भूतानमधील रेल्वे वाहतूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भूतान मधील रेल्वे वाहतूक या पानावरून पुनर्निर्देशित)

भूतानमध्ये रेल्वे वाहतूक नाही.

तथापि, भूतान आणि भारतानी भूतानला भारतीय रेल्वे जाळ्याशी जोडण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.[१] १५ जानेवारी २००५ रोजी, भूतानचे राजा आणि भारतीय पंतप्रधान यांनी रेल्वे जोडण्यांसाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यास सहमती दर्शविली.

संभाव्य मार्ग : हसीमारा - फिएंटशोलिंग आणि पासाका कडे शाखा (१८ किमी); कोकराझार – गेलेफू (७० किमी); पथसला – नागलाम (४० किमी); रंगला – दररंगा – समद्रुपजोंगकर (६० किमी); आणि बनारहाट - समत्से.[२] भूतानमधील रेल्वे १,६७६ मिमी रुंदीचे रुंदमापी असेल .

हे सुद्धा पहा[संपादन]

  • भूतान मध्ये वाहतूक

संदर्भ[संपादन]