Jump to content

भिवानी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भिवानी जिल्हा
हरयाणातील जिल्हे
भिवानी जिल्ह्याचे हरयाणातील स्थान
भिवानी जिल्ह्याचे हरयाणातील स्थान
देश भारत
राज्य हरयाणा
विभाग हिसार
मुख्यालय भिवानी
तहसिल
List
  • १. भिवनी, २. बावनी खेरा, ३. तोशम, ४. सिवनी, ५. लोहरु
सरकार
 • लोकसभा मतदारसंघ 1. भिवानी-महेंद्रगड (चरखी दादरी आणि महेंद्रगड जिल्ह्यांसह सामायिक केले), 2. हिसार आणि जिंद जिल्हा)
 • विधानसभा मतदार संघ 1. भिवनी , 2.लोहरु, 3. तोशम, 4. बावनी खेरा
क्षेत्रफळ
 • एकूण ३,४३२ km (१,३२५ sq mi)
लोकसंख्या
 (2011)
 • एकूण १६,३४,४४५
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zone UTC+05:30 (IST)
संकेतस्थळ https://bhiwani.gov.in/

हा लेख भिवानी जिल्ह्याविषयी आहे. भिवनी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

भिवानी जिल्हा हा उत्तर भारतातील हरियाणा राज्यातील २२ जिल्ह्यांपैकी एक आहे. २२ डिसेंबर १९७२ रोजी हा जिल्हा बनवला गेला. त्यावेळेस हा राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा होता. परंतु नंतर चरखी दादरी हा एक स्वतंत्र जिल्हा बनविला आणि याचे क्षेत्रफळ कमी झाले. सिरसा हा आता राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. भिवानी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,१४० चौरस किमी (१,९८० चौ. मैल) आहे. आणि यात २४४२ गावे प्रशासकीयदृष्ट्या नियंत्रित केली जातात. इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार याची लोकसंख्या १६,३४,४४५ होती.

याचे प्रशासकीय केंद्र भिवनी शहरात आहे. हे शहर राष्ट्रीय राजधानी दिल्लीपासून १२४ किलोमीटर (७७ मैल) अंतरावर आहे. जिल्ह्यातील सिवनी, लोहारू, तोषम, बवनी खेरा, कोहलावास, लांबा ही अन्य प्रमुख शहरे आहेत.[] इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार फरीदाबाद आणि हिसार जिल्ह्यांनंतर हा हरियाणाचा तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. []

इतिहास

[संपादन]

पूर्व-सिंधू सभ्यतेच्या काळातील खाणी, खनिज वितळून धातू वेगळा काढणारे कारखाने आणि त्याकाळची घरे तोशाम जवळील पर्वतरांगात सापडली आहेत. [ संदर्भ हवा ] भिवानीतील मिताथल गावातील उत्खननात (१९६८-७३ आणि १९८०-८६) हडप्पापूर्व आणि हडप्पा (सिंधूखोऱ्यातील संस्कृती) या संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. भिवानी शहराच्या पूर्वेस सुमारे १० किलोमीटर (६.२ मैल) नौरंगाबाद गावाजवळ, २००१ मध्ये झालेल्या प्राथमिक उत्खननात २,५०० वर्षांपूर्वीची नाणी, साधने, चाळणी, खेळणी, पुतळे आणि भांडी असलेली कलाकृती सापडली. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते येथील नाणी, नाण्यांचे साचे, पुतळे आणि घरांचे डिझाइन यांची उपस्थिती असे सूचित करते की कुशन, गुप्त आणि युधेय काळात इ.स.पू. ३०० पर्यंत हे शहर अस्तित्वात होते. ऐव-ए-अकबरीमध्ये भिवानी शहराचा उल्लेख आहे आणि मोगलांच्या काळापासून ते व्यापारातील एक प्रमुख केंद्र होते.

विभाग

[संपादन]

जिल्ह्यात भिवानी, लोहारू, सिवनी आणि तोषम असे चार उपविभाग आहेत. या उपविभागांना भिवानी, लोहारू, सिवनी, बवनी खेरा आणि तोशाम आणि एक उप-तहसील, बहल अशा पाच तहसीलांमध्ये विभागले गेले आहेत. या जिल्ह्यात भिवानी, लोहारू, बवानी खेरा, तोशाम आणि बवानी खेरा असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. बवानी खेरा हा हिसार (लोकसभा मतदारसंघ)चा भाग आहे तर उर्वरित भिवानी-महेंद्रगड (लोकसभा मतदारसंघ)चा भाग आहे.इ.स. २०१६ मध्ये भिवानी जिल्ह्यातील उपविभाग बडहरा आणि चरखी दादरी आणि उप-तहसील बोंड कलाण हे नवीन बनवलेल्या चरखी दादरी जिल्ह्यात समाविष्ट झाले.

लोकसंख्याशास्त्र

[संपादन]
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९५१ ४,३१,१८८
इ.स. १९६१ ५,५५,८८९ +२८%
इ.स. १९७१ ७,२४,७४१ +३०%
इ.स. १९८१ ९,४७,३७४ +३०%
इ.स. १९९१ ११,६३,४०० +२२%
इ.स. २००१ १४,२५,०२२ +२२%
इ.स. २०११ १६,३४,४४५ +१४%
source:[]

२०११ च्या जनगणनेनुसार भिवानी जिल्ह्याची लोकसंख्या १६,३४,४४५ होती.[] जवळजवळ गिनी-बिसाऊ देशाच्या लोकसंखेइतकी [] किंवा अमेरिकेतील इडाओ राज्याच्या लोकसंखेइतकी [] याला भारतातील ६४० जिल्ह्यांपैकी ३०६ व्या क्रमांकाचे स्थान मिळाले. [] या जिल्ह्यात सरासरी प्रति चौरस किलोमीटर ३४१ रहिवासी राहतात.[] २००१ -२०११ च्या दशकात लोकसंख्या वाढीचा दर १४.३२% होता. भिवानीमध्ये प्रत्येक १००० पुरुषांमागे ८८४ महिला आहेत आणि साक्षरता दर ७६.७% आहे. [] २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील ९९.३२% लोकांची हिंदी आणि ०.२२% लोकांची पंजाबी प्रथम बोलीभाषा होती.[]

शिक्षण

[संपादन]

विद्यापीठ

[संपादन]

येथे चौधरी बन्सीलाल विद्यापीठ आहे.

धार्मिक स्थाने

[संपादन]

देवसर धाम - भिवानी-लोहारू रोडवरील टेकडीवर हे आहे. येथे वैष्णोदेवीचे मंदिर आहे.

उल्लेखनीय व्यक्ति

[संपादन]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Archived copy". 29 March 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2010 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  2. ^ a b c d e "District Census 2011". Census2011.co.in. 2011. 30 September 2011 रोजी पाहिले.
  3. ^ Decadal Variation In Population Since 1901
  4. ^ US Directorate of Intelligence. "Country Comparison:Population". 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 October 2011 रोजी पाहिले. Guinea-Bissau 1,596,677 July 2011 est.
  5. ^ "2010 Resident Population Data". U. S. Census Bureau. 19 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 September 2011 रोजी पाहिले. Idaho 1,567,582
  6. ^ "C-16 Population By Mother Tongue - Haryana". censusindia.gov.in. 30 September 2019 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]