भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२५
| भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२५ | |||||
| तारीख | २० जून – ४ ऑगस्ट २०२५ | ||||
| संघनायक | बेन स्टोक्स[a] | शुभमन गिल | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
| सर्वाधिक धावा | जो रूट (५३७) | शुभमन गिल (७५४) | |||
| सर्वाधिक बळी | जॉश टँग (१९) | मोहम्मद सिराज (२३) | |||
| मालिकावीर | हॅरी ब्रुक (इं) आणि शुभमन गिल (भा) | ||||
भारतीय क्रिकेट संघाने जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.[१] या दौऱ्यावर पाच कसोटी खेळवले गेले.[२][३] ही मालिका २०२५-२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती.[४] ऑगस्ट २०२४ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[५][६]
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला आता अँडरसन–तेंडुलकर चषक म्हणून ओळखले जाते. मालिकेचे नाव सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन ह्या क्रिकेट विश्वातील दोन दिग्गजांच्या सन्मानार्थ बदलण्यात आले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी गुरुवारी संयुक्तपणे ही नवीन ओळख जाहीर केली. ११ जून रोजी लॉर्ड्स येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी तेंडुलकर आणि अँडरसन यांनी ट्रॉफीचे अधिकृतपणे अनावरण केले.
यापूर्वी, भारत-इंग्लंड मालिका यजमान देशानुसार वेगवेगळ्या चषकासाठी खेळली जात होती. इंग्लंडमध्ये, ती पतौडी ट्रॉफी होती, ज्याचे नाव भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्या नावावर होते. भारतात, ती अँथनी डि मेलो चषक होती, जी भारतीय क्रिकेट प्रशासनाच्या सुरुवातीच्या शिल्पकारांपैकी एकाच्या नावावर होती.[७]
सचिन तेंडुलकरने बीसीसीआय आणि ईसीबीच्या पाठिंब्याने सुरू केलेला, पतौडी मेडल ऑफ एक्सलन्स हा कसोटी मालिकेतील विजेत्या कर्णधारासाठी नव्याने सादर केलेला पुरस्कार आहे.[८]
संघ
[संपादन]१७ जून रोजी, पहिल्या कसोटीसाठी हर्षित राणाला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले.[११] नंतर हर्षित राणाला भारतीय संघातून वगळण्यात आले. तो दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतासोबत बर्मिंगहॅमला गेला नाही.[१२] २० जुलै रोजी, अंशुल कंबोजला राखीव वेगवान गोलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले.[१३] २१ जुलै रोजी, नितीश कुमार रेड्डीला डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे उर्वरित सामन्यातून बाहेर काढण्यात आले आणि अर्शदीप सिंगला डाव्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे चौथ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१४][१५] २२ जुलै रोजी, आकाश दीपला मांडीच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१६] चौथ्या कसोटीदरम्यान, ऋषभ पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आणि तो मालिकेतून बाहेर पडला, नंतर त्याच्या जागी नारायण जगदीशनची निवड करण्यात आली.[१७]
२६ जून रोजी, जोफ्रा आर्चरला दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात समाविष्ट करण्यात आले.[१८] ६ जुलै रोजी, गस अॅटकिन्सनला तिसऱ्या कसोटीसाठी संघात समाविष्ट करण्यात आले.[१९] १४ जुलै रोजी, शोएब बशीरला डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मालिकेच्या उर्वरित सामन्यातून बाहेर काढण्यात आले,[२०] त्याच्या जागी लियाम डॉसनची निवड करण्यात आली.[२१] दरम्यान, सॅम कुक आणि जेमी ओव्हरटन यांना काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी त्यांच्या संबंधित काउंटींमध्ये सोडण्यात आले.[२२] तथापि, नंतर ओव्हरटनला पाचव्या कसोटीसाठी संघात परत बोलावण्यात आले.[२३] ३० जुलै रोजी, बेन स्टोक्सला उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे पाचव्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले आणि ऑली पोपची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.[२४]
सराव सामने
[संपादन]| भारत अ क्रिकेट संघाचा इंग्लड दौरा २०२५ | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लड दौरा २०२५ स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | ३० मे – ९ जून २०२५ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान |
| ||||||||||||||||||||||||||||||||
| निकाल | २ सामन्यांची मालिका ०-० अशी अनिर्णित | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
१ली अनधिकृत कसोटी
[संपादन]३० मे – २ जून २०२५ धावफलक |
वि |
||
- इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- एडी जॅकचे (इंग्लंड लायन्स) प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पण.
