भाग्यश्री पटवर्धन
Appearance
भाग्यश्री (संपूर्ण नाव: श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन; २३ फेब्रुवारी १९६९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. ती सांगलीच्या पतवर्धन राजघराण्याची वंशज असून तिचा जन्म मुंबईमध्ये झाला. १९८९ सालच्या मैने प्यार किया ह्या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.
मैने प्यार किया नंतर भाग्यश्रीने लग्न करून सिनेमामधून काहीशी निवृत्ती पत्कारली व फारसे सिनेमे केले नाहीत. २००९ साली तिने झक मारली बायको केली ह्या मराठी चित्रपटात काम केले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील भाग्यश्री पटवर्धन चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत