भोजपूर, मध्य प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भोजपूर (मध्य प्रदेश) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

भारतातल्या मध्य प्रदेश राज्यातील भीमबेटकापासून दक्षिणेला २५ किलोमीटरवर बेतवा नदीच्या काठी भोजपूर नावाचे गाव आहे. परमार घराण्याचा प्रसिद्ध राजा भोज याच्यावरून हे नाव पडल्याचे सांगतात. येथे असलेले भोजेश्वर हे महादेवाचे मंदिर अतिप्राचीन आहे. विटांनी बांधलेल्या या मंदिरावर आज शिखर नाही. परंतु या मंदिरात असलेली १८ फूट उंच शंकराची पिंडी खास बघावी अशी आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथेच बाजूला असलेल्या दगडावर या मंदिराचे स्थापत्य नियोजन कोरलेले आहे.