- इंग्लंड लायन्सच्या डॅन मौस्लीचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचे पहिले शतक झळकावले.[२५][२६]
२री अनधिकृत कसोटी
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२०–२४ जून २०२५ धावफलक |
वि |
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शुभमन गिलने कसोटीमध्ये पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व केले.[२७]
- साई सुदर्शनने भारताकडून कसोटी पदार्पण केले.[२८]
- शुभमन गिलच्या (भारत) कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण.[२९]
- ऋषभ पंतच्या (भारत) कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण, तो SENA देशांमध्ये आघाडीचा आशियाई यष्टिरक्षक आणि सर्वाधिक कसोटी शतके (७) असलेला भारतीय यष्टिरक्षक बनला. हे दोन्ही विक्रम करताना त्याने महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आणि विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंकडून सर्वाधिक षटकार (६२) मारताना रोहित शर्माला मागे टाकले. [३०]
- भारताच्या जसप्रीत बुमराहने कोणत्याही आशियाई गोलंदाजाकडून SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम केला आणि कपिल देव यांच्या परदेशात बळीचे पंचक साजरे करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.[३१]
- क्रिस वोक्सच्या (इंग्लड) कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण.[३२]
- भारताच्या लोकेश राहुलने इंग्लंडविरुद्ध १,००० कसोटी धावा पूर्ण केल्या आणि SENA कसोटीत भारतीय सलामीवीराने केलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक पन्नासपेक्षा जास्त धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली.[३३]
- ऋषभ पंत कसोटीच्या दोन्ही डावात शतके करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला.[३४]
- एकाच कसोटीत पहिल्यांदाच पाच भारतीय फलंदाजांनी शतके ठोकली.[३५] पराभूत संघाने कसोटीत पाच शतके ठोकण्याची ही पहिलीच घटना होती.
- बेन स्टोक्स (इंग्लंड) कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा इंग्लंडचा तिसरा कर्णधार ठरला.
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुण: इंग्लंड १२, भारत ०.
२री कसोटी
[संपादन]२–६ जुलै २०२५ धावफलक |
वि |
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला..
- शुभमन गिल (भारत) ने कसोटीतील आपले पहिले द्विशतक झळकावले.[३६] त्याने कसोटीत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विराट कोहलीचा (२५४) विक्रमही मोडला.[३७]
- रवींद्र जाडेजा हा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात २००० धावा करणारा आणि १०० बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.[३८]
- जेमी स्मिथने इंग्लंडचा यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करणारा ॲलेक स्टुअर्टचा विक्रम (१७३) मोडला.[३९]
- यशस्वी जयस्वालच्या (भारत) कसोटी क्रिकेट मध्ये २००० धावा पूर्ण.[४०]
- आकाश दीप (भारत) ने कसोटीत पहिल्यांदाच बळीचे पंचक (5-Wicket Haul) आणि सामन्यात दहा विकेट्स घेतल्या.[४१][४२]
- या ठिकाणी भारताचा हा पहिलाच कसोटी विजय होता.[४३] या ठिकाणी विजय मिळवणारा हा पहिला आशियाई संघही ठरला.[४४]
- हा भारताचा घराबाहेर धावांच्या फरकाने मिळालेला सर्वात मोठा कसोटी विजय होता.[४५]
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुण: भारत १२, इंग्लंड ०
३री कसोटी
[संपादन]१०–१४ जुलै २०२५ धावफलक |
वि |
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून निर्णय घेतला
- जो रूट (इं) हा भारताविरुद्ध ३,००० कसोटी धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.[४६]
- जेमी स्मिथ (इं) कसोटीत १,००० धावा पूर्ण करणारा संयुक्तपणे सर्वात जलद यष्टीरक्षक-फलंदाज बनला.[४७]
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुण: इंग्लंड १०, भारत ०[b]
४थी कसोटी
[संपादन]२३–२७ जुलै २०२५ धावफलक |
वि |
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अंशुल कंबोजने भारतातर्फे कसोटी पदार्पण केले.
- यशस्वी जयस्वाल (भा) ने इंग्लंडविरुद्ध १००० कसोटी धावा पूर्ण केल्या.[४९]
- लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा (भा) या सर्वांनी इंग्लंडमध्ये कसोटीत १००० धावा पूर्ण केल्या.[५०][५१] इंग्लंडमध्ये असे करणारा पंत हा पहिलाच यष्टिरक्षक बनला.[५२]
- जो रूट (इं) हा रिकी पॉन्टिंगला (ऑ) मागे टाकत कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला.[५३]
- भारताच्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडमध्ये ५० वा बळी घेतला.[५४]
- बेन स्टोक्सने (इं) कसोटीत ७,००० वा धावा काढल्या.[५५] तो त्याच कसोटी सामन्यात शतक आणि पाच बळी घेणारा पहिला इंग्लिश कर्णधारही बनला.[५६]
- या मैदानावर इंग्लंडची ही सर्वोच्च धावसंख्या होती.[५७]
- शुभमन गिल (भारत) ने SENA देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत आशियाई फलंदाजातर्फे सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा (६९२) विक्रम मागे टाकला.[५८]
- वॉशिंग्टन सुंदर (भारत) ने कसोटीतील त्याचे पहिले शतक झळकावले.[५९]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: इंग्लंड ४, भारत ४.
५वी कसोटी
[संपादन]आकडेवारी
[संपादन]सर्वाधिक धावा
[संपादन]| धावा | फलंदाज | सामने | डाव | नाबाद | सरासरी | सर्वाधिक | १०० | ५० |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ७५४ | ५ | १० | ० | ७५.४० | २६९ | ४ | ० | |
| ५३७ | ५ | ९ | १ | ६७.१२ | १५० | ३ | १ | |
| ५३२ | ५ | १० | ० | ५३.२० | १३७ | २ | २ | |
| ५१६ | ५ | १० | ४ | ८६.०० | १०७* | १ | ५ | |
| ४८१ | ५ | ९ | ० | ५३.४४ | १५८ | २ | २ | |
| स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[६१] | ||||||||
सर्वाधिक बळी
[संपादन]| बळी | गोलंदाज | सामने | डाव | धावा | षटके | सर्वोत्तम | सरासरी | ५वि |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| २३ | ५ | ९ | ७४६ | १८५.३ | ६/७० | ३२.४३ | २ | |
| १९ | ३ | ६ | ५५२ | १२७.० | ५/१२५ | २९.०५ | १ | |
| १७ | ४ | ८ | ४२९ | १४०.० | ५/७२ | २५.२३ | १ | |
| १४ | ३ | ५ | ३६४ | ११९.४ | ५/७४ | २६.०० | २ | |
| ३ | ६ | ५१९ | १०५.० | ४/६२ | ३७.०७ | ० | ||
| स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[६२] | ||||||||
नोंदी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ↑ "England to host India Men and Women tours in 2025" [२०२५ मध्ये इंग्लंड भारताच्या पुरुष आणि महिला दौऱ्यांचे आयोजन करणार]. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England reveal blockbuster schedule for 2025 summer" [इंग्लंडने २०२५ च्या उन्हाळ्यासाठी ब्लॉकबस्टर वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ ऑगस्ट २०२४. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Leeds to host England-India Test series opener in 2025" [२०२५ इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचा पहिला सामना लीड्सवर.]. क्रिकबझ्झ. २२ ऑगस्ट २०२४. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India to kickstart new WTC cycle with 5-Test series in England in 2025" [२०२५ मध्ये इंग्लंडमधील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेने भारतच्या नवीन जागतिक क्रिकेट फेरीची सुरुवात होणार.]. इंडिया टुडे. २२ ऑगस्ट २०२४. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England Men and Women 2025 summer international fixtures revealed" [इंग्लंडमधील पुरुष आणि महिला संघांचे २०२५ उन्हाळी आंतरराष्ट्रीय सामने जाहीर]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England men and women to play India and West Indies in 2025 home summer - full schedule" [२०२५ च्या उन्हाळ्यात इंग्लंडचे पुरुष आणि महिला संघ भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार - संपूर्ण वेळापत्रक]. स्काय स्पोर्ट्स. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India, England to now play for the Tendulkar-Anderson trophy" [भारत आणि इंग्लंड आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी खेळणार]. ddnews.gov.in (इंग्रजी भाषेत). 2025-07-17 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "'Wanted to keep Pataudi legacy alive' - how Tendulkar helped in creating Pataudi medal" ['पतौडी वारसा जिवंत ठेवायचा होता' - तेंडुलकरने पतौडी पदक निर्माण करण्यात कशी मदत केली]. ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2025-06-22 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England add Jofra Archer to squad for second Test against India" [भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चरचा समावेश.]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India's squad (Senior Men's) for England Test series announced" [इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची (वरिष्ठ पुरुष) घोषणा]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Squad Update: Harshit Rana links up with Team India for first Test in Leeds" [संघ अपडेट: लीड्समधील पहिल्या कसोटीसाठी हर्षित राणा टीम इंडियाशी जोडले गेले]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India pacer sent home after defeat to England in first Test: 'He will have to fly back'" [पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय वेगवान गोलंदाजाला मायदेशी पाठवण्यात आले: 'त्याला परत जावे लागेल']. हिंदुस्थान टाईम्स. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Akash Deep, Arshdeep likely out of fourth Test; Kamboj called-up as cover" [आकाश दीप, अर्शदीप चौथ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता; कंबोजला कव्हर म्हणून बोलावण्यात आले]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Squad Update: Nitish Kumar Reddy ruled out of the series. Arshdeep Singh ruled out of fourth Test" [संघ अपडेट: नितीश कुमार रेड्डी मालिकेतून बाहेर. अर्शदीप सिंग चौथ्या कसोटीतून बाहेर]. बीसीसीआय. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Knee injury rules Nitish Reddy out of England tour, Arshdeep out of fourth Test" [गुडघ्याच्या दुखापतीमुळे नितीश रेड्डी इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, तर अर्शदीप चौथ्या कसोटीतून बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "दुखापतग्रस्त आकाश दीप मँचेस्टर कसोटीतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Rishabh Pant ruled out of fifth Test due to injury; N Jagadeesan named replacement" [दुखापतीमुळे ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर; एन जगदीसनची जागा घेतली]. बीसीसीआय. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England add Jofra Archer to squad for second Test against India" [भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चरचा समावेश.]. इंग्लड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England add Gus Atkinson to squad for third Test against India" [भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात गस अॅटकिन्सनचा समावेश]. इंग्लड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Bashir ruled out of remainder of Anderson-Tendulkar Trophy 2025" [बशीर अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर]. क्रिकबझ्झ. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England name Bashir's replacement for fourth India Test" [इंग्लंडने चौथ्या भारत कसोटीसाठी बशीरच्या जागी खेळाडूची निवड केली]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England Men name squad for 4th Rothesay Test against India" [भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या पुरुष संघाची घोषणा]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Jamie Overton added to England squad for fifth Test against India" [भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघात जेमी ओव्हरटनचा समावेश]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Injured Stokes out of fifth Test against India, England rest Archer and Carse" [दुखापतग्रस्त स्टोक्स भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीतून बाहेर, इंग्लंडने आर्चर आणि कार्सेला विश्रांती दिली]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Haines, Mousley and Holden make India A toil in Canterbury" [कॅन्टरबरीमध्ये हेन्स, मौस्ली आणि होल्डन यांनी भारत अ संघ संघाला सतावले]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England Lions vs India A, day three report: Haines, Holden, Mousley star on another day of runs" [इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया अ, तिसऱ्या दिवसाचा अहवाल: हेन्स, होल्डन, मौस्ली दुसऱ्या दिवशी धावांच्या जोरावर स्टार]. विस्डेन. १ जून २०२५. ८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs ENG: Shubman Gill's captaincy debut – A look at how past Indian skippers fared" [भारत विरुद्ध इंग्लड: शुभमन गिलचे कर्णधारपदी पदार्पण – मागील भारतीय कर्णधारांच्या कामगिरीवर एक नजर]. द टाइम्स ऑफ इंडिया. २० जून २०२५. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "ENG vs IND: Sai Sudharsan makes Test debut for India at Headingley" [इंग्लंड विरुद्ध भारत: साई सुदर्शनने हेडिंग्ले येथे भारतासाठी कसोटी पदार्पण केले]. Sportstar. २० जून २०२५. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Ind vs Eng 1st Test: Shubman Gill slams century on captaincy debut, enters elite club" [भारत विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी: शुभमन गिलचे कर्णधारपदाच्या पदार्पणातच शतक, एलिट क्लबमध्ये प्रवेश]. Mid-Day. २० जून २०२५. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "ENG vs IND: Rishabh Pant becomes second Indian wicketkeeper to 3000 Test runs after MS Dhoni" [इंग्लंड विरुद्ध भारत: महेंद्रसिंग धोनीनंतर ऋषभ पंत ३००० कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय यष्टीरक्षक.]. Sportstar. २० जून २०२५. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Jasprit Bumrah breaks Wasim Akram's mind-boggling record, proves why he's second to none" [जसप्रीत बुमराहने मोडला वसीम अक्रमचा आश्चर्यकारक विक्रम, तो दुसऱ्या क्रमांकावर का आहे हे सिद्ध केले]. हिंदुस्तान टाइम्स. २१ जून २०२५. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ हॉल्ट, निक; मॅकफर्सन, विल; बेरी, सायल्ड; विग्मोर, टीम; बागची, रॉब; क्रिचर्ड, किरन (२२ जून २०२५). "Headingley Ashes snub looks puzzling with yet more magic on cards". टेलिग्राफ. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "KL Rahul equals Virender Sehwag's Test record in SENA after slamming fifty in IND vs ENG 1st Test" [भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावून केएल राहुलने SENA देशांमध्ये वीरेंद्र सेहवागच्या कसोटी विक्रमाशी बरोबरी केली.]. इंडिया टीव्ही. २३ जून २०२५. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Rishabh Pant creates history in Test cricket with twin tons, a feat even MS Dhoni never achieved" [ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकून रचला इतिहास, असा पराक्रम जो महेंद्रसिंग धोनीनेही कधीही साध्य केला नाही.]. फर्स्टपोस्ट. २३ जून २०२५. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India vs England: First time in history! Team India creates unprecedented Test record" [भारत विरुद्ध इंग्लंड: इतिहासात पहिल्यांदाच! टीम इंडियाने रचला अभूतपूर्व कसोटी विक्रम]. टाइम्स ऑफ इंडिया. २३ जून २०२५. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Shubman Gill continues plunder as Indian captain with maiden Test double century" [शुभमन गिलने पहिले कसोटी द्विशतक झळकावत भारतीय कर्णधार म्हणून कामगिरी सुरूच ठेवली आहे.]. द इंडियन एक्सप्रेस. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Shubman Gill Breaks Virat Kohli's Record Of Best Test Score By Indian Captain" [शुभमन गिलने मोडला विराट कोहलीचा भारतीय कर्णधार म्हणून सर्वोत्तम कसोटी धावसंख्येचा विक्रम]. न्यूज१८. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Ravindra Jadeja Creates History, Becomes 1st Player In The World To..." [रवींद्र जडेजाने इतिहास रचला, असा विक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू बनला...]. न्यूज१८. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "ENG vs IND: Jamie Smith breaks 28-year-old record for England with classy 184 vs India" [इंग्लंड विरुद्ध भारत: जेमी स्मिथने भारताविरुद्ध १८४ धावांची खेळी करत इंग्लंडसाठी २८ वर्ष जुना विक्रम मोडला]. इंडिया टुडे. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Yashasvi Jaiswal Becomes Fastest Indian Batter To Score 2000 Runs In Tests" [यशस्वी जयस्वाल कसोटीत सर्वात जलद २००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला]. न्यूज१८. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Akash Deep does to England what no other bowler in Test cricket has in 49 years; Akram, McGrath, Warne not even close" [आकाश दीप इंग्लंडविरुद्ध असे केले जे ४९ वर्षांत कसोटी क्रिकेटमधील इतर कोणत्याही गोलंदाजाने केले नाही; अक्रम, मॅकग्रा, वॉर्न जवळपासही नाहीत]. Hindustan Times. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Akash Deep Becomes 2nd Indian Bowler To Take 10-Wicket Haul In Tests In England" [इंग्लंडमध्ये कसोटीत १० बाळी घेणारा आकाश दीप दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.]. News18. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India Beat England In 2nd Test For Historic Win At Edgbaston, Level Series 1-1" [एजबॅस्टन येथे दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला, मालिका १-१ अशी बरोबरीत]. News18. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India first Asian team to breach 'fortress' Edgbaston" [एजबॅस्टनचा 'किल्ला' ओलांडणारा भारत पहिला आशियाई संघ]. द इंडियन एक्सप्रेस. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India's biggest win margin by runs: Shubman Gill & Co record fourth biggest win in Tests against England" [धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा विजय: शुभमन गिल आणि कंपनीचा इंग्लंडविरुद्ध कसोटीतील चौथा सर्वात मोठा विजय]. स्पोर्टस्टार. १० जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs ENG, 3rd Test: Joe Root becomes 1st batter to score 3000 runs against India" [भारत विरुद्ध इंग्लंड, ३री कसोटी: जो रूट भारताविरुद्ध ३००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला]. स्पोर्टस्टार. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Jamie Smith Becomes Joint-Fastest Wicketkeeper-Batter To Score 1000 Runs In Tests" [जेमी स्मिथ कसोटीत १००० धावा करणारा संयुक्तपणे सर्वात जलद यष्टीरक्षक-फलंदाज बनला]. न्यूज१८. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "England docked WTC points for slow over rate in Lord's Test" [लॉर्ड्स कसोटीत स्लो ओव्हररेटमुळे इंग्लंडने विश्व कसोटी अजिंक्यपद गुण गमावले]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs ENG Test: Yashasvi Jaiswal creates history, becomes joint-second fastest Indian to milestone" [भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी: यशस्वी जयस्वालने इतिहास रचला, सर्वात जलद टप्पा गाठणारा संयुक्तपणे दुसरा भारतीय गोलंदाज बनला.]. द टाइम्स ऑफ इंडिया. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "KL Rahul surpasses Virat Kohli, joins Tendulkar, Dravid in iconic run-scoring club during Manchester Test" [मँचेस्टर कसोटीत केएल राहुलने विराट कोहलीला मागे टाकले, तेंडुलकर, द्रविड यांच्यासह धावा करणाऱ्या आयकॉनिक क्लबमध्ये सामील झाला]. हिंदुस्थान टाइम्स. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Ravindra Jadeja becomes third cricketer to score 1000 runs and take 30 wickets in away country" [रवींद्र जडेजा परदेशात १००० धावा आणि ३० विकेट्स घेणारा तिसरा क्रिकेट खेळाडू ठरला.]. मिंट. 2025-07-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Rishabh Pant Creates History, Becomes 1st Wicketkeeper-Batter In The World To..." [ऋषभ पंतने इतिहास रचला, जगातील पहिला यष्टीरक्षक-फलंदाज बनला...]. न्यूज१८. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ हेन्री, मॅथ्यू. "Root passes Ponting as England dominate India" [इंग्लंडचे भारतावर वर्चस्व, रूटने पॉन्टिंगला मागे टाकले]. बीबीसी. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Bumrah becomes third Asian seamer to complete 50 Test wickets in England" [इंग्लंडमध्ये ५० कसोटी बळी घेणारा बुमराह तिसरा आशियाई गोलंदाज ठरला]. मिंट. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Stokes joins exclusive Test all-rounders list" [स्टोक्सचा समावेश कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Ben Stokes Creates History, Becomes 1st Cricketer In 148 Years To..." [बेन स्टोक्सने इतिहास रचला, १४८ वर्षांत पहिला क्रिकेट खेळाडू बनला...]. न्यूज१८. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Highest Test totals against India: England posts 669 runs during 4th Test, 9th-highest score vs India" [भारताविरुद्ध सर्वोच्च कसोटी धावसंख्या: इंग्लंडने चौथ्या कसोटीत ६६९ धावा केल्या, भारताविरुद्धची नवव्या क्रमांकाची धावसंख्या.]. स्पोर्टस्टार. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Shubman Gill Breaks Virat Kohli's All-Time Batting Record Of Scoring Most Runs In..." [शुभमन गिलने विराट कोहलीचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला...]. न्यूज१८. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Defiant centurions Gill, Jadeja & Sundar eke out hard-fought draw" [गिल, जडेजा आणि सुंदर यांच्या आक्रमक शतकांमुळे कठीण सामना अनिर्णीत]. क्रिकबझ्झ. २८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India's Smallest Wins In Tests By Runs" [धावांच्या बाबतीत भारताचा कसोटी सामन्यांमध्ये सर्वात लहान विजय]. न्यूज१८. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Most runs in Anderson–Tendulkar Trophy, 2025" [अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी, २०२५ मध्ये सर्वाधिक धावा]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Most wickets in Anderson–Tendulkar Trophy, 2025" [अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी, २०२५ मध्ये सर्वाधिक बळी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.

