्भ हवा ]

तिसरा पुरस्कार कल्पना दुधाळ यांच्या धग असतेच आसपास या कविता संग्रहास जाहीर झाला आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या कल्पना दुधाळ यांची कविता मुंबई व सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहे. साहित्य अकादमी जोधपूरच्या संमेलनात त्यांचा गौरव झाला आहे.[ संदर्भ हवा ]

साहित्य सेवा पुरस्कार आजरा (जि.कोल्हापूर) येथील सुभाष विभुते यांना जाहीर झाला आहे. लहान मुलांसाठी ॠग्वेद मासिकाच्या माध्यमातून अनेक उपक्रम, व्याख्यानमाला राबविल्या आहेत. प्रत्येकी 11 हजार 111 रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दि. ३ जून २०१७ रोजी हे पुरस्कार डॉ.आ.ह. साळुंखे व माजी आ.उल्हास पवार, पुणे यांच्या हस्ते वितरित झाले.[ संदर्भ हवा ]

इसबावी येथील याच संस्थांकडून अशोक जाधव यांच्या 'भंगार' या आत्मचरित्राला पुरस्कार मिळला होता.[ संदर्भ हवा ]

Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.