भोसले (राजघराणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोसले हे एक मराठा आडनाव आहे.भोसले इक्ष्वाकु कुलीन क्षत्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे विशेष परिचीत आहे.दुर्लभ अशा प्राचीन शिवभारत नावाच्या ग्रंथात याची माहिती दिली आहे. त्यामुळे भोसले हे सिसोदिया कुलीन सूर्यवंशी क्षत्रिय आहे.

भोसले घराण्याचा इतिहास[संपादन]

अल्लाउद्दीन खिल्जीने ज्यावेळी इ.स.१३०३ मध्ये चित्तोडवर स्वारी केली, तेव्हा झालेल्या लढाईत राणा लक्ष्मणसिंह ठार झाला. राणी पद्मिनीने इअतर राजस्त्रीयांसहीत आत्मत्याग केला.लक्ष्मणसिंहाचे सात मुलगे या लढाईत ठार झाले. आठवा मुलगा अजयसिंह चित्तोडच्या गादीवर आला. अजयसिंहाला सजनसिंह आणि क्षेमसिंह असे दोन मुलगे होते. एका लढाईत दोघांनाही आलेल्या अपयशामुळे रागावलेल्या अजयसिंहाने पुतण्या हमीरला गादीवर बसवले. त्यामुळे नाराज होऊन हे बंधू इ.स.१३२० च्या सुमारास मेवाड सोडुन दक्षिणेकडे आले. सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह यांनी बहामनी राज्याची स्थापना करणाऱ्या सुल्तान हसन गंगू बहामनी यांच्याकडे नोकरी पत्करली. याच दिलिपसिंहापासूनच्या १२व्या पिढित (सन १५३३) बाबाजी यांचे पुत्र मालोजी हे जन्माला आले. मालोजी हे शहाजी राजांचा जन्म झाला. दिलिपसिंहाच्या नातवाचे नाव भोसाजी असे होते. याच नावामुळे पुढे हा वंश भोसले म्हणुन ओळखला जाउ लागला.

   भोसले घराणे चित्तोडच्या राजपुत सिसोदिया वंशातील अस्ल्याची वंशावळ उपलब्ध आहे. तसेच खुपशा जुन्या शिवकालीन कागदपत्रांमध्ये शहाजीराजे आणि शिवाजी राजांचा उल्लेख राजपुत म्हणुन केल्याची नोंदही मिळते.

सातारा घराणे[संपादन]

संभाजी महाराज वंश :-

  राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी इ.सन 1700 च्या सुमारास आपली राजधानी साताराला नेली. 
   पण खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी धनाजी जाधव व बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने ताराबाईंचा पराभव करून सातारा जिंकले; शाहू महाराजांच्या काळात सातारा खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याची राजधानी झाली व सातारा राजवंशाची सुरुवात झाली.

कोल्हापुर घराणे[संपादन]

राजाराम महाराज वंश :-

  राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाईसंभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्यात 1707 साली खेड चे युद्ध झाले यात धनाजी जाधव आणि  बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांची सहायता केली व महाराणी ताराबाईंचा दारुण पराभव झाला व त्यांना सातारा सोडून जावे लागले, 
   तेव्हा महाराणी ताराबाईंनी आपले पुत्र शिवाजी राजे द्वितीय यांच्या नावाने कोल्हापूर गादीची स्थापना केली.

तंजावुर घराणे[संपादन]

व्यंकोजी महाराज वंश :-

शहाजी राजे भोसलेंचे तृतीय पुत्र  व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर प्रांतात तंजावर भोसले घराण्याची स्थापना केली.शहाजी महाराजांची दूसरी पत्नी तुकाबाई यांपासून त्यांना पूत्रप्राप्ती झाली त्याचे नाव त्यांनी दक्षिण भारतीय देवता व्यंकटेश (विष्णु) पासून व्यंकोजी हे नाव ठेवले.व त्यांच्या वाट्याला शहाजी महाराजांची दक्षिणेतील जहागिर तंजावर आली. वर्तमान तामिळनाडू राज्यातील बहुतांश प्रदेशावर तंजावर राजपरिवाराचे शासन होते.
  आश्चर्याची गोष्ट म्हणजे दक्षिण भारतातील तंजावर भोसले परिवार रामदासी संप्रदायाचे पालन करत असून या राजपरिवाराकडे सोन्याच्या शाईने लिहिलेले दासबोध ग्रंथ आहे

१) श्रीमंत व्यंकोजी राजे भोसले इ.स. १६७७ ते १६८३

२) श्रीमंत शहाजी राजे भोसले इ.स. १६८४ ते १७१२

३) श्रीमंत शरभोजी राजे भोसले (पहिले) इ.स. १७१२ ते १७२८

४) श्रीमंत तुळजेंद्र राजे भोसले (पहिले) तथा तुकोजी इ.स. १७२८ ते १७३५

५) श्रीमंत एकोजी राजे भोसले (दुसरे) इ.स. १७३६ ते १७३९

६) श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले इ.स. १७४० ते १७६३

७) श्रीमंत तुळजेंद्र राजे भोसले (दुसरे) १७६३ ते १७८७

नागपूर घराणे[संपादन]

  सन 1743 च्या सुमारास रघूजी भोसले यांनी  नागपूर मधील गोंड राज्याचा पराभव करून क्षत्रिय सत्ता स्थापन केली. व रघुजी भोसले हे नागपूर चे राजा झाले.
  नागपूरकर भोसले हे पेशवाई चे खास मित्र पक्ष असून हैदराबाद चा निजाम व पेशवाई विरुद्ध झालेल्या युद्धात जानोजी भोसले यांनी निजामाचा पराभव करण्यासाठी नानासाहेब पेशव्यांची सहायता केली.
    सन 1818 मध्ये इंग्रज व मराठा साम्राज्यात झालेल्या निर्णायक युद्धात (मुधोजी भोसले द्वितीय)आप्पासाहेब भोसले हे इंग्रजांकडून पराभूत झाले.

नागपूर भोसले वंश

प्रथम राघूजी भोसले (१७३९ – १४ फेब्रुवारी१७५५)

जानोजी भोसले (१७५५ – २१ मे १७७२)

मुधोजी भोसले (१७७२– १९ मे १७८८)

दुसरे राघूजी भोसले (१७८८ – २२ मार्च १८१६)

परसोजी भोसले (१८१६ – २ फेब्रुवारी १८१७) (जन्म : १७७८ – निधन : १८१७)

दुसरे मुधोजी भोसले "आप्पा साहेब" (१८१७ – १५ मार्च १८१८) (जन्म : १७९६ – निधन : १८४०)

रघुजी भोसले तिसरा (१८१८ – ११ डिसें १८५३) (जन्म : १८०८ – निधन :१८५३)

अक्कलकोट घराणे[संपादन]

 छत्रपती शाहू महाराजांचे मानसपुत्र फत्तेसिंह भोसले यांनी अक्कलकोट भोसले घराण्याची स्थापना केली. या घराण्यातील मालोजीराजे भोसले हे स्वामी समर्थ नामक संतांच्या भक्तिसाठी प्रसिद्ध आहेत.
  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
    वर्तमान काळात जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले हे स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध आहेत.

अक्कलकोट भोसले वंश :-

१७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले

१७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले

१७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले

१८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले

१८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले

१८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले

१८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले

१८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह (तिसरे) भोसले

१९२३-१९५२ - विजयसिंहराव भोसले

१९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]