भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिशनिस्ट)
Appearance
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिशनिस्ट) हा भारतातील एक राजकीय पक्ष होता. १९६९ मध्ये सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर पदस्थ पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात या पक्षाची स्थापना झाली. सदर पक्ष १९७७ साली काँग्रेस (I) पक्षात विलीन झाला, पुढे ज्यालाच अधिकृत अ.भा. काँग्रेसचा दर्जा मिळाला